Home पिंपरी चिंचवड वेश्या व्यवसाय प्रकरणी सांगवी आणि वाकड परिसरातील २ स्पा सेंटरवर कारवाई..

वेश्या व्यवसाय प्रकरणी सांगवी आणि वाकड परिसरातील २ स्पा सेंटरवर कारवाई..

by Lokmauryanews@gmail.com
0 comments
Spread the love

पिंपरी चिंचवड (दि. १० नोव्हेंबर २०२५) :- सांगवी आणि वाकड पोलीस स्टेशन हद्दीत बेकायदेशीर वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळताच गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्षाने दोन स्पा सेंटरवर छापे टाकत कारवाई केली. या दोन्ही स्पा सेंटरमधील अनैतिक प्रकारांची खात्री झाल्याने पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी त्यांना एक वर्षासाठी बंद करण्याचे आदेश दिले.

सांगवी परिसरातील कुणाल आयकॉन रोडवरील “NEW OM SPA” येथे छापा टाकून आरोपी आकाश साळवे आणि संदीप तिवारी यांच्यावर सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला. स्पा सेंटरच्या आजूबाजूला सार्वजनिक ठिकाण असूनही वेश्याव्यवसाय चालवल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी स्पा बंद करण्याचा प्रस्ताव आयुक्त कार्यालयात पाठवला होता.

तसेच वाकड येथील काळेवाडी फाटा परिसरातील “RUPEN SPA” येथे छाप्यात महिला आरोपी हिच्यावर वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तिच्या विरोधातही स्पा सेंटरच्या बाहेर सार्वजनिक जागा असूनही बेकायदेशीर व्यवसाय चालवल्याचा आरोप करण्यात आला.

दोन्ही प्रकरणातील कागदपत्रे आणि चौकशी अहवाल तपासल्यानंतर  पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी ७ नोव्हेंबर २०२५ पासून पुढील एक वर्षासाठी दोन्ही स्पा सेंटर बंद करण्याचे आदेश जारी केले.

banner

या कारवाईमुळे अशा बेकायदेशीर व्यवसायांना लगाम बसण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.


Spread the love

You may also like

Leave a Comment

आमच्याबद्दल – लोक मौर्य

“लोक मौर्य” हे एक विश्वासार्ह, अभ्यासपूर्ण आणि जनतेच्या आवाजाला प्रतिष्ठा देणारे डिजिटल वेबपोर्टल आहे. आम्ही बातम्यांची केवळ नोंद घेत नाही, तर त्या बातम्या समाजावर काय परिणाम करतात याचाही सखोल विचार करतो.

“लोक मौर्य” हे नाव केवळ एका समुदायाचं प्रतिनिधित्व करत नाही, तर ते समतेच्या तत्वावर आधारित न्याय्य समाजरचनेचं प्रतीक आहे. आम्ही प्रत्येक वर्गातील, जातीधर्मातील आणि प्रांतातील लोकांचे मुद्दे, सामाजिक बदल, आणि ऐतिहासिक सत्यता यांचा अभ्यासपूर्वक मागोवा घेतो.

आमचा प्रयत्न आहे की, “लोक मौर्य” हे व्यासपीठ सत्य, विवेक आणि संवेदनशीलतेने समृद्ध असावं. आम्ही कोणत्याही राजकीय पक्षाशी संलग्न नाही, पण जनतेच्या बाजूने ठामपणे उभं राहणं हीच आमची भूमिका आहे.

आम्ही विश्वास ठेवतो – लोकशाही टिकते ती सजग नागरिकांमुळे, आणि सजगता येते माहितीमुळे. “लोक मौर्य” हे त्या सजगतेचं माध्यम आहे.

 

मुख्य संपादक :- राम बनसोडे

संपर्क:- 8446439067

Edtior's Picks

Latest Articles

© 2025 Lok Maurya, All Rights Reserved | Website Developed & Maintained by Swara Infotech | 📞 9096040204
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00