Home पिंपरी चिंचवड ३ लाख ९३ हजार मालमत्ताधारकांनी घेतला ऑनलाईन सुविधेचा फायदा…

३ लाख ९३ हजार मालमत्ताधारकांनी घेतला ऑनलाईन सुविधेचा फायदा…

by Lokmauryanews@gmail.com
0 comments
Spread the love

पिंपरी (दि. ०७ नोव्हेंबर २०२५) :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाने राबविलेल्या विविध जनजागृती उपक्रमांमुळे आणि सुलभ ऑनलाईन प्रणालीमुळे नागरिक आता मोठ्या प्रमाणात ऑनलाईन माध्यमातून मालमत्ता कर भरण्याकडे वळले आहेत. चालू आर्थिक वर्षात १ एप्रिल २०२५ ते ६ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत शहरातील ७ लाख ४० हजार मालमत्ताधारकांपैकी ४ लाख ७७ हजार २८४ मालमत्ताधारकांनी कर भरला असून, त्यापैकी ३ लाख ९३ हजार ७७१ मालमत्ताधारकांनी ऑनलाईन माध्यमातून कर भरला आहे.

गेल्या काही वर्षांपासून महापालिकेने कर भरण्याची प्रक्रिया अधिक सुलभ, पारदर्शक आणि तंत्रज्ञानाधारित करण्यासाठी विविध उपक्रम हाती घेतले आहेत. ‘ऑनलाईन कर भरा’ या मोहिमेखाली नागरिकांना प्रोत्साहित करण्यात आले. यामध्ये विशेष सवलतींची घोषणा, एसएमएस, सोशल मीडिया, स्थानिक चौकांवर सार्वजनिक घोषणांद्वारे जनजागृती करण्यात आली. या उपक्रमांचा परिणाम म्हणून नागरिकांनी प्रत्यक्ष कर कार्यालयात जाण्यापेक्षा ऑनलाईन माध्यमाचा मोठ्या प्रमाणात वापर केला.

महापालिकेने मालमत्ता कर भरण्यासाठी अधिकृत वेबसाइट उपलब्ध करून दिली आहे. या माध्यमातून नागरिकांना त्यांच्या मालमत्तेची माहिती, थकबाकी रक्कम, पावती डाउनलोड तसेच सवलतींचा तपशील एकाच ठिकाणी पाहता येतो. सुरक्षित पेमेंट आणि सुलभ वापरामुळे नागरिकांचा या डिजिटल माध्यमावर विश्वास वाढला आहे.

६३१ कोटी ६६ लाख रुपयांचा मालमत्ता कर वसूल

banner

पिंपरी चिंचवड महापालिकेने आर्थिक वर्ष २०२५-२६ या कालावधीत १ एप्रिल २०२५ ते ६ नोव्हेंबर २०२५ या काळात ६३१ कोटी ६६ लाख रुपयांचा मालमत्ता कर वसूल केला आहे. यामध्ये ऑनलाईन माध्यमातून जमा झालेल्या कराची रक्कम तब्बल ५१५ कोटी रुपये आहे.

असा झाला भरणा. 

ऑनलाईन – ५१५ कोटी

रोख – ४३ कोटी २० लाख

धनादेश – ३८ कोटी ६६ लाख

डिमांड ड्राफ्ट – १ कोटी ८९ लाख

ईडीसी – ६ लाख

पिंपरी चिंचवड शहरातील नागरिक डिजिटल साधनांचा उत्तम वापर करत आहेत. ऑनलाईन पेमेंट प्रणालीमुळे पारदर्शकता वाढली आहे आणि कर संकलन प्रक्रियेत वेग आला आहे. येत्या काळात अधिक सुविधा समाविष्ट करून ही प्रणाली अजून सुलभ करण्याचा प्रयत्न सुरू आहे.

— पंकज पाटील, उपायुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका.


Spread the love

You may also like

Leave a Comment

आमच्याबद्दल – लोक मौर्य

“लोक मौर्य” हे एक विश्वासार्ह, अभ्यासपूर्ण आणि जनतेच्या आवाजाला प्रतिष्ठा देणारे डिजिटल वेबपोर्टल आहे. आम्ही बातम्यांची केवळ नोंद घेत नाही, तर त्या बातम्या समाजावर काय परिणाम करतात याचाही सखोल विचार करतो.

“लोक मौर्य” हे नाव केवळ एका समुदायाचं प्रतिनिधित्व करत नाही, तर ते समतेच्या तत्वावर आधारित न्याय्य समाजरचनेचं प्रतीक आहे. आम्ही प्रत्येक वर्गातील, जातीधर्मातील आणि प्रांतातील लोकांचे मुद्दे, सामाजिक बदल, आणि ऐतिहासिक सत्यता यांचा अभ्यासपूर्वक मागोवा घेतो.

आमचा प्रयत्न आहे की, “लोक मौर्य” हे व्यासपीठ सत्य, विवेक आणि संवेदनशीलतेने समृद्ध असावं. आम्ही कोणत्याही राजकीय पक्षाशी संलग्न नाही, पण जनतेच्या बाजूने ठामपणे उभं राहणं हीच आमची भूमिका आहे.

आम्ही विश्वास ठेवतो – लोकशाही टिकते ती सजग नागरिकांमुळे, आणि सजगता येते माहितीमुळे. “लोक मौर्य” हे त्या सजगतेचं माध्यम आहे.

 

मुख्य संपादक :- राम बनसोडे

संपर्क:- 8446439067

Edtior's Picks

Latest Articles

© 2025 Lok Maurya, All Rights Reserved | Website Developed & Maintained by Swara Infotech | 📞 9096040204
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00