Home मावळ पत्नी आणि मित्राला ‘मेसेज’ पाठवून त्याने लायन्स पॉइंटवर संपवले जीवन…

पत्नी आणि मित्राला ‘मेसेज’ पाठवून त्याने लायन्स पॉइंटवर संपवले जीवन…

by Lokmauryanews@gmail.com
0 comments
Spread the love

मावळ

लोणावळ्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ लायन्स पॉइंट येथे पुन्हा एकदा आत्महत्येची दुर्दैवी घटना घडली आहे. वीरेंद्र सिन्हा (वय ३२, रा. बाणेर, पुणे) या आयटी अभियंत्याने दरीत उडी घेत आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे.

लोणावळा ग्रामीण पोलिसांच्या मार्गदर्शनाखाली शिवदुर्ग रेस्क्यू टीमने दरीत शोधमोहीम राबवली. सुमारे २५० फूट खोल दरीत उतरून बचाव पथकाने शोध घेतला असता संबंधित तरुणाचा मृतदेह आढळून आला. मोठ्या प्रयत्नांनंतर मृतदेह बाहेर काढण्यात आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपूर्वी लायन्स पॉइंट परिसरात एक चारचाकी वाहन संशयास्पदरीत्या उभे असल्याचे निदर्शनास आले होते. चौकशीत हे वाहन वीरेंद्र सिन्हा यांचे असल्याचे समोर आले. संबंधित तरुण पुण्यातील एका आयटी कंपनीत कार्यरत होता. पहाटेच्या सुमारास त्यांनी पत्नी आणि मित्राला संदेश पाठविल्याची माहितीही तपासात समोर आली आहे.

banner

शोधमोहीमेदरम्यान योगेश उंबरे, महेश मसने, आयुष वर्तक, आयुष पवार, देवश्री चिले, सचिन गायकवाड, कुणाल कडू, कपिल दळवी, योगेश दळवी, सागर दळवी, सागर कुंभार, अनिल आंद्रे, गणेश भांगरे, पिंटू मानकर, महादेव भवार, गणेश म्हसकर, ज्ञानेश्वर आखाडे, संतोष मरगळे, चंद्रकांत गाडे, आनंद गावडे आदींनी मोलाचे सहकार्य केले.

अलिकडच्या काळात लायन्स पॉइंट येथे आत्महत्यांच्या घटना वाढताना दिसत आहेत. मागील पंधरा दिवसांत याठिकाणी दोन जणांनी जीवन संपविले आहे. यापूर्वीही अशा प्रकारच्या घटना घडल्या आहेत. लोणावळा शहरापासून काही अंतरावर असलेले हे निसर्गरम्य पर्यटनस्थळ भविष्यात प्रस्तावित ग्लास स्कायवॉक प्रकल्पामुळे जागतिक स्तरावर ओळख मिळविण्याच्या मार्गावर आहे. मात्र, वाढत्या आत्महत्यांच्या घटनांमुळे येथे सुरक्षेच्या कडक उपाययोजना राबविण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.


Spread the love

You may also like

Leave a Comment

आमच्याबद्दल – लोक मौर्य

“लोक मौर्य” हे एक विश्वासार्ह, अभ्यासपूर्ण आणि जनतेच्या आवाजाला प्रतिष्ठा देणारे डिजिटल वेबपोर्टल आहे. आम्ही बातम्यांची केवळ नोंद घेत नाही, तर त्या बातम्या समाजावर काय परिणाम करतात याचाही सखोल विचार करतो.

“लोक मौर्य” हे नाव केवळ एका समुदायाचं प्रतिनिधित्व करत नाही, तर ते समतेच्या तत्वावर आधारित न्याय्य समाजरचनेचं प्रतीक आहे. आम्ही प्रत्येक वर्गातील, जातीधर्मातील आणि प्रांतातील लोकांचे मुद्दे, सामाजिक बदल, आणि ऐतिहासिक सत्यता यांचा अभ्यासपूर्वक मागोवा घेतो.

आमचा प्रयत्न आहे की, “लोक मौर्य” हे व्यासपीठ सत्य, विवेक आणि संवेदनशीलतेने समृद्ध असावं. आम्ही कोणत्याही राजकीय पक्षाशी संलग्न नाही, पण जनतेच्या बाजूने ठामपणे उभं राहणं हीच आमची भूमिका आहे.

आम्ही विश्वास ठेवतो – लोकशाही टिकते ती सजग नागरिकांमुळे, आणि सजगता येते माहितीमुळे. “लोक मौर्य” हे त्या सजगतेचं माध्यम आहे.

 

मुख्य संपादक :- राम बनसोडे

संपर्क:- 8446439067

Edtior's Picks

Latest Articles

© 2025 Lok Maurya, All Rights Reserved | Website Developed & Maintained by Swara Infotech | 📞 9096040204
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00