Home मावळ येलवाडीत ८५ टक्के मतदान; सहा उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद

येलवाडीत ८५ टक्के मतदान; सहा उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद

म्हाळुंगे नानेकरवाडी गटातील मतदान...

by Lokmauryanews@gmail.com
0 comments
Spread the love

खेड प्रतिनिधी – पुणे जिल्हा परिषद व पंचायत समिती गण सन २०२६ साठी शनिवार (ता. ७) रोजी झालेली सार्वत्रिक निवडणूक प्रक्रिया येलवाडी परिसरात अत्यंत शांततेत आणि उत्साही वातावरणात पार पडली. कुठलाही अनुचित प्रकार न घडता मतदान प्रक्रिया सुरळीतरीत्या पूर्ण झाली.
खेड तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती गणासाठी सकाळी ७ वाजल्यापासून सायंकाळी ७ वाजेपर्यंत मतदारांनी मतदान केंद्रांवर रांगा लावल्या होत्या. मतदारांनी मोठ्या उत्साहाने आणि शिस्तबद्ध पद्धतीने आपला मतदानाचा हक्क बजावला.
कान्हेवाडी तर्फे चाकण – ८५४, सांगुर्डी – १०९७, येलवाडी – २९३२, खालुंब्रे – १६४१, म्हाळुंगे – २८४०, सावरदरी – १०१६, वासुली – ८१२, शिंदे – १३१४, नानेकरवाडी – ३२४०, खराबवाडी – ४३१०, बिरदवडी – ११११ अशा एकूण २१,०६७ मतदारांनी मतदान करून सहा उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद केले. येलवाडी गणात सुमारे ८५ टक्के मतदान नोंदविले गेले.
खेड तालुका जिल्हा परिषद गणासाठी
१) जीवन खराबी (मशाल – उबाठा),
२) गणेश नाणेकर (धनुष्यबाण – शिंदे गट)
३) गणेश बोत्रे (घड्याळ – अजित पवार गट)
हे उमेदवार निवडणूक रिंगणात होते.
तर पंचायत समिती गणासाठी
१) अर्चना नितीन गाडे (धनुष्यबाण – शिंदे गट),
२) अश्विनी सोमनाथ तरस (घड्याळ – अजित पवार गट)
३) दीपाली अमित बवले (मशाल – उबाठा)
या तीन महिला उमेदवारांनी आपले नशीब आजमावले.
अनुभवी मतदारांनी व्यक्त केलेल्या अंदाजानुसार, खेड तालुक्यातील आठ जागांपैकी शिवसेना (शिंदे गट) – १, शिवसेना (उबाठा) – १, भाजप – २ आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) – ४ अशी विजयी उमेदवारांची बलाबल स्थिती राहण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
जिल्हा परिषद गणात जीवन खराबी (मशाल) आणि गणेश बोत्रे (घड्याळ) यांच्यातच खरी अटीतटीची लढत रंगणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. तर पंचायत समिती गणात अश्विनी तरस आणि दीपाली बवले यांच्यात प्रमुख चुरस असून, सध्याच्या स्थितीत अश्विनी तरस यांचे पारडे जड मानले जात आहे.


Spread the love

You may also like

Leave a Comment

आमच्याबद्दल – लोक मौर्य

“लोक मौर्य” हे एक विश्वासार्ह, अभ्यासपूर्ण आणि जनतेच्या आवाजाला प्रतिष्ठा देणारे डिजिटल वेबपोर्टल आहे. आम्ही बातम्यांची केवळ नोंद घेत नाही, तर त्या बातम्या समाजावर काय परिणाम करतात याचाही सखोल विचार करतो.

“लोक मौर्य” हे नाव केवळ एका समुदायाचं प्रतिनिधित्व करत नाही, तर ते समतेच्या तत्वावर आधारित न्याय्य समाजरचनेचं प्रतीक आहे. आम्ही प्रत्येक वर्गातील, जातीधर्मातील आणि प्रांतातील लोकांचे मुद्दे, सामाजिक बदल, आणि ऐतिहासिक सत्यता यांचा अभ्यासपूर्वक मागोवा घेतो.

आमचा प्रयत्न आहे की, “लोक मौर्य” हे व्यासपीठ सत्य, विवेक आणि संवेदनशीलतेने समृद्ध असावं. आम्ही कोणत्याही राजकीय पक्षाशी संलग्न नाही, पण जनतेच्या बाजूने ठामपणे उभं राहणं हीच आमची भूमिका आहे.

आम्ही विश्वास ठेवतो – लोकशाही टिकते ती सजग नागरिकांमुळे, आणि सजगता येते माहितीमुळे. “लोक मौर्य” हे त्या सजगतेचं माध्यम आहे.

 

मुख्य संपादक :- राम बनसोडे

संपर्क:- 8446439067

Edtior's Picks

Latest Articles

© 2025 Lok Maurya, All Rights Reserved | Website Developed & Maintained by Swara Infotech | 📞 9096040204
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00