Home पिंपरी चिंचवड भ्रष्टाचारावर प्रहार; सोमवारी मनपा मुख्यालयावर आंदोलन..

भ्रष्टाचारावर प्रहार; सोमवारी मनपा मुख्यालयावर आंदोलन..

by Lokmauryanews@gmail.com
0 comments
Spread the love

पिंपरी-चिंचवड (दि. ८ नोव्हेंबर २०२५) :- मोरवाडी चौकातील भ्रष्टाचारयुक्त व अपघातजन्य काँक्रिट डिव्हायडर तातडीने हटविण्याची मागणी करत, कष्टकऱ्यांचे नेते डॉ. बाबा कांबळे यांनी सोमवारी, दिनांक १० नोव्हेंबर रोजी मनपा मुख्यालयावर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

महाराष्ट्र रिक्षा पंचायत व ऑटो टॅक्सी ट्रान्सपोर्ट फेडरेशनच्या माध्यमातून डॉ. कांबळे यांनी मनपा प्रशासनावर “भ्रष्टाचार आणि जनतेच्या सुरक्षेतील बेफिकिरी”चा गंभीर आरोप केला आहे.

“निवेदन देऊनही प्रशासन गप्प बसले, हा माज आहे! कोणत्याही परिस्थितीत आंदोलन थांबणार नाही,” असा इशारा त्यांनी दिला. या डिव्हायडरमुळे वाहतूक विस्कळीत होत असून अपघात वाढले आहेत. कोणताही शास्त्रशुद्ध अभ्यास न करता मनमानी पद्धतीने हा डिव्हायडर बसवण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.

प्रशासनाने दखल न घेतल्यास सोमवार, १० नोव्हेंबर रोजी सकाळी ११.३० वाजता मनपा मुख्यालयासमोर घेराव आंदोलन करण्यात येईल, असा इशारा डॉ. कांबळे यांनी दिला आहे.

banner

Spread the love

You may also like

Leave a Comment

आमच्याबद्दल – लोक मौर्य

“लोक मौर्य” हे एक विश्वासार्ह, अभ्यासपूर्ण आणि जनतेच्या आवाजाला प्रतिष्ठा देणारे डिजिटल वेबपोर्टल आहे. आम्ही बातम्यांची केवळ नोंद घेत नाही, तर त्या बातम्या समाजावर काय परिणाम करतात याचाही सखोल विचार करतो.

“लोक मौर्य” हे नाव केवळ एका समुदायाचं प्रतिनिधित्व करत नाही, तर ते समतेच्या तत्वावर आधारित न्याय्य समाजरचनेचं प्रतीक आहे. आम्ही प्रत्येक वर्गातील, जातीधर्मातील आणि प्रांतातील लोकांचे मुद्दे, सामाजिक बदल, आणि ऐतिहासिक सत्यता यांचा अभ्यासपूर्वक मागोवा घेतो.

आमचा प्रयत्न आहे की, “लोक मौर्य” हे व्यासपीठ सत्य, विवेक आणि संवेदनशीलतेने समृद्ध असावं. आम्ही कोणत्याही राजकीय पक्षाशी संलग्न नाही, पण जनतेच्या बाजूने ठामपणे उभं राहणं हीच आमची भूमिका आहे.

आम्ही विश्वास ठेवतो – लोकशाही टिकते ती सजग नागरिकांमुळे, आणि सजगता येते माहितीमुळे. “लोक मौर्य” हे त्या सजगतेचं माध्यम आहे.

 

मुख्य संपादक :- राम बनसोडे

संपर्क:- 8446439067

Edtior's Picks

Latest Articles

© 2025 Lok Maurya, All Rights Reserved | Website Developed & Maintained by Swara Infotech | 📞 9096040204
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00