Home पिंपरी चिंचवड पिंपळे निलखमधील बंद बससेवा तातडीने सुरू करा..

पिंपळे निलखमधील बंद बससेवा तातडीने सुरू करा..

by Lokmauryanews@gmail.com
0 comments
Spread the love

पिंपळे निलख (दि. ८ नोव्हेंबर २०२५) :- पिंपळे निलख परिसरातील महत्त्वाचे पीएमपी बस मार्ग अचानक बंद झाल्यामुळे नागरिक, विद्यार्थी आणि नोकरदार वर्गाला मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टी (आप) पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष रविराज काळे यांनी तातडीने बससेवा पूर्ववत सुरू करण्याची मागणी करत प्रशासनाला इशारा दिला आहे की, मागणी मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल.

सध्या पिंपळे निलखहून पुणे स्टेशन (बस क्र. १००)हडपसर (बस क्र. ३३३) आणि स्वारगेट (बस क्र. २१) या मार्गांवरील बससेवा काही कारणास्तव थांबविण्यात आली आहे. या बसगाड्या परिसरातील नागरिकांसाठी जीवनवाहिनी ठरल्या होत्या. सेवेत खंड पडल्यामुळे नागरिकांना शहराच्या मध्यवर्ती भागात जाण्यासाठी अतिरिक्त वेळ आणि पैसा खर्च करावा लागत आहे.

काळे यांनी सांगितले, “बससेवा बंद झाल्याने विद्यार्थी, नोकरदार आणि ज्येष्ठ नागरिक त्रस्त झाले आहेत. लोकांना आता खासगी वाहनांचा वापर करावा लागत असून, त्याचा आर्थिक भार प्रचंड वाढला आहे. प्रशासनाने त्वरित दखल घेऊन या बस मार्गांची सेवा पूर्ववत सुरू करावी.”

‘आप’ने प्रशासनाला इशारा दिला आहे की, जर बससेवा लवकर सुरू झाली नाही, तर पक्ष नागरिकांसह रस्त्यावर उतरून तीव्र जनआंदोलन छेडेल आणि त्याची संपूर्ण जबाबदारी पीएमपी प्रशासनावर राहील.

banner

Spread the love

You may also like

Leave a Comment

आमच्याबद्दल – लोक मौर्य

“लोक मौर्य” हे एक विश्वासार्ह, अभ्यासपूर्ण आणि जनतेच्या आवाजाला प्रतिष्ठा देणारे डिजिटल वेबपोर्टल आहे. आम्ही बातम्यांची केवळ नोंद घेत नाही, तर त्या बातम्या समाजावर काय परिणाम करतात याचाही सखोल विचार करतो.

“लोक मौर्य” हे नाव केवळ एका समुदायाचं प्रतिनिधित्व करत नाही, तर ते समतेच्या तत्वावर आधारित न्याय्य समाजरचनेचं प्रतीक आहे. आम्ही प्रत्येक वर्गातील, जातीधर्मातील आणि प्रांतातील लोकांचे मुद्दे, सामाजिक बदल, आणि ऐतिहासिक सत्यता यांचा अभ्यासपूर्वक मागोवा घेतो.

आमचा प्रयत्न आहे की, “लोक मौर्य” हे व्यासपीठ सत्य, विवेक आणि संवेदनशीलतेने समृद्ध असावं. आम्ही कोणत्याही राजकीय पक्षाशी संलग्न नाही, पण जनतेच्या बाजूने ठामपणे उभं राहणं हीच आमची भूमिका आहे.

आम्ही विश्वास ठेवतो – लोकशाही टिकते ती सजग नागरिकांमुळे, आणि सजगता येते माहितीमुळे. “लोक मौर्य” हे त्या सजगतेचं माध्यम आहे.

 

मुख्य संपादक :- राम बनसोडे

संपर्क:- 8446439067

Edtior's Picks

Latest Articles

© 2025 Lok Maurya, All Rights Reserved | Website Developed & Maintained by Swara Infotech | 📞 9096040204
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00