Home पिंपरी चिंचवड सांगवीत बिबट्याचे दर्शन? नागरिकांत भीतीचे सावट..

सांगवीत बिबट्याचे दर्शन? नागरिकांत भीतीचे सावट..

by Lokmauryanews@gmail.com
0 comments
Spread the love

पिंपरी (दि. २९ नोव्हेंबर २०२५) :- सांगवी व औंध परिसरात बिबट्याचे दर्शन झाल्यानंतर नागरिकांत भीतीचे सावट पसरले असून दैनंदिन हालचालींवर त्याचा परिणाम स्पष्ट दिसत आहे. ब्रेमन चौक व परिसरात बिबट्या फिरल्याच्या चर्चेमुळे सांगवीकरांनी सकाळ-संध्याकाळच्या फिरण्यावर मर्यादा घातल्या आहेत. सांगवी-बोपोडी पूल, दत्त मंदिर परिसर, औंध उरो रुग्णालय परिसर अशा शांत ठिकाणी फिरण्यासाठी जाणारे नागरिक आता बाहेर पडणे टाळत आहेत.

औंधमधील बिबट्या अद्याप पकडला न गेल्याने परिस्थिती अधिक चिंताजनक बनली आहे. वनविभागाने शोधमोहीम सुरू असल्याचे सांगितले असून प्राथमिक फुटेजनंतर पुढील ठोस पुरावे मिळाले नसल्याचे स्पष्ट केले आहे.

वनरक्षक कृष्णा हाके यांनी नागरिकांना पहाटे किंवा रात्री एकटे बाहेर न पडण्याचा, परिसरात प्रकाशयोजना ठेवण्याचा, पाळीव प्राण्यांना सुरक्षित ठेवल्याचा व बिबट्या दिसल्यास १९२६ वर संपर्क करण्याचा सल्ला दिला आहे. दरम्यान, मावळ तालुक्यातील आंबी-शिरगाव भागातही बिबट्याचे व्हिडिओ वायरल होत असल्याने नागरिकांत चिंतेचे वातावरण आहे.


Spread the love

You may also like

Leave a Comment

आमच्याबद्दल – लोक मौर्य

“लोक मौर्य” हे एक विश्वासार्ह, अभ्यासपूर्ण आणि जनतेच्या आवाजाला प्रतिष्ठा देणारे डिजिटल वेबपोर्टल आहे. आम्ही बातम्यांची केवळ नोंद घेत नाही, तर त्या बातम्या समाजावर काय परिणाम करतात याचाही सखोल विचार करतो.

“लोक मौर्य” हे नाव केवळ एका समुदायाचं प्रतिनिधित्व करत नाही, तर ते समतेच्या तत्वावर आधारित न्याय्य समाजरचनेचं प्रतीक आहे. आम्ही प्रत्येक वर्गातील, जातीधर्मातील आणि प्रांतातील लोकांचे मुद्दे, सामाजिक बदल, आणि ऐतिहासिक सत्यता यांचा अभ्यासपूर्वक मागोवा घेतो.

आमचा प्रयत्न आहे की, “लोक मौर्य” हे व्यासपीठ सत्य, विवेक आणि संवेदनशीलतेने समृद्ध असावं. आम्ही कोणत्याही राजकीय पक्षाशी संलग्न नाही, पण जनतेच्या बाजूने ठामपणे उभं राहणं हीच आमची भूमिका आहे.

आम्ही विश्वास ठेवतो – लोकशाही टिकते ती सजग नागरिकांमुळे, आणि सजगता येते माहितीमुळे. “लोक मौर्य” हे त्या सजगतेचं माध्यम आहे.

 

मुख्य संपादक :- राम बनसोडे

संपर्क:- 8446439067

Edtior's Picks

Latest Articles

© 2025 Lok Maurya, All Rights Reserved | Website Developed & Maintained by Swara Infotech | 📞 9096040204
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00