Home पिंपरी चिंचवड चिखलीत त्रिवृक्ष वाचवण्यासाठी नागरिकांची हाक..

चिखलीत त्रिवृक्ष वाचवण्यासाठी नागरिकांची हाक..

by Lokmauryanews@gmail.com
0 comments
Spread the love

चिखली (दि. ०५ डिसेंबर २०२५) :-  चिखली परिसरातील स्पाईन रोड, घरकुल चौकाजवळील त्रिवृक्ष संगम दत्त मंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदाही दत्तजयंती भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली. मात्र यंदाचा उत्सव भाविकांसाठी वेदनेच्या सावटाखाली पार पडला.

गेल्या दहा वर्षांपासून वड, पिंपळ आणि औदुंबर या पवित्र त्रिवृक्षांच्या सान्निध्यात भक्तांची सेवा सुरू आहे. या वृक्षांच्या छायेत उभे राहिलेले छोटेसे दत्त मंदिर हे श्रद्धास्थान बनले होते. काही दिवसांपूर्वी न्यायालयाच्या आदेशानुसार परिसरातील अतिक्रमणे हटवताना मंदिर हटवण्यात आले. याबाबत नागरिकांनी कोणताही विरोध केला नाही, कारण मंदिराजवळ अनेक व्यावसायिक अतिक्रमणे होती.

तथापि, नागरिकांच्या म्हणण्यानुसार गेल्या दोन-तीन दिवसांत एका व्यापाऱ्याने स्वतःच्या फायद्यासाठी त्रिवृक्ष तोडण्याचा आणि दत्तमूर्ती हटवण्याचा दबाव वाढवला आहे. सेवकांवर दमदाटी केली जात असल्याचा आरोपही भाविकांनी केला. या त्रिवृक्षांचा परिसर सार्वजनिक असून, महावितरण व महापालिकेच्या अखत्यारित येतो, असे भाविकांचे म्हणणे आहे. मंदिर उभारण्यासाठी पूर्वी अधिकृत पत्रव्यवहारही झाल्याचे ते सांगतात.

वड, पिंपळ आणि औदुंबर हे हिंदू धर्मातील अत्यंत पूजनीय वृक्ष असून लाखो भाविकांच्या श्रद्धेचे प्रतीक आहेत. त्यामुळे त्रिवृक्ष वाचवण्यासाठी वृक्ष प्राधिकरण विभाग, शहर पोलीस तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने हस्तक्षेप करून वृक्षांचे आणि श्रद्धेचे रक्षण करावे, अशी मागणी भाविकांकडून करण्यात येत आहे.

banner

“वृक्ष जगले तर श्रद्धा जिवंत राहील… गुरुदेव दत्त साक्षी आहेत,” असे नागरिकांनी भावनिक शब्दांत प्रशासनाला आवाहन केले.


Spread the love

You may also like

Leave a Comment

आमच्याबद्दल – लोक मौर्य

“लोक मौर्य” हे एक विश्वासार्ह, अभ्यासपूर्ण आणि जनतेच्या आवाजाला प्रतिष्ठा देणारे डिजिटल वेबपोर्टल आहे. आम्ही बातम्यांची केवळ नोंद घेत नाही, तर त्या बातम्या समाजावर काय परिणाम करतात याचाही सखोल विचार करतो.

“लोक मौर्य” हे नाव केवळ एका समुदायाचं प्रतिनिधित्व करत नाही, तर ते समतेच्या तत्वावर आधारित न्याय्य समाजरचनेचं प्रतीक आहे. आम्ही प्रत्येक वर्गातील, जातीधर्मातील आणि प्रांतातील लोकांचे मुद्दे, सामाजिक बदल, आणि ऐतिहासिक सत्यता यांचा अभ्यासपूर्वक मागोवा घेतो.

आमचा प्रयत्न आहे की, “लोक मौर्य” हे व्यासपीठ सत्य, विवेक आणि संवेदनशीलतेने समृद्ध असावं. आम्ही कोणत्याही राजकीय पक्षाशी संलग्न नाही, पण जनतेच्या बाजूने ठामपणे उभं राहणं हीच आमची भूमिका आहे.

आम्ही विश्वास ठेवतो – लोकशाही टिकते ती सजग नागरिकांमुळे, आणि सजगता येते माहितीमुळे. “लोक मौर्य” हे त्या सजगतेचं माध्यम आहे.

 

मुख्य संपादक :- राम बनसोडे

संपर्क:- 8446439067

Edtior's Picks

Latest Articles

© 2025 Lok Maurya, All Rights Reserved | Website Developed & Maintained by Swara Infotech | 📞 9096040204
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00