Home पिंपरी चिंचवड पिंपरी-चिंचवडमध्ये ‘कुष्ठरोग शोध मोहीम’ यशस्वीरीत्या संपन्न..

पिंपरी-चिंचवडमध्ये ‘कुष्ठरोग शोध मोहीम’ यशस्वीरीत्या संपन्न..

by Lokmauryanews@gmail.com
0 comments
Spread the love

पिंपरी (दि. ०४ डिसेंबर २०२५):- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वैद्यकीय विभागातर्फे दि. १७ नोव्हेंबर ते २ डिसेंबर या कालावधीत ‘कुष्ठरोग शोध मोहिम’ प्रभावीपणे राबविण्यात आली. आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांच्या अधिपथ्याखाली पार पडलेल्या या संपूर्ण मोहिमेचा उद्देश शहरातील नागरिकांमध्ये कुष्ठरोगाविषयी जनजागृती करणे, रुग्णांचे निदान करणे तसेच वेळेवर उपचार उपलब्ध करून देणे हा होता.

वैद्यकीय विभागाच्या पथकामार्फत संपूर्ण शहरातील विविध वसाहती, झोपडपट्ट्या, घनदाट लोकवस्ती, आर्थिकदृष्ट्या दुर्बल क्षेत्रे तसेच संवेदनशील भागांमध्ये गृहभेटीद्वारे नागरिकांची तपासणी करण्यात आली. मोहिमेदरम्यान पथकाने त्वचेवरील डाग, संवेदना कमी होणे, मुंग्या येणे, सूज, किंवा कुष्ठरोगाची कोणतीही संभाव्य लक्षणे असलेल्या नागरिकांचे बारकाईने परीक्षण केले. संशयित रुग्णांना तत्काळ प्राथमिक औषधोपचार देण्यात आले व पुढील मार्गदर्शन करण्यात आले.

महानगरपालिकेच्या या व्यापक मोहिमेमुळे शहरात कुष्ठरोगाविषयी जनजागृती वाढली असून लक्षणे असलेल्या अनेक नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने तपासणी केली. वैद्यकीय विभागातर्फे मोहिमेदरम्यान समुपदेशन, उपचार, मार्गदर्शन आणि फॉलो-अप यावरही विशेष भर देण्यात आला. शहराच्या आरोग्य रक्षणासाठी महानगरपालिका सतत प्रयत्नशील असून अशा उपक्रमांना नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहकार्य करावे, असे आवाहनही यावेळी करण्यात आले आहे.

वैद्यकीय पथकातर्फे शहरभर गृहभेटी, तपासण्या आणि जनजागृती

banner

सदर मोहिमेसाठी वैद्यकीय विभागाच्या वतीने एकूण २१२ जनांचे पथक तैनात करण्यात आले होते, ज्यामध्ये तज्ञ डॉक्टर, सूपरवायजर व प्रशिक्षित आशा स्वयंसेविका तसेच परूष स्वयंसेवकांचा समावेश होता. सहा. आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अंजली ढोणे यांच्या मार्गदर्शनाखाली या पथकाने एकूण ७९,१७७ घरांना प्रत्यक्ष भेटी दिल्या व सुमारे ३,६१,८५४ व्यक्तींची तपासणी करण्यात आली. सर्वेक्षणादरम्यान ११ रुग्णांना कुष्ठरोग असल्याचे निदान झाले. संशयित रुग्णांना तत्काळ प्राथमिक औषधोपचार देण्यात आले व पुढील मार्गदर्शन करण्यात आले.

“कुष्ठरोग नियंत्रणासाठी लवकर निदान आणि तात्काळ उपचार हा सर्वात प्रभावी मार्ग आहे. महानगरपालिकेच्या वैद्यकीय पथकांनी या मोहिमेदरम्यान ज्या शिस्तबद्ध पद्धतीने सर्वेक्षण करून नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा पोहोचवल्या, त्याचे कौतुक करावे तेवढे कमी आहे. महानगरपालिका नागरिकांच्या आरोग्यविषयक गरजा ओळखून अशा उपक्रमांना अधिक व्यापक स्वरूप देत राहील.”
– विजयकुमार खोराटे, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका.

“कुष्ठरोगाची लक्षणे अनेकदा लहान वाटतात पण त्याकडे दुर्लक्ष केल्यास आजार वाढू शकतो. त्यामुळे वैद्यकीय पथकांनी प्रत्यक्ष लोकांपर्यंत जाऊन केलेले सर्वेक्षण अत्यंत निर्णायक ठरले. तपासणी, उपचार आणि समुपदेशन या तीन गोष्टींनी आपण शहराला कुष्ठमुक्त करण्याच्या दिशेने ठोस पाऊल टाकत आहोत.”
– डॉ. लक्ष्मण गोफणे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी, पिंपरी चिंचवड महानगरपालिका.


Spread the love

You may also like

Leave a Comment

आमच्याबद्दल – लोक मौर्य

“लोक मौर्य” हे एक विश्वासार्ह, अभ्यासपूर्ण आणि जनतेच्या आवाजाला प्रतिष्ठा देणारे डिजिटल वेबपोर्टल आहे. आम्ही बातम्यांची केवळ नोंद घेत नाही, तर त्या बातम्या समाजावर काय परिणाम करतात याचाही सखोल विचार करतो.

“लोक मौर्य” हे नाव केवळ एका समुदायाचं प्रतिनिधित्व करत नाही, तर ते समतेच्या तत्वावर आधारित न्याय्य समाजरचनेचं प्रतीक आहे. आम्ही प्रत्येक वर्गातील, जातीधर्मातील आणि प्रांतातील लोकांचे मुद्दे, सामाजिक बदल, आणि ऐतिहासिक सत्यता यांचा अभ्यासपूर्वक मागोवा घेतो.

आमचा प्रयत्न आहे की, “लोक मौर्य” हे व्यासपीठ सत्य, विवेक आणि संवेदनशीलतेने समृद्ध असावं. आम्ही कोणत्याही राजकीय पक्षाशी संलग्न नाही, पण जनतेच्या बाजूने ठामपणे उभं राहणं हीच आमची भूमिका आहे.

आम्ही विश्वास ठेवतो – लोकशाही टिकते ती सजग नागरिकांमुळे, आणि सजगता येते माहितीमुळे. “लोक मौर्य” हे त्या सजगतेचं माध्यम आहे.

 

मुख्य संपादक :- राम बनसोडे

संपर्क:- 8446439067

Edtior's Picks

Latest Articles

© 2025 Lok Maurya, All Rights Reserved | Website Developed & Maintained by Swara Infotech | 📞 9096040204
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00