Home पिंपरी चिंचवड वैयक्तिक सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाल्यास कायदेशीर हक्क वापरा – ॲड. अक्षता नेटके..

वैयक्तिक सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाल्यास कायदेशीर हक्क वापरा – ॲड. अक्षता नेटके..

by Lokmauryanews@gmail.com
0 comments
Spread the love

पिंपरी (दि. ०५ डिसेंबर २०२५) :- विद्यार्थिनींनी प्रवास करत असताना, सार्वजनिक ठिकाणी वावरत असताना स्वसंरक्षण याबाबत जागरूक राहिले पाहिजे. प्रत्येकीने आपल्या मोबाईल मध्ये सुरक्षिततेसाठी दामिनी पथकाचा नंबर सेव्ह करून ठेवावा. रिक्षा, टॅक्सी सारख्या सार्वजनिक वाहनातून प्रवास करण्याअगोदर ‘पॅनिक बटन’ कसे वापरावे हे समजून घ्यावे. वैयक्तिक सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाल्यास कायदेशीर हक्क वापरा असे आवाहन ॲड.अक्षता नेटके यांनी केले.

आहार आणि मानसिक स्वास्थ चांगले असल्यास करिअर वर लक्ष केंद्रित करता येते. आपला आहार उत्तम असेल तर रोग प्रतिकार शक्ती वाढण्यासाठी उपयोग होतो, असे मार्गदर्शन डॉ. मिताली मोरे यांनी केले.

पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) एस. बी. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (एसबीपीआयएम) तर्फे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, बोर्ड ऑफ स्टुडंट्स डेव्हलपमेंट विभागाच्या सहकार्याने ‘निर्भया जनजागृती’ सत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी एसबीपीआयएमच्या संचालिका डॉ. किर्ती धारवाडकर, डॉ. मिताली मोरे, समन्वयक डॉ. रूपाली कुदारे, विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. काजल महेश्वरी आदी उपस्थित होते.

या सत्रात ॲड.अक्षता नेटके यांनी वैयक्तिक सुरक्षितता आणि डॉ. मिताली मोरे यांनी मानसिक स्वास्थ्य या विषयावर मार्गदर्शन केले.

banner

एसबीपीआयएमच्या संचालिका डॉ. किर्ती धारवाडकर यांनी प्रास्ताविक करताना सांगितले की, पीसीईटीच्या एसबीपीआयएम महाविद्यालयात विद्यार्थिनींमध्ये जागरूकता निर्माण व्हावी यासाठी अनेक उपक्रम राबविण्यात येतात.

स्वागत, प्रास्ताविक डॉ. किर्ती धारवाडकर, सूत्रसंचालन विद्यार्थिनी श्रावणी कनोरे आणि वर्षिणी गिरीश यांनी केले. आभार डॉ. काजल महेश्वरी यांनी मानले.
पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन करण्यात आले होते.


Spread the love

You may also like

Leave a Comment

आमच्याबद्दल – लोक मौर्य

“लोक मौर्य” हे एक विश्वासार्ह, अभ्यासपूर्ण आणि जनतेच्या आवाजाला प्रतिष्ठा देणारे डिजिटल वेबपोर्टल आहे. आम्ही बातम्यांची केवळ नोंद घेत नाही, तर त्या बातम्या समाजावर काय परिणाम करतात याचाही सखोल विचार करतो.

“लोक मौर्य” हे नाव केवळ एका समुदायाचं प्रतिनिधित्व करत नाही, तर ते समतेच्या तत्वावर आधारित न्याय्य समाजरचनेचं प्रतीक आहे. आम्ही प्रत्येक वर्गातील, जातीधर्मातील आणि प्रांतातील लोकांचे मुद्दे, सामाजिक बदल, आणि ऐतिहासिक सत्यता यांचा अभ्यासपूर्वक मागोवा घेतो.

आमचा प्रयत्न आहे की, “लोक मौर्य” हे व्यासपीठ सत्य, विवेक आणि संवेदनशीलतेने समृद्ध असावं. आम्ही कोणत्याही राजकीय पक्षाशी संलग्न नाही, पण जनतेच्या बाजूने ठामपणे उभं राहणं हीच आमची भूमिका आहे.

आम्ही विश्वास ठेवतो – लोकशाही टिकते ती सजग नागरिकांमुळे, आणि सजगता येते माहितीमुळे. “लोक मौर्य” हे त्या सजगतेचं माध्यम आहे.

 

मुख्य संपादक :- राम बनसोडे

संपर्क:- 8446439067

Edtior's Picks

Latest Articles

© 2025 Lok Maurya, All Rights Reserved | Website Developed & Maintained by Swara Infotech | 📞 9096040204
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00