Home पिंपरी चिंचवड देहू–येलवाडी रस्त्याचे काम तातडीने सुरू करा..

देहू–येलवाडी रस्त्याचे काम तातडीने सुरू करा..

by Lokmauryanews@gmail.com
0 comments
Spread the love

पिंपरी (दि. ०५ डिसेंबर २०२५) :- पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (PMRDA) आयुक्त योगेश म्हसे यांच्यासोबत मावळ तालुक्यातील विविध विकासकामांचा सविस्तर आढावा घेण्यासाठी आमदार सुनील शेळके यांच्या प्रमुख उपस्थितीत उच्चस्तरीय बैठक पार पडली.

मावळच्या प्राधान्य असलेल्या प्रकल्पांना तात्काळ चालना देण्यासाठी मंजूर आणि निविदा प्रक्रिया पूर्ण झालेल्या सर्व कामांना लगेच सुरुवात करण्याबाबत या बैठकीत ठोस चर्चा झाली.

देहू–येलवाडी रस्ता तातडीने सुरू करणे, परंडवाल चौक–देहू ते तळवडे रस्त्याच्या दुसऱ्या टप्प्याची निविदा प्रक्रिया पूर्ण करणे, पावसामुळे रखडलेली रस्त्यांची कामे पूर्णत्वाकडे नेणे, पुणे–मुंबई महामार्गावरील चौकांचे रुंदीकरण व सुशोभीकरण, गडकिल्ल्यांकडे जाणाऱ्या रस्त्यांचे सुधारणा काम तसेच इंद्रायणी व पवना नदीतील प्रदूषण रोखण्यासाठीच्या तातडीच्या उपाययोजनांवरही सखोल चर्चा झाली.

या बैठकीत आमदार सुनील शेळके यानी सर्व कामे गतीने व दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले. PMRDA आयुक्त योगेश म्हसे यांच्यासह बांधकाम विभागाचे आणि इतर संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित असलेल्या या बैठकीत मावळ तालुक्यातील सर्व प्रकल्पांना गती देण्यासाठी आवश्यक कार्यवाही तत्काळ करण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात आले. मावळच्या सर्वांगीण विकासासाठी आमदार शेळके यांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा आणि दूरदृष्टी यामुळे विकासकामांना नवाच वेग मिळत असल्याचे या बैठकीतून स्पष्ट झाले.

banner

Spread the love

You may also like

Leave a Comment

आमच्याबद्दल – लोक मौर्य

“लोक मौर्य” हे एक विश्वासार्ह, अभ्यासपूर्ण आणि जनतेच्या आवाजाला प्रतिष्ठा देणारे डिजिटल वेबपोर्टल आहे. आम्ही बातम्यांची केवळ नोंद घेत नाही, तर त्या बातम्या समाजावर काय परिणाम करतात याचाही सखोल विचार करतो.

“लोक मौर्य” हे नाव केवळ एका समुदायाचं प्रतिनिधित्व करत नाही, तर ते समतेच्या तत्वावर आधारित न्याय्य समाजरचनेचं प्रतीक आहे. आम्ही प्रत्येक वर्गातील, जातीधर्मातील आणि प्रांतातील लोकांचे मुद्दे, सामाजिक बदल, आणि ऐतिहासिक सत्यता यांचा अभ्यासपूर्वक मागोवा घेतो.

आमचा प्रयत्न आहे की, “लोक मौर्य” हे व्यासपीठ सत्य, विवेक आणि संवेदनशीलतेने समृद्ध असावं. आम्ही कोणत्याही राजकीय पक्षाशी संलग्न नाही, पण जनतेच्या बाजूने ठामपणे उभं राहणं हीच आमची भूमिका आहे.

आम्ही विश्वास ठेवतो – लोकशाही टिकते ती सजग नागरिकांमुळे, आणि सजगता येते माहितीमुळे. “लोक मौर्य” हे त्या सजगतेचं माध्यम आहे.

 

मुख्य संपादक :- राम बनसोडे

संपर्क:- 8446439067

Edtior's Picks

Latest Articles

© 2025 Lok Maurya, All Rights Reserved | Website Developed & Maintained by Swara Infotech | 📞 9096040204
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00