Home पिंपरी चिंचवड पिंपरीत ६ डिसेंबरला दुपारी १२ ते रात्री १० दरम्यान वाहतुकीत बदल..

पिंपरीत ६ डिसेंबरला दुपारी १२ ते रात्री १० दरम्यान वाहतुकीत बदल..

by Lokmauryanews@gmail.com
0 comments
Spread the love

पिंपरी (दि. ०५ डिसेंबर २०२५) :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त ६ डिसेंबर रोजी पिंपरी चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा स्मारक येथे मोठी गर्दी होण्याची शक्यता असल्याने पिंपरी-चिंचवड वाहतूक शाखेकडून विशेष वाहतूक बदल लागू करण्यात आले आहेत.

दुपारी १२ ते रात्री १० या वेळेत हे बदल राहणार असून, वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त विवेक पाटील यांनी केले आहे.

या मार्गांवर प्रवेशबंदी :

महावीर चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक (सेवा रस्ता)
पर्यायी मार्ग : डी-मार्ट इन – ग्रेडसेपरेटरमार्गे प्रवास करावा.

banner

नाशिक फाटा चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक (सेवा रस्ता)
पर्यायी मार्ग : डेअरी फार्म ग्रेडसेपरेटर इन तसेच खराळवाडी येथील एच. पी. पेट्रोल पंप समोरील ग्रेडसेपरेटरचा वापर करावा.

स्व. इंदिरा गांधी पूल, पिंपरी रेल्वे स्थानक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक
पर्यायी मार्ग : मोरवाडी चौकमार्गे पुढे जावे.

नेहरूनगर चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक
पर्यायी मार्ग : एच. ए. कॉर्नर बसथांबा – मासुळकर कॉलनीमार्गे प्रवास करावा.

महापरिनिर्वाण दिनानिमित्त वाढलेल्या वाहतुकीचा ताण लक्षात घेता हे बदल करण्यात आले असून नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


Spread the love

You may also like

Leave a Comment

आमच्याबद्दल – लोक मौर्य

“लोक मौर्य” हे एक विश्वासार्ह, अभ्यासपूर्ण आणि जनतेच्या आवाजाला प्रतिष्ठा देणारे डिजिटल वेबपोर्टल आहे. आम्ही बातम्यांची केवळ नोंद घेत नाही, तर त्या बातम्या समाजावर काय परिणाम करतात याचाही सखोल विचार करतो.

“लोक मौर्य” हे नाव केवळ एका समुदायाचं प्रतिनिधित्व करत नाही, तर ते समतेच्या तत्वावर आधारित न्याय्य समाजरचनेचं प्रतीक आहे. आम्ही प्रत्येक वर्गातील, जातीधर्मातील आणि प्रांतातील लोकांचे मुद्दे, सामाजिक बदल, आणि ऐतिहासिक सत्यता यांचा अभ्यासपूर्वक मागोवा घेतो.

आमचा प्रयत्न आहे की, “लोक मौर्य” हे व्यासपीठ सत्य, विवेक आणि संवेदनशीलतेने समृद्ध असावं. आम्ही कोणत्याही राजकीय पक्षाशी संलग्न नाही, पण जनतेच्या बाजूने ठामपणे उभं राहणं हीच आमची भूमिका आहे.

आम्ही विश्वास ठेवतो – लोकशाही टिकते ती सजग नागरिकांमुळे, आणि सजगता येते माहितीमुळे. “लोक मौर्य” हे त्या सजगतेचं माध्यम आहे.

 

मुख्य संपादक :- राम बनसोडे

संपर्क:- 8446439067

Edtior's Picks

Latest Articles

© 2025 Lok Maurya, All Rights Reserved | Website Developed & Maintained by Swara Infotech | 📞 9096040204
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00