Home पिंपरी चिंचवड भाजपाकडे अर्ज जमा करून निशा यादव निवडणूक रणांगणात!..

भाजपाकडे अर्ज जमा करून निशा यादव निवडणूक रणांगणात!..

by Lokmauryanews@gmail.com
0 comments
Spread the love

पिंपरी (दि.०९ डिसेंबर २०२५):- प्रभाग क्रमांक ११ मधील सेवाभावी कार्यासाठी ओळख असलेल्या इंद्रायणी महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्षा निशा (निशाताई) यादव यांनी मंगळवारी (दि. 9)
भारतीय जनता पक्षाकडून अधिकृतरित्या अर्ज जमा करून निवडणूक प्रचाराला सुरुवात केली. पक्षाच्या स्थानिक कार्यालयात झालेल्या या प्रक्रियेला महिला कार्यकर्त्या, युवक आणि ग्रामस्थांची मोठी उपस्थिती लाभली. यावेळी त्यांनी प्रभाग विकासाची ग्वाही दिली.

निशा यादव या भाजपा युवा मोर्चाचे शहराध्यक्ष दिनेश यादव यांच्या सौभाग्यवती असून, प्रभागातील स्वच्छता, महिला सक्षमीकरण, स्थानिक विकास, नागरिकांच्या अडचणी आणि सामाजिक उपक्रमांमध्ये त्यांनी सातत्याने सक्रिय भूमिका बजावली आहे. आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी हा अर्ज आज जमा केला. यावेळी शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, सरचिटणीस मधुकर बच्चे उपस्थित होते.

अर्ज जमा केल्यानंतर बोलताना निशाताईंनी प्रभागाच्या सर्वांगीण विकासाचा निर्धार व्यक्त करत नागरिकांना विश्वास दिला की, ‘‘विकासकामे, महिला सक्षमीकरण, स्वच्छता, पायाभूत सुविधा आणि तरुणांसाठी संधी या प्रत्येक बाबींवर आम्ही प्रामाणिकपणे काम करू. प्रभाग क्रमांक ११ मधील प्रत्येक नागरिकाचा प्रश्न हा माझा स्वतःचा प्रश्न आहे. जनतेच्या सहकार्याने आपला प्रभाग आदर्श प्रभाग बनवण्याचे स्वप्न आम्ही निश्चितपणे पूर्ण करू.’’

लाडक्या बहिणींकडून स्वागत.

banner

इंद्रायणी महिला प्रतिष्ठानच्या माध्यमातून निशाताई यादव यांनी अनेक महत्त्वाचे उपक्रम महिलांसाठी राबवले आहेत त्यामुळे लाडक्या बहिणीकडून निशाताई यादव यांना जोरदार पाठिंबा आहे. प्रभागातील स्थानिक महिलांनी आणि नागरिकांनीही निशाताईं शुभेच्छा देऊन त्यांना पाठिंबा जाहीर केला आहे. आगामी निवडणुकीत निशाताई यादव यांची उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता वाढल्याने प्रभागातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून पिंपरी चिंचवड शहराला विकासाची गती मिळाली आहे हीच विकासाची गती कायम ठेवण्यासाठी भाजपा पक्षाच्या माध्यमातून उमेदवारी अर्ज घेतला आहे. आगामी काळात भाजपच्या ध्येय धोरणानुसार सबका साथ सबका विकास याच तत्वावर काम करायचे आहे. आमदार महेश लांडगे यांच्या विकसित शहराच्या संकल्पनेला हातभार लावायचा आहे.


Spread the love

You may also like

Leave a Comment

आमच्याबद्दल – लोक मौर्य

“लोक मौर्य” हे एक विश्वासार्ह, अभ्यासपूर्ण आणि जनतेच्या आवाजाला प्रतिष्ठा देणारे डिजिटल वेबपोर्टल आहे. आम्ही बातम्यांची केवळ नोंद घेत नाही, तर त्या बातम्या समाजावर काय परिणाम करतात याचाही सखोल विचार करतो.

“लोक मौर्य” हे नाव केवळ एका समुदायाचं प्रतिनिधित्व करत नाही, तर ते समतेच्या तत्वावर आधारित न्याय्य समाजरचनेचं प्रतीक आहे. आम्ही प्रत्येक वर्गातील, जातीधर्मातील आणि प्रांतातील लोकांचे मुद्दे, सामाजिक बदल, आणि ऐतिहासिक सत्यता यांचा अभ्यासपूर्वक मागोवा घेतो.

आमचा प्रयत्न आहे की, “लोक मौर्य” हे व्यासपीठ सत्य, विवेक आणि संवेदनशीलतेने समृद्ध असावं. आम्ही कोणत्याही राजकीय पक्षाशी संलग्न नाही, पण जनतेच्या बाजूने ठामपणे उभं राहणं हीच आमची भूमिका आहे.

आम्ही विश्वास ठेवतो – लोकशाही टिकते ती सजग नागरिकांमुळे, आणि सजगता येते माहितीमुळे. “लोक मौर्य” हे त्या सजगतेचं माध्यम आहे.

 

मुख्य संपादक :- राम बनसोडे

संपर्क:- 8446439067

Edtior's Picks

Latest Articles

© 2025 Lok Maurya, All Rights Reserved | Website Developed & Maintained by Swara Infotech | 📞 9096040204
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00