Home पिंपरी चिंचवड रहाटणी-पिंपळे सौदागर मंडळ अध्यक्ष सोमनाथ तापकीरांना भाजपची उमेदवारी फिक्स?..

रहाटणी-पिंपळे सौदागर मंडळ अध्यक्ष सोमनाथ तापकीरांना भाजपची उमेदवारी फिक्स?..

by Lokmauryanews@gmail.com
0 comments
Spread the love

पिंपरी-चिंचवड (दि. १० डिसेंबर २०२५) :- पिंपरी चिंचवड महापालिकेची निवडणुक जाहीर होताच सर्वच पक्षांमध्ये तिकीट मिळवण्यासाठी इच्छुकांची रस्सीखेच सुरू झाली आहे. विशेषतः भारतीय जनता पक्षाकडे सर्वाधिक इच्छुक उमेदवारीसाठी पुढे येत असून, पक्षाने ९ आणि १० डिसेंबर रोजी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागितले आहेत. अर्ज जमा करण्याची प्रक्रियाही सुरू केली आहे.

दरम्यान प्रभाग क्रमांक २२ मधून सोमनाथ तापकीर यांनी मंगळवारी ९ डिसेंबर २०२५ रोजी मोठ्या उत्साहात आपला उमेदवारी अर्ज पिंपरी-चिंचवड शहर भाजप जिल्हाध्यक्ष शत्रुघ्न बापू काटे यांच्या हस्ते सुपूर्त केला.

प्रभाग क्रमांक २२ मध्ये सोमनाथ तापकीर यांचे गेल्या अनेक वर्षांपासून उल्लेखनीय समाजकारण सुरू आहे. प्रभागातील जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी ते नेहमीच पुढाकार घेत असल्यामुळे नागरिक त्यांच्यावर विशेष विश्वास ठेवतात. पाणी, सांडपाणी, रस्ते, वीज यांसारख्या स्थानिक अडचणींसाठी नागरिक सरळ तापकीर यांच्या संपर्कात येतात आणि ते प्रश्न मार्गी लावण्यासाठी तत्परतेने कार्य करतात.

त्यांच्या सातत्यपूर्ण कामगिरीला आणि पक्षनिष्ठेला ओळखूनच पक्षश्रेष्ठींनी त्यांना रहाटणी–पिंपळे सौदागर मंडळ अध्यक्षपदाची जबाबदारी दिलेली आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत भाजपची उमेदवारी सोमनाथ तापकीर यांच्याच नावावर निश्चित होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात असून, प्रभागात त्यांच्या उमेदवारीभोवती चांगलीच चर्चा सुरू आहे.

banner

Spread the love

You may also like

Leave a Comment

आमच्याबद्दल – लोक मौर्य

“लोक मौर्य” हे एक विश्वासार्ह, अभ्यासपूर्ण आणि जनतेच्या आवाजाला प्रतिष्ठा देणारे डिजिटल वेबपोर्टल आहे. आम्ही बातम्यांची केवळ नोंद घेत नाही, तर त्या बातम्या समाजावर काय परिणाम करतात याचाही सखोल विचार करतो.

“लोक मौर्य” हे नाव केवळ एका समुदायाचं प्रतिनिधित्व करत नाही, तर ते समतेच्या तत्वावर आधारित न्याय्य समाजरचनेचं प्रतीक आहे. आम्ही प्रत्येक वर्गातील, जातीधर्मातील आणि प्रांतातील लोकांचे मुद्दे, सामाजिक बदल, आणि ऐतिहासिक सत्यता यांचा अभ्यासपूर्वक मागोवा घेतो.

आमचा प्रयत्न आहे की, “लोक मौर्य” हे व्यासपीठ सत्य, विवेक आणि संवेदनशीलतेने समृद्ध असावं. आम्ही कोणत्याही राजकीय पक्षाशी संलग्न नाही, पण जनतेच्या बाजूने ठामपणे उभं राहणं हीच आमची भूमिका आहे.

आम्ही विश्वास ठेवतो – लोकशाही टिकते ती सजग नागरिकांमुळे, आणि सजगता येते माहितीमुळे. “लोक मौर्य” हे त्या सजगतेचं माध्यम आहे.

 

मुख्य संपादक :- राम बनसोडे

संपर्क:- 8446439067

Edtior's Picks

Latest Articles

© 2025 Lok Maurya, All Rights Reserved | Website Developed & Maintained by Swara Infotech | 📞 9096040204
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00