Home पिंपरी चिंचवड वाकड ते मामुर्डी रस्ता होणार ‘सुसाट’!

वाकड ते मामुर्डी रस्ता होणार ‘सुसाट’!

by Lokmauryanews@gmail.com
0 comments
Spread the love

पिंपरी (दि. ८ नोव्हेंबर २०२५) :- चिंचवड मतदारसंघातून जाणाऱ्या मुंबई-बंगळुरू महामार्गावरील वाकड, पुनावळे, ताथवडे, मामुर्डी, रावेत आणि किवळे परिसरातील सेवा रस्त्यांच्या प्रलंबित कामांना आता गती मिळणार आहे. आमदार शंकर जगताप यांच्या पुढाकारातून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) अधिकाऱ्यांसमवेत आज चिंचवडमधील पिंपळे गुरव येथील कार्यालयात महत्त्वाची आढावा बैठक घेण्यात आली.

या बैठकीत भुमकर चौक ते ताथवडे, ताथवडे ते पुनावळे अंडरपास आणि मुळा नदी ते भुमकर चौक दरम्यानच्या सेवा रस्त्यांचे काम तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश आमदार जगताप यांनी दिले. पावसाळी पाणी निचरा, सांडपाणी वाहिनी, आणि इतर सेवांसाठी डक्ट व्यवस्था उभारण्यावरही त्यांनी भर दिला. तसेच, अपूर्ण जमिनींचे भूसंपादन आणि रस्त्यांची उच्च गुणवत्ता राखण्यासाठी स्पष्ट सूचना देण्यात आल्या.

बैठकीस राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक संजय कदम, तांत्रिक व्यवस्थापक अंकित यादव, कार्यकारी अभियंता सुभाष घंटे, समन्वयक विनोद पाटील आणि हरिंद्र यादव उपस्थित होते.

आमदार जगताप म्हणाले, “ताथवडे, पुनावळे, वाकड परिसर झपाट्याने विकसित होत आहे. हा भाग हिंजवडी आयटी पार्कच्या जवळ असल्याने वाहतूक दाब मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे सेवा रस्त्यांचे डांबरीकरण आणि सबवे कामे तातडीने पूर्ण करणे अत्यावश्यक आहे.” त्यांनी पुढे सांगितले की, “या रस्त्यांची गुणवत्ता अशी असावी की पुढील ५० वर्षांपर्यंत पुन्हा दुरुस्तीची वेळ येऊ नये. नागरिकांना सुसाट वाहतूक सुविधा मिळणे हेच आमचे उद्दिष्ट आहे.”

banner

आमदारांनी सांगितले की, “पुनावळे, ताथवडे आणि वाकड अंडरपास येथे ‘बॉक्स पुशअप’ तंत्रज्ञानाद्वारे कामे हाती घेण्यात येणार असून लवकरच निविदा प्रक्रिया पूर्ण केली जाईल. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकारात येणाऱ्या या सेवा रस्त्यांची कामे महापालिकेच्या अखत्यारीत नसल्याने, एनएचएआय अधिकाऱ्यांनी ती तातडीने पूर्ण करावीत अशा सूचना दिल्या आहेत. या कामांमुळे वाकड ते मामुर्डीपर्यंतचा रस्ता खरोखरच ‘सुसाट’ होईल.”


Spread the love

You may also like

Leave a Comment

आमच्याबद्दल – लोक मौर्य

“लोक मौर्य” हे एक विश्वासार्ह, अभ्यासपूर्ण आणि जनतेच्या आवाजाला प्रतिष्ठा देणारे डिजिटल वेबपोर्टल आहे. आम्ही बातम्यांची केवळ नोंद घेत नाही, तर त्या बातम्या समाजावर काय परिणाम करतात याचाही सखोल विचार करतो.

“लोक मौर्य” हे नाव केवळ एका समुदायाचं प्रतिनिधित्व करत नाही, तर ते समतेच्या तत्वावर आधारित न्याय्य समाजरचनेचं प्रतीक आहे. आम्ही प्रत्येक वर्गातील, जातीधर्मातील आणि प्रांतातील लोकांचे मुद्दे, सामाजिक बदल, आणि ऐतिहासिक सत्यता यांचा अभ्यासपूर्वक मागोवा घेतो.

आमचा प्रयत्न आहे की, “लोक मौर्य” हे व्यासपीठ सत्य, विवेक आणि संवेदनशीलतेने समृद्ध असावं. आम्ही कोणत्याही राजकीय पक्षाशी संलग्न नाही, पण जनतेच्या बाजूने ठामपणे उभं राहणं हीच आमची भूमिका आहे.

आम्ही विश्वास ठेवतो – लोकशाही टिकते ती सजग नागरिकांमुळे, आणि सजगता येते माहितीमुळे. “लोक मौर्य” हे त्या सजगतेचं माध्यम आहे.

 

मुख्य संपादक :- राम बनसोडे

संपर्क:- 8446439067

Edtior's Picks

Latest Articles

© 2025 Lok Maurya, All Rights Reserved | Website Developed & Maintained by Swara Infotech | 📞 9096040204
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00