Home पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीच्या तोंडावर विक्रांत बगाडे यांची अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती..

महापालिका निवडणुकीच्या तोंडावर विक्रांत बगाडे यांची अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती..

by Lokmauryanews@gmail.com
0 comments
Spread the love

पिंपरी (दि. १५ डिसेंबर २०२५):- पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने महत्त्वाचा प्रशासकीय निर्णय घेत अतिरिक्त आयुक्तपदी विक्रांत बगाडे यांची नियुक्ती केली आहे. राज्य शासनाकडून त्यांची अतिरिक्त आयुक्तपदी-१ प्रतिनियुक्ती करण्यात आली असून, साधारण महिनाभरापासून रिक्त असलेले हे पद अखेर भरले आहे. नगरविकास विभागाच्या उपसचिव प्रियंका कुलकर्णी-छापवाले यांनी यासंदर्भातील आदेश जारी केले आहेत.

पिंपरी-चिंचवड महापालिकेचा ‘ब’ वर्गात समावेश झाल्याने येथे तीन अतिरिक्त आयुक्तांची पदे मंजूर आहेत. यामध्ये अतिरिक्त आयुक्त-१ व २ ही पदे प्रतिनियुक्तीने, तर अतिरिक्त आयुक्त-३ हे पद स्थानिक अधिकाऱ्यांसाठी पदोन्नतीने भरण्याची तरतूद आहे. राज्याच्या वित्त व नियोजन विभागातील प्रदीप जांभळे-पाटील यांची प्रतिनियुक्ती ३१ ऑक्टोबर रोजी संपुष्टात आली होती. निवडणूक कामकाजामुळे त्यांना १५ नोव्हेंबर रोजी कार्यमुक्त करण्यात आले आणि तेव्हापासून अतिरिक्त आयुक्तपद रिक्त होते.

सध्या महापालिकेत मुख्याधिकारी संवर्गातील विजयकुमार खोराटे आणि तृप्ती सांडभोर हे अतिरिक्त आयुक्त म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्यासोबत आता विक्रांत बगाडे यांची नियुक्ती करण्यात आली असून, त्यांची प्रतिनियुक्ती दोन वर्षांसाठी असणार आहे.

यापूर्वी महसूल संवर्गातील सोलापूरच्या अपर जिल्हाधिकारी मोनिकासिंह ठाकूर यांची अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती जाहीर झाली होती. मात्र, नगरविकास विभागाचा आदेश न मिळाल्याने प्रशासकीय अडसर निर्माण झाला आणि त्यांचे नाव आता मागे पडले आहे.

banner

दरम्यान, महापालिकेचे तत्कालीन आयुक्त शेखर सिंह यांची ७ ऑक्टोबर २०२५ रोजी नाशिक कुंभमेळा आयुक्तपदी बदली झाली. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्वतंत्र व पूर्णवेळ आयुक्त आवश्यक असताना, सध्या महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांच्याकडे आयुक्तपदाचा अतिरिक्त पदभार देण्यात आला आहे. त्यामुळे महापालिकेला पूर्णवेळ आयुक्त कधी मिळणार, याबाबत महापालिका वर्तुळात चर्चा सुरू आहे.


Spread the love

You may also like

Leave a Comment

आमच्याबद्दल – लोक मौर्य

“लोक मौर्य” हे एक विश्वासार्ह, अभ्यासपूर्ण आणि जनतेच्या आवाजाला प्रतिष्ठा देणारे डिजिटल वेबपोर्टल आहे. आम्ही बातम्यांची केवळ नोंद घेत नाही, तर त्या बातम्या समाजावर काय परिणाम करतात याचाही सखोल विचार करतो.

“लोक मौर्य” हे नाव केवळ एका समुदायाचं प्रतिनिधित्व करत नाही, तर ते समतेच्या तत्वावर आधारित न्याय्य समाजरचनेचं प्रतीक आहे. आम्ही प्रत्येक वर्गातील, जातीधर्मातील आणि प्रांतातील लोकांचे मुद्दे, सामाजिक बदल, आणि ऐतिहासिक सत्यता यांचा अभ्यासपूर्वक मागोवा घेतो.

आमचा प्रयत्न आहे की, “लोक मौर्य” हे व्यासपीठ सत्य, विवेक आणि संवेदनशीलतेने समृद्ध असावं. आम्ही कोणत्याही राजकीय पक्षाशी संलग्न नाही, पण जनतेच्या बाजूने ठामपणे उभं राहणं हीच आमची भूमिका आहे.

आम्ही विश्वास ठेवतो – लोकशाही टिकते ती सजग नागरिकांमुळे, आणि सजगता येते माहितीमुळे. “लोक मौर्य” हे त्या सजगतेचं माध्यम आहे.

 

मुख्य संपादक :- राम बनसोडे

संपर्क:- 8446439067

Edtior's Picks

Latest Articles

© 2025 Lok Maurya, All Rights Reserved | Website Developed & Maintained by Swara Infotech | 📞 9096040204
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00