Home मुंबई राज्याच्या विधानसभा आणि विधानपरिषद सदस्यांचा लंडन दौरा..

राज्याच्या विधानसभा आणि विधानपरिषद सदस्यांचा लंडन दौरा..

by Lokmauryanews@gmail.com
0 comments
Spread the love

मुंबई प्रतिनिधी (दि. 8 फेब्रुवारी २०२६) :- राज्याच्या विधानसभा आणि विधानपरिषद सदस्यांचा लंडन अभ्यास दौरा आयोजित करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामध्ये पिंपरी-चिंचवडमधून विधानपरिषद आमदार अमित गोरखे यांचीही निवड करण्यात आली आहे. हा दौरा १५ फेब्रुवारी ते २२ फेब्रुवारी २०२६ दरम्यान पार पडणार आहे. आ. अमित गोरखे यांच्या सहभागामुळे शहराच्या दृष्टीने या दौर्‍याकडून अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहेत.

 

दरम्यान या दौर्‍यामध्ये राज्यातील एकूण १५ आमदारांचा समावेश असून त्यात भाजपकडून आ. अमित गोरखे यांच्यासह विक्रांत पाटील आणि निरंजन डावखरे, विश्वजित कदम, शिवसेनेकडून मनीषा कायंदे तर उबाठाकडून सरदेसाई यांचा समावेश आहे.

 

banner

दरम्यान सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, लंडनमध्ये शहरी प्रशासन, पायाभूत सुविधा, नागरिकांना पुरवल्या जाणाऱ्या सार्वजनिक सेवा तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कामकाजाचा अभ्यास या दौर्‍यादरम्यान करण्यात येणार आहे. राज्यात महापालिका निवडणुकांनंतर सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांची रणधुमाळी सुरू असताना हा अभ्यास दौरा आयोजित करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

 

या अभ्यास दौर्‍यामध्ये बाबासाहेब देशमुख, परिणय फुके, विक्रम पाचपुते, नमिता मुंदडा, निरंजन डावखरे, स्नेहा दुबे, विक्रांत पाटील, अमित गोरखे, विक्रम काळे, विश्वजीत कदम, वरुण सरदेसाई, मनिषा कायंदे, सुमित वानखेडे आणि योगेश टिळेकर या आमदारांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. इतर काही आमदारांची नावे अद्याप जाहीर करण्यात आलेली नाहीत. दरम्यान, या दौर्‍यामागील नेमके उद्दिष्ट आणि प्रशासकीय अभ्यासाचे स्वरूप याबाबत अधिकृत माहिती अद्याप स्पष्ट करण्यात आलेली नाही. मुख्यमंत्री व विधानसभा सभापती या दौऱ्यात काही दिवस असणार आहेत का? हे बघणे देखील औचित्यचे ठरणार आहे.


Spread the love

You may also like

Leave a Comment

आमच्याबद्दल – लोक मौर्य

“लोक मौर्य” हे एक विश्वासार्ह, अभ्यासपूर्ण आणि जनतेच्या आवाजाला प्रतिष्ठा देणारे डिजिटल वेबपोर्टल आहे. आम्ही बातम्यांची केवळ नोंद घेत नाही, तर त्या बातम्या समाजावर काय परिणाम करतात याचाही सखोल विचार करतो.

“लोक मौर्य” हे नाव केवळ एका समुदायाचं प्रतिनिधित्व करत नाही, तर ते समतेच्या तत्वावर आधारित न्याय्य समाजरचनेचं प्रतीक आहे. आम्ही प्रत्येक वर्गातील, जातीधर्मातील आणि प्रांतातील लोकांचे मुद्दे, सामाजिक बदल, आणि ऐतिहासिक सत्यता यांचा अभ्यासपूर्वक मागोवा घेतो.

आमचा प्रयत्न आहे की, “लोक मौर्य” हे व्यासपीठ सत्य, विवेक आणि संवेदनशीलतेने समृद्ध असावं. आम्ही कोणत्याही राजकीय पक्षाशी संलग्न नाही, पण जनतेच्या बाजूने ठामपणे उभं राहणं हीच आमची भूमिका आहे.

आम्ही विश्वास ठेवतो – लोकशाही टिकते ती सजग नागरिकांमुळे, आणि सजगता येते माहितीमुळे. “लोक मौर्य” हे त्या सजगतेचं माध्यम आहे.

 

मुख्य संपादक :- राम बनसोडे

संपर्क:- 8446439067

Edtior's Picks

Latest Articles

© 2025 Lok Maurya, All Rights Reserved | Website Developed & Maintained by Swara Infotech | 📞 9096040204
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00