Home पिंपरी चिंचवड वैयक्तिक आनंदापेक्षा सहकाऱ्यांच्या दुःखात सहभागी होण्याची शिंदे साहेबांची भूमिका हीच, शिवसेनेच्या संस्कारांची ओळख – सुलभाताई उबाळे..

वैयक्तिक आनंदापेक्षा सहकाऱ्यांच्या दुःखात सहभागी होण्याची शिंदे साहेबांची भूमिका हीच, शिवसेनेच्या संस्कारांची ओळख – सुलभाताई उबाळे..

by Lokmauryanews@gmail.com
0 comments
Spread the love

चिंचवडगाव (दि. ०9 फेब्रुवारी २०२६) :- राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे प्रमुख एकनाथ शिंदे यांचा सोमवारी वाढदिवस आहे. मात्र महायुतीतील घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या अकाली अपघाती निधनाच्या पार्श्वभूमीवर शिंदे यांनी आपला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. महायुती हा परिवार असून घरात दुःखाचे वातावरण असताना कोणताही आनंदोत्सव साजरा करू नये, वाढदिवस येत-जात राहतात, असे आवाहन त्यांनी शिवसैनिकांना केले आहे.

शिंदे यांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत पिंपरी-चिंचवड शहर शिवसेनेच्या वतीने खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या मार्गदर्शनाखाली चिंचवडगाव येथील मोरया गोसावी मंदिरात धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. मंदिरात श्रींच्या चरणी अभिषेक पूजा, आरती व मंत्रोच्चार करण्यात आले. यावेळी एकनाथ शिंदे यांना निरोगी व दीर्घायुष्य लाभावे यासाठी प्रार्थना करण्यात आली.

या धार्मिक कार्यक्रमाला शिवसेना उपनेत्या तथा नगरसेविका सुलभा उबाळे, शिवसेनेचे जिल्हा समन्वयक बाळासाहेब वाल्हेकर, जिल्हा संघटक संतोष सौंदणकर, जिल्हा संघटिका शैलाताई भोंडवे, विभाग संघटिका भारती चकवे, उपशहर संघटिका शशिकला उभे, शाखा संघटीका नयना पारखे, विभाग संघटिका संगिता टुपके, केशव सरोदे, शिवा ओंकार, गणेश धननाईक, ओम परदेशी आणि शिवसैनिक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

banner

यावेळी शिवसेना उपनेत्या सुलभा उबाळे म्हणाल्या की, “एकनाथ शिंदे यांनी राजकारणात संवेदनशील नेतृत्वाचे उदाहरण घालून दिले आहे. वैयक्तिक आनंदापेक्षा सहकाऱ्यांच्या दुःखात सहभागी होण्याची त्यांची भूमिका ही शिवसेनेच्या संस्कारांची ओळख आहे. त्यांच्या नेतृत्वामुळे सर्वसामान्यांना न्याय मिळत असून ते राज्याच्या विकासासाठी सातत्याने कार्यरत आहेत.”

जिल्हा समन्वयक बाळासाहेब वाल्हेकर म्हणाले की, “शिंदेसाहेब हे कार्यकर्त्यांच्या सुख-दुःखात नेहमी सहभागी होणारे नेतृत्व आहे. त्यांनी घेतलेला साधेपणाचा निर्णय हा समाजासाठी आदर्श आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना अधिक बळकट होईल, असा विश्वास आहे.”

संतोष सौंदणकर यांनी सांगितले की, “ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनामुळे अनेक विकासकामांना गती मिळाली आहे. त्यांच्या दीर्घायुष्य आणि उत्तम आरोग्यासाठी आज मोरया गोसावी मंदिरात प्रार्थना करण्यात आली असून शिवसैनिक त्यांच्या पाठीशी कायम राहतील.”


Spread the love

You may also like

Leave a Comment

आमच्याबद्दल – लोक मौर्य

“लोक मौर्य” हे एक विश्वासार्ह, अभ्यासपूर्ण आणि जनतेच्या आवाजाला प्रतिष्ठा देणारे डिजिटल वेबपोर्टल आहे. आम्ही बातम्यांची केवळ नोंद घेत नाही, तर त्या बातम्या समाजावर काय परिणाम करतात याचाही सखोल विचार करतो.

“लोक मौर्य” हे नाव केवळ एका समुदायाचं प्रतिनिधित्व करत नाही, तर ते समतेच्या तत्वावर आधारित न्याय्य समाजरचनेचं प्रतीक आहे. आम्ही प्रत्येक वर्गातील, जातीधर्मातील आणि प्रांतातील लोकांचे मुद्दे, सामाजिक बदल, आणि ऐतिहासिक सत्यता यांचा अभ्यासपूर्वक मागोवा घेतो.

आमचा प्रयत्न आहे की, “लोक मौर्य” हे व्यासपीठ सत्य, विवेक आणि संवेदनशीलतेने समृद्ध असावं. आम्ही कोणत्याही राजकीय पक्षाशी संलग्न नाही, पण जनतेच्या बाजूने ठामपणे उभं राहणं हीच आमची भूमिका आहे.

आम्ही विश्वास ठेवतो – लोकशाही टिकते ती सजग नागरिकांमुळे, आणि सजगता येते माहितीमुळे. “लोक मौर्य” हे त्या सजगतेचं माध्यम आहे.

 

मुख्य संपादक :- राम बनसोडे

संपर्क:- 8446439067

Edtior's Picks

Latest Articles

© 2025 Lok Maurya, All Rights Reserved | Website Developed & Maintained by Swara Infotech | 📞 9096040204
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00