Home पिंपरी चिंचवड विरोधी पक्षाला दुय्यम वागणूक दिल्यास तीव्र विरोध करणार – भाऊसाहेब भोईर..

विरोधी पक्षाला दुय्यम वागणूक दिल्यास तीव्र विरोध करणार – भाऊसाहेब भोईर..

by Lokmauryanews@gmail.com
0 comments
Spread the love

पिंपरी-चिंचवड (दि. 10 फेब्रुवारी २०२६) :- पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत विरोधी पक्षनेतेपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर भाऊसाहेब भोईर यांनी आज पत्रकार परिषद घेऊन विविध मुद्द्यांवर आपली भूमिका स्पष्ट केली. चुकीच्या कामांना कधीही पाठिंबा दिला नसल्याचे त्यांनी ठामपणे सांगत, शहरातील प्रलंबित विकासकामे, पाणीपुरवठा, अर्बन स्ट्रीट, हातगाडी पथारीवाले, शिक्षण आणि प्रशासनातील कारभार यावर भाष्य केले.

 

भाऊसाहेब भोईर म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते अजितदादा पवार यांनी महापालिकेत एकहाती संघर्ष केला होता. तसेच भाजपचे ८४ नगरसेवक हे राष्ट्रवादीच्या राजकारणातून तयार झालेले प्रॉडक्ट असल्याचा टोला त्यांनी लगावला. विकासाच्या मुद्द्यावर सत्ताधाऱ्यांसोबत समन्वयाची भूमिका ठेवू, मात्र विरोधी पक्षाला दुय्यम स्थान दिल्यास तीव्र विरोध करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.

 

banner

विरोधी पक्षनेते पदासाठी माझा नको तर, इतर नावांचा विचार करा अशी माझी आग्रही मागणी होती. परंतु, अजितदादा पवार यांच्या निधनामुळे पद स्वीकारण्याची वेळ आल्याचे त्यांनी सांगितले. अजितदादांचा पुतळा उभारण्याचा विषय लवकरच मार्गी लावण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

 

शहरातील पाणीपुरवठ्याच्या समस्येवर भाष्य करताना भोईर म्हणाले की, पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी जलसाठा किती एमएलडी आहे, त्याचे नियोजन आणि मूल्यमापन याची अचूक माहिती आवश्यक असते. अनेकदा कार्यकारी अभियंत्यांपेक्षा प्रत्यक्ष पाणी व्हॉल्व्ह फिरवणाऱ्या कर्मचाऱ्यांना अधिक माहिती असते, असे सांगत त्यांनी प्रशासनावर अप्रत्यक्ष टीका केली.

 

शहरातील हातगाडी व पथारीवाल्यांसाठी स्वतंत्र हॉकर्स झोन तयार करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. अर्बन स्ट्रीट प्रकल्पामुळे शहरातील रस्ते अरुंद झाल्याचा आरोप करत, काही अधिकाऱ्यांकडून फक्त वरिष्ठांना खुश ठेवण्याचे काम सुरू असल्याचे त्यांनी म्हटले.

 

नदीकाठावर स्मशानभूमीसाठी आरक्षित असलेले विकास आराखड्यातील (डीपी) आरक्षण हटवण्याचा पाठपुरावा केला जाईल, असे त्यांनी सांगितले. तसेच शिक्षण समितीच्या माध्यमातून शाळकरी मुलांमध्ये गुन्हेगारीबाबत जनजागृती करण्यावर भर देण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

 

शहरातील प्रलंबित विकासकामांची लवकरच पाहणी करण्यात येणार असल्याचे सांगत त्यांनी प्रशासनाला नियमबाह्य कामांबाबत इशारा दिला. महापालिकेतील महिला अधिकाऱ्याला त्रास देणाऱ्या व्यक्तीमागील सूत्रधारांचा शोध घेण्याची मागणी करत, कामे नियमांनुसार झाली नाहीत तर संबंधित प्रकल्पांची चौकशी करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला.


Spread the love

You may also like

Leave a Comment

आमच्याबद्दल – लोक मौर्य

“लोक मौर्य” हे एक विश्वासार्ह, अभ्यासपूर्ण आणि जनतेच्या आवाजाला प्रतिष्ठा देणारे डिजिटल वेबपोर्टल आहे. आम्ही बातम्यांची केवळ नोंद घेत नाही, तर त्या बातम्या समाजावर काय परिणाम करतात याचाही सखोल विचार करतो.

“लोक मौर्य” हे नाव केवळ एका समुदायाचं प्रतिनिधित्व करत नाही, तर ते समतेच्या तत्वावर आधारित न्याय्य समाजरचनेचं प्रतीक आहे. आम्ही प्रत्येक वर्गातील, जातीधर्मातील आणि प्रांतातील लोकांचे मुद्दे, सामाजिक बदल, आणि ऐतिहासिक सत्यता यांचा अभ्यासपूर्वक मागोवा घेतो.

आमचा प्रयत्न आहे की, “लोक मौर्य” हे व्यासपीठ सत्य, विवेक आणि संवेदनशीलतेने समृद्ध असावं. आम्ही कोणत्याही राजकीय पक्षाशी संलग्न नाही, पण जनतेच्या बाजूने ठामपणे उभं राहणं हीच आमची भूमिका आहे.

आम्ही विश्वास ठेवतो – लोकशाही टिकते ती सजग नागरिकांमुळे, आणि सजगता येते माहितीमुळे. “लोक मौर्य” हे त्या सजगतेचं माध्यम आहे.

 

मुख्य संपादक :- राम बनसोडे

संपर्क:- 8446439067

Edtior's Picks

Latest Articles

© 2025 Lok Maurya, All Rights Reserved | Website Developed & Maintained by Swara Infotech | 📞 9096040204
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00