Home पिंपरी चिंचवड शरद पवार यांची प्रकृती बिघडली..

शरद पवार यांची प्रकृती बिघडली..

by Lokmauryanews@gmail.com
0 comments
Spread the love

पिंपरी चिंचवड (दि. 10 फेब्रुवारी २०२६) :- राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे अध्यक्ष शरद पवार यांची प्रकृती अचानक बिघडल्याची माहिती समोर आली आहे. बारामती येथील गोविंद बाग येथून त्यांना खासगी वाहनातून पुण्याकडे हलवण्यात आले असून रुबी हॉल क्लिनिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, शरद पवार यांना कफाचा त्रास वाढला असून श्वास घेण्यासही काही प्रमाणात अडचण निर्माण झाली होती. प्रकृती बिघडल्याचे लक्षात येताच त्यांना तातडीने पुण्यात हलवण्याचा निर्णय घेण्यात आला. या वेळी खासदार सुप्रिया सुळे तसेच त्यांचे पती सदानंद सुळे हेही त्यांच्यासोबत उपस्थित असल्याचे सांगितले जात आहे.

 

banner

दरम्यान, शरद पवार यांच्या प्रकृतीबाबतची माहिती समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यांच्या प्रकृतीवर डॉक्टरांचे विशेष लक्ष असून आवश्यक वैद्यकीय तपासण्या सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

 

वृत्तसंस्था एएनआयने या संदर्भातील प्राथमिक माहिती दिली असून शरद पवार यांच्या प्रकृतीविषयी अधिकृत वैद्यकीय अहवालाची प्रतीक्षा करण्यात येत आहे. त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी प्रार्थना कार्यकर्ते व समर्थकांकडून व्यक्त केली जात आहे.


Spread the love

You may also like

Leave a Comment

आमच्याबद्दल – लोक मौर्य

“लोक मौर्य” हे एक विश्वासार्ह, अभ्यासपूर्ण आणि जनतेच्या आवाजाला प्रतिष्ठा देणारे डिजिटल वेबपोर्टल आहे. आम्ही बातम्यांची केवळ नोंद घेत नाही, तर त्या बातम्या समाजावर काय परिणाम करतात याचाही सखोल विचार करतो.

“लोक मौर्य” हे नाव केवळ एका समुदायाचं प्रतिनिधित्व करत नाही, तर ते समतेच्या तत्वावर आधारित न्याय्य समाजरचनेचं प्रतीक आहे. आम्ही प्रत्येक वर्गातील, जातीधर्मातील आणि प्रांतातील लोकांचे मुद्दे, सामाजिक बदल, आणि ऐतिहासिक सत्यता यांचा अभ्यासपूर्वक मागोवा घेतो.

आमचा प्रयत्न आहे की, “लोक मौर्य” हे व्यासपीठ सत्य, विवेक आणि संवेदनशीलतेने समृद्ध असावं. आम्ही कोणत्याही राजकीय पक्षाशी संलग्न नाही, पण जनतेच्या बाजूने ठामपणे उभं राहणं हीच आमची भूमिका आहे.

आम्ही विश्वास ठेवतो – लोकशाही टिकते ती सजग नागरिकांमुळे, आणि सजगता येते माहितीमुळे. “लोक मौर्य” हे त्या सजगतेचं माध्यम आहे.

 

मुख्य संपादक :- राम बनसोडे

संपर्क:- 8446439067

Edtior's Picks

Latest Articles

© 2025 Lok Maurya, All Rights Reserved | Website Developed & Maintained by Swara Infotech | 📞 9096040204
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00