Home पिंपरी चिंचवड दिवंगत आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांचे महापालिकेच्या मुख्य सभागृहात तैलचित्र बसवा..

दिवंगत आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांचे महापालिकेच्या मुख्य सभागृहात तैलचित्र बसवा..

by Lokmauryanews@gmail.com
0 comments
Spread the love

पिंपरी चिंचवड (दि. 13 फेब्रुवारी 2026) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मुख्य सभागृहात दिवंगत आमदार लक्ष्मण (भाऊ) पांडुरंग जगताप यांचे तैलचित्र लावण्याची मागणी भाजपचे नगरसेवक विनोद नढे यांनी केली आहे. याबाबत त्यांनी महापौर तसेच महापालिका आयुक्तांना पत्र देऊन प्रशासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अशी विनंती केली आहे.

पत्रात नमूद केल्यानुसार, पिंपरी चिंचवड शहराच्या जडणघडणीत तसेच विकासात दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचे मोठे योगदान राहिले आहे. अभ्यासू लोकप्रतिनिधी, कुशल संघटक आणि शहराच्या विकासासाठी सातत्याने कार्य करणारे नेतृत्व म्हणून त्यांची ओळख होती. नगरसेवक, स्थायी समिती अध्यक्ष, महापौर, विधान परिषद सदस्य आणि सलग तीन वेळा विधानसभेचे सदस्य म्हणून त्यांनी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी योगदान दिल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.

शहरातील अनधिकृत बांधकामे, रिंगरोडसह पायाभूत सुविधांचा विकास आणि नागरिकांच्या प्रश्नांवर त्यांनी सातत्याने काम केल्याचा उल्लेखही करण्यात आला आहे. महापालिकेच्या मुख्य सभागृहात अनेक ऐतिहासिक निर्णय घेतले जातात. अशा सभागृहात शहराच्या विकासासाठी योगदान देणाऱ्या लोकनेत्याचे तैलचित्र लावल्यास ते पुढील पिढीतील लोकप्रतिनिधींसाठी प्रेरणादायी ठरेल, असे नढे यांनी पत्रात म्हटले आहे.

महापालिकेने दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचे तेलचित्र मुख्य सभागृहात सन्मानपूर्वक लावण्याचा धोरणात्मक निर्णय घ्यावा आणि त्यासाठी आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया तातडीने सुरू करावी, अशी मागणीही पत्रातून करण्यात आली आहे.

banner

Spread the love

You may also like

Leave a Comment

आमच्याबद्दल – लोक मौर्य

“लोक मौर्य” हे एक विश्वासार्ह, अभ्यासपूर्ण आणि जनतेच्या आवाजाला प्रतिष्ठा देणारे डिजिटल वेबपोर्टल आहे. आम्ही बातम्यांची केवळ नोंद घेत नाही, तर त्या बातम्या समाजावर काय परिणाम करतात याचाही सखोल विचार करतो.

“लोक मौर्य” हे नाव केवळ एका समुदायाचं प्रतिनिधित्व करत नाही, तर ते समतेच्या तत्वावर आधारित न्याय्य समाजरचनेचं प्रतीक आहे. आम्ही प्रत्येक वर्गातील, जातीधर्मातील आणि प्रांतातील लोकांचे मुद्दे, सामाजिक बदल, आणि ऐतिहासिक सत्यता यांचा अभ्यासपूर्वक मागोवा घेतो.

आमचा प्रयत्न आहे की, “लोक मौर्य” हे व्यासपीठ सत्य, विवेक आणि संवेदनशीलतेने समृद्ध असावं. आम्ही कोणत्याही राजकीय पक्षाशी संलग्न नाही, पण जनतेच्या बाजूने ठामपणे उभं राहणं हीच आमची भूमिका आहे.

आम्ही विश्वास ठेवतो – लोकशाही टिकते ती सजग नागरिकांमुळे, आणि सजगता येते माहितीमुळे. “लोक मौर्य” हे त्या सजगतेचं माध्यम आहे.

 

मुख्य संपादक :- राम बनसोडे

संपर्क:- 8446439067

Edtior's Picks

Latest Articles

© 2025 Lok Maurya, All Rights Reserved | Website Developed & Maintained by Swara Infotech | 📞 9096040204
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00