Home पिंपरी चिंचवड आरोग्य सोयीसुविधांच्या अनुषंगाने सर्वोत्कृष्ट काम करणाऱ्या क्षेत्रीय कार्यालयांचा आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते सन्मान

आरोग्य सोयीसुविधांच्या अनुषंगाने सर्वोत्कृष्ट काम करणाऱ्या क्षेत्रीय कार्यालयांचा आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते सन्मान

by Lokmauryanews@gmail.com
0 comments
Spread the love

पिंपरी :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागाने क्षेत्रीय कार्यालयांसाठी आरोग्य सोयीसुविधांच्या अनुषंगाने व जागतिक पर्यावरण दिनानिमित्त स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेतील पहिल्या तिमाहीचा निकाल जाहीर करण्यात आला असून यामध्ये ड क्षेत्रीय कार्यालयाने प्रथम, फ क्षेत्रीय कार्यालयाने द्वितीय, अ क्षेत्रीय कार्यालयाने तृतीय क्रमांक मिळवला आहे. या तिन्ही कार्यालयांचा आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी अतिरिक्त प्रदीप जांभळे पाटील, तृप्ती सांडभोर, नगर सचिव मुकेश कोळप, उप आयुक्त सचिन पवार तसेच सर्व क्षेत्रीय अधिकारी उपस्थित होते.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने  नागरिकांमध्ये जनजागृतीसाठी आयुक्त शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, उपायुक्त सचिन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम राबवले जातात. याशिवाय “माझी वसुंधरा अभियान ६.०”, “स्वच्छ सर्वेक्षण २०२५” अनुषंगानेही नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येते. आरोग्य विभागाच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या या उपक्रमांमध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या क्षेत्रीय कार्यालयांचा सन्मान करणासाठी प्रत्येक तिमाहीमध्ये स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. या स्पर्धेचा पहिल्या तिमाहीचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला असून यामध्ये ड, फ आणि अ या क्षेत्रीय कार्यालयांनी पारितोषिक मिळवले आहे. या क्षेत्रीय कार्यालयांनी आरोग्याच्या अनुषंगाने जनजागृती करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या उपक्रमांमध्ये नागरिक, स्वयंसेवी संस्था, विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता. त्याबद्दल या कार्यालयांचा सन्मान करण्यात आला.
पिंपरी चिंचवड शहरामध्ये महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी सातत्याने विविध उपक्रम राबवले जात असतात. प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी या उपक्रमात जास्तीतजास्त नागरिकांना सहभागी करून घेण्यावर भर देत आहेत. नागरिकांच्या आरोग्याला नेहमीच महापालिकेचे प्राधान्य राहिले आहे. 
– शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक, पिंपरी चिंचवड महापालिका
आरोग्य सोयीसुविधांच्या अनुषंगाने आयोजित केलेल्या स्पर्धेच्या पहिल्या तिमाहीमध्ये ड, फ आणि अ या क्षेत्रीय कार्यालयांना अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळाला आहे. परंतु या स्पर्धेत सर्वच क्षेत्रीय कार्यालयांनी चांगली कामगिरी केली आहे. क्षेत्रीय कार्यालयांना प्रोत्साहन मिळावे, यासाठी या स्पर्धेचे आयोजन केले आहे.
– सचिन पवार, उपायुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका.

Spread the love

You may also like

Leave a Comment

आमच्याबद्दल – लोक मौर्य

“लोक मौर्य” हे एक विश्वासार्ह, अभ्यासपूर्ण आणि जनतेच्या आवाजाला प्रतिष्ठा देणारे डिजिटल वेबपोर्टल आहे. आम्ही बातम्यांची केवळ नोंद घेत नाही, तर त्या बातम्या समाजावर काय परिणाम करतात याचाही सखोल विचार करतो.

“लोक मौर्य” हे नाव केवळ एका समुदायाचं प्रतिनिधित्व करत नाही, तर ते समतेच्या तत्वावर आधारित न्याय्य समाजरचनेचं प्रतीक आहे. आम्ही प्रत्येक वर्गातील, जातीधर्मातील आणि प्रांतातील लोकांचे मुद्दे, सामाजिक बदल, आणि ऐतिहासिक सत्यता यांचा अभ्यासपूर्वक मागोवा घेतो.

आमचा प्रयत्न आहे की, “लोक मौर्य” हे व्यासपीठ सत्य, विवेक आणि संवेदनशीलतेने समृद्ध असावं. आम्ही कोणत्याही राजकीय पक्षाशी संलग्न नाही, पण जनतेच्या बाजूने ठामपणे उभं राहणं हीच आमची भूमिका आहे.

आम्ही विश्वास ठेवतो – लोकशाही टिकते ती सजग नागरिकांमुळे, आणि सजगता येते माहितीमुळे. “लोक मौर्य” हे त्या सजगतेचं माध्यम आहे.

 

मुख्य संपादक :- राम बनसोडे

संपर्क:- 8446439067

Edtior's Picks

Latest Articles

© 2025 Lok Maurya, All Rights Reserved | Website Developed & Maintained by Swara Infotech | 📞 9096040204
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00