Home पिंपरी चिंचवड दिघी आणि मावळात दोन वेगवेगळ्या ‘शूटआऊट’प्रकरणांमुळे खळबळ..

दिघी आणि मावळात दोन वेगवेगळ्या ‘शूटआऊट’प्रकरणांमुळे खळबळ..

by Lokmauryanews@gmail.com
0 comments
Spread the love

पिंपरी-चिंचवड (दि. १३ नोव्हेंबर २०२५) :- पिंपरी-चिंचवड शहर आणि मावळ परिसरांत दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या शूटआऊट घटनांनी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

दिघी आणि मावळ परिसरात झालेल्या या दोन गंभीर घटनांमध्ये एका युवकाचा खून झाला असून दुसरा गंभीर जखमी झाला आहे. दोन्ही प्रकरणांमध्ये पोलीसांनी गुन्हे दाखल केले असून आरोपींवर कठोर कलमांखाली कारवाई करण्यात आली आहे.

पहिल्या घटनेत १२ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५.३० च्या सुमारास वडमुखवाडी, च-होली बु।। परिसरातील खडी मशीन रोडजवळ नितीन गिलबिले (वय ३८) याला आरोपी अमित जीवन पठारे आणि विक्रांत ठाकूर यांनी फॉर्च्युनर गाडीत बसवले. काही काळानंतर त्याच्या डोक्यात गोळी झाडून पूर्वनियोजित कट रचून त्याची हत्या केली. या प्रकरणी सचिन गिलबिले यांच्या फिर्यादीवरून दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे. आरोपींपैकी एकाला अटक झाली असून दुसरा फरार आहे.

दुसऱ्या घटनेत नोव्हेंबर रोजी रात्री १०.३० वाजता मावळ तालुक्यातील ओझर्डे गावाजवळ, मुंबई–पुणे एक्स्प्रेसवे लगतच्या कच्च्या रस्त्यावर विकास केदारी (३१) याच्यावर पिस्तूलसदृश हत्याराने गोळीबार करण्यात आला. या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला. फिर्यादी किरण केदारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अभिजीत आणि नितीन केदारी यांनी विकास आणि आरोपींची बहिण यांच्यातील प्रेमसंबंधामुळे हा हल्ला केल्याचा संशय व्यक्त केला आहे.

banner

दोन्ही प्रकरणांची तपास पोलीस निरीक्षक वाघ आणि पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, आरोपींवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचे पोलीसांकडून सांगण्यात आले आहे.


Spread the love

You may also like

Leave a Comment

आमच्याबद्दल – लोक मौर्य

“लोक मौर्य” हे एक विश्वासार्ह, अभ्यासपूर्ण आणि जनतेच्या आवाजाला प्रतिष्ठा देणारे डिजिटल वेबपोर्टल आहे. आम्ही बातम्यांची केवळ नोंद घेत नाही, तर त्या बातम्या समाजावर काय परिणाम करतात याचाही सखोल विचार करतो.

“लोक मौर्य” हे नाव केवळ एका समुदायाचं प्रतिनिधित्व करत नाही, तर ते समतेच्या तत्वावर आधारित न्याय्य समाजरचनेचं प्रतीक आहे. आम्ही प्रत्येक वर्गातील, जातीधर्मातील आणि प्रांतातील लोकांचे मुद्दे, सामाजिक बदल, आणि ऐतिहासिक सत्यता यांचा अभ्यासपूर्वक मागोवा घेतो.

आमचा प्रयत्न आहे की, “लोक मौर्य” हे व्यासपीठ सत्य, विवेक आणि संवेदनशीलतेने समृद्ध असावं. आम्ही कोणत्याही राजकीय पक्षाशी संलग्न नाही, पण जनतेच्या बाजूने ठामपणे उभं राहणं हीच आमची भूमिका आहे.

आम्ही विश्वास ठेवतो – लोकशाही टिकते ती सजग नागरिकांमुळे, आणि सजगता येते माहितीमुळे. “लोक मौर्य” हे त्या सजगतेचं माध्यम आहे.

 

मुख्य संपादक :- राम बनसोडे

संपर्क:- 8446439067

Edtior's Picks

Latest Articles

© 2025 Lok Maurya, All Rights Reserved | Website Developed & Maintained by Swara Infotech | 📞 9096040204
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00