Home पिंपरी चिंचवड शरद पवारांच्या राष्ट्रवादीची कोअर कमिटी बैठक संपन्न..

शरद पवारांच्या राष्ट्रवादीची कोअर कमिटी बैठक संपन्न..

by Lokmauryanews@gmail.com
0 comments
Spread the love

पिंपरी (दि. ०६ डिसेंबर २०२५) :- राज्यात निवडणुकांचे वारे वाहू लागले असून पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीची रणनीती आखण्यासाठी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने तयारीला वेग दिला आहे. काही दिवसांपूर्वी घोषित केलेल्या कोअर कमिटीची महत्त्वपूर्ण बैठक ज्येष्ठ नेते आझमभाई पानसरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली.

बैठकीत निवडणूक नियोजनाची रूपरेषा निश्चित करण्यात आली. “कोअर कमिटीच्या माध्यमातून आम्ही इच्छुक पदाधिकाऱ्यांशी चर्चा सुरू करीत आहोत. तसेच पक्षाबाहेरील इच्छुक उमेदवारांचेही अर्ज स्वीकारले जाणार आहेत. विधानसभानिहाय तसेच शहर पातळीवरील प्रतिनिधींची निवड करून अर्ज स्वीकृतीची प्रक्रिया सुरू केली आहे,” अशी माहिती आझमभाई पानसरे यांनी दिली.

गेल्या पाच-सात वर्षांत पिंपरी-चिंचवड महापालिकेतील कारभार भोंगळ पद्धतीने झाल्याचा आरोप करत “पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली शहरासाठी पुन्हा नव्याने जोमाने कामाला प्रारंभ करणार आहोत,” असेही त्यांनी स्पष्ट केले.

कार्याध्यक्ष देवेंद्र तायडे यांनी सांगितले की, प्राथमिक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर खासदार अमोल कोल्हे, रोहित पवार आणि हर्षवर्धन पाटील यांच्या उपस्थितीत कार्यकर्ता व इच्छुक उमेदवारांचा मेळावा आयोजित केला जाणार आहे. त्याचबरोबर महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे उद्या चिंचवड येथील विरंगुळा केंद्रात प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत.

banner

विधानसभा निहाय अर्ज स्वीकृती प्रतिनिधी:

शहर: तुषार कामठे, देवेंद्र तायडे
भोसरी विधानसभा: काशिनाथ जगताप, इम्रान शेख
पिंपरी विधानसभा: सुलक्षणा शिलवंत, संदीप चव्हाण
चिंचवड विधानसभा: सुनिल गव्हाणे, तुषार कामठे
इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज वरील पदाधिकाऱ्यांकडे दाखल करावेत, असे आवाहन शहर सरचिटणीस जयंत शिंदे यांनी केले.


Spread the love

You may also like

Leave a Comment

आमच्याबद्दल – लोक मौर्य

“लोक मौर्य” हे एक विश्वासार्ह, अभ्यासपूर्ण आणि जनतेच्या आवाजाला प्रतिष्ठा देणारे डिजिटल वेबपोर्टल आहे. आम्ही बातम्यांची केवळ नोंद घेत नाही, तर त्या बातम्या समाजावर काय परिणाम करतात याचाही सखोल विचार करतो.

“लोक मौर्य” हे नाव केवळ एका समुदायाचं प्रतिनिधित्व करत नाही, तर ते समतेच्या तत्वावर आधारित न्याय्य समाजरचनेचं प्रतीक आहे. आम्ही प्रत्येक वर्गातील, जातीधर्मातील आणि प्रांतातील लोकांचे मुद्दे, सामाजिक बदल, आणि ऐतिहासिक सत्यता यांचा अभ्यासपूर्वक मागोवा घेतो.

आमचा प्रयत्न आहे की, “लोक मौर्य” हे व्यासपीठ सत्य, विवेक आणि संवेदनशीलतेने समृद्ध असावं. आम्ही कोणत्याही राजकीय पक्षाशी संलग्न नाही, पण जनतेच्या बाजूने ठामपणे उभं राहणं हीच आमची भूमिका आहे.

आम्ही विश्वास ठेवतो – लोकशाही टिकते ती सजग नागरिकांमुळे, आणि सजगता येते माहितीमुळे. “लोक मौर्य” हे त्या सजगतेचं माध्यम आहे.

 

मुख्य संपादक :- राम बनसोडे

संपर्क:- 8446439067

Edtior's Picks

Latest Articles

© 2025 Lok Maurya, All Rights Reserved | Website Developed & Maintained by Swara Infotech | 📞 9096040204
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00