Home पिंपरी चिंचवड मोशीतील वेस्ट टू एनर्जी प्रकल्प प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या रडारवर…

मोशीतील वेस्ट टू एनर्जी प्रकल्प प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या रडारवर…

by Lokmauryanews@gmail.com
0 comments
Spread the love

पिंपरी (दि. ०५ डिसेंबर २०२५) :- मोशी कचरा डेपो परिसरातील वेस्ट टू एनर्जी प्रकल्पातून उत्सर्जित होणाऱ्या धुरातील घातक रसायनांचे योग्य परीक्षण होत नसल्याचे आढळल्याने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने महापालिकेला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. प्रकल्पाच्या धुरातून डायॉक्सिन आणि फ्युरॉनसारखे मानवाच्या आरोग्यास हानीकारक घटक बाहेर पडण्याचा धोका असल्याचे मंडळाने नमूद केले आहे.

मंडळाच्या निरीक्षणानुसार चिमणीतून बाहेर पडणाऱ्या सर्व रसायनांचे दररोजचे परीक्षण अत्यावश्यक आहे. मात्र ते अपेक्षित पातळीवर न झाल्याने नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो, असे सांगत मंडळाने इन्सिनरेशन प्रकल्पाला तातडीने सुधारणा करण्याचे आदेश दिले आहेत.

राष्ट्रीय हरित लवादाकडून देशातील विविध वेस्ट टू एनergy प्रकल्पांची तपशीलवार माहिती मागवण्यात आली असून, मोशी प्रकल्पाचाही यात समावेश आहे.

या घडामोडींवर प्रतिक्रिया देताना महापालिकेचे मुख्य अभियंता संजय कुलकर्णी म्हणाले, “प्रकल्पातून बाहेर पडणाऱ्या धुराचे ऑनलाईन मॉनिटरिंग आम्ही सातत्याने करत आहोत. हरित लवादाच्या निर्देशांनुसार सर्व नोंदी तात्काळ संबंधित यंत्रणांना पाठवण्यात आल्या आहेत. प्रदूषण नियंत्रण मंडळाला आवश्यक माहिती सादर केली आहे.”

banner

Spread the love

You may also like

Leave a Comment

आमच्याबद्दल – लोक मौर्य

“लोक मौर्य” हे एक विश्वासार्ह, अभ्यासपूर्ण आणि जनतेच्या आवाजाला प्रतिष्ठा देणारे डिजिटल वेबपोर्टल आहे. आम्ही बातम्यांची केवळ नोंद घेत नाही, तर त्या बातम्या समाजावर काय परिणाम करतात याचाही सखोल विचार करतो.

“लोक मौर्य” हे नाव केवळ एका समुदायाचं प्रतिनिधित्व करत नाही, तर ते समतेच्या तत्वावर आधारित न्याय्य समाजरचनेचं प्रतीक आहे. आम्ही प्रत्येक वर्गातील, जातीधर्मातील आणि प्रांतातील लोकांचे मुद्दे, सामाजिक बदल, आणि ऐतिहासिक सत्यता यांचा अभ्यासपूर्वक मागोवा घेतो.

आमचा प्रयत्न आहे की, “लोक मौर्य” हे व्यासपीठ सत्य, विवेक आणि संवेदनशीलतेने समृद्ध असावं. आम्ही कोणत्याही राजकीय पक्षाशी संलग्न नाही, पण जनतेच्या बाजूने ठामपणे उभं राहणं हीच आमची भूमिका आहे.

आम्ही विश्वास ठेवतो – लोकशाही टिकते ती सजग नागरिकांमुळे, आणि सजगता येते माहितीमुळे. “लोक मौर्य” हे त्या सजगतेचं माध्यम आहे.

 

मुख्य संपादक :- राम बनसोडे

संपर्क:- 8446439067

Edtior's Picks

Latest Articles

© 2025 Lok Maurya, All Rights Reserved | Website Developed & Maintained by Swara Infotech | 📞 9096040204
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00