Home पिंपरी चिंचवड देहु नगरपंचायतीचे पाचव्या वर्षात पदार्पण..

देहु नगरपंचायतीचे पाचव्या वर्षात पदार्पण..

by Lokmauryanews@gmail.com
0 comments
Spread the love

देहू (दि.०९ डिसेंबर २०२५):-  तीर्थक्षेत्र देहू येथील भाविकांना अधिक सोयी-सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी नगरपंचायत प्रशासन सातत्याने प्रयत्नशील असून, वाढत्या लोकसंख्येनुसार नागरिकांच्या मूलभूत गरजा प्रभावीपणे पूर्ण करण्यावर पुढील काळात अधिक लक्ष केंद्रित केले जाणार असल्याची माहिती नगरपंचायतीचे मुख्याधिकारी चेतन कोंडे यांनी दिली. नगरपंचायतीचे पुढील टप्प्यात नगरपरिषदेत रूपांतर होऊन अधिक निधी उपलब्ध व्हावा आणि परिसराचा सर्वांगीण विकास साधता यावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

देहू नगरपंचायतीच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. ८ डिसेंबर २०२० रोजी देहू ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रूपांतर झाले. त्यानंतर एका वर्षाच्या प्रशासकीय कालावधीतून पुढे १७ नगरसेवक निवडून आले. त्यानंतर प्रथमच वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमादरम्यान मुख्याधिकारी चेतन कोंडे, कार्यालयीन अधीक्षक प्रियंका कदम आणि नगराध्यक्षा पूजा दिवटे यांच्या हस्ते केक कापून वर्धापन दिन सोहळा पार पडला. नगरसेवक, अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांच्या उपस्थितीत कार्यक्रमाला उत्साही वातावरण लाभले.

मुख्याधिकारी कोंडे यांनी सांगितले की, तीर्थक्षेत्र म्हणून देहूची ओळख अधिक दृढ करण्यासाठी सुविधा-वृद्धी, स्वच्छता, वाहतूक व्यवस्थापन, रहदारीसाठी उपाययोजना आणि पायाभूत सुविधा यावर भर दिला जाणार आहे. भाविकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक प्रकल्प, रस्ते, प्रकाशयोजना आणि पाणीपुरवठा यांसाठीही विशेष नियोजन करण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले.

banner

देहूच्या विकासाचा पुढील टप्पा अधिक व्यापक आणि नियोजनबद्ध असेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.


Spread the love

You may also like

Leave a Comment

आमच्याबद्दल – लोक मौर्य

“लोक मौर्य” हे एक विश्वासार्ह, अभ्यासपूर्ण आणि जनतेच्या आवाजाला प्रतिष्ठा देणारे डिजिटल वेबपोर्टल आहे. आम्ही बातम्यांची केवळ नोंद घेत नाही, तर त्या बातम्या समाजावर काय परिणाम करतात याचाही सखोल विचार करतो.

“लोक मौर्य” हे नाव केवळ एका समुदायाचं प्रतिनिधित्व करत नाही, तर ते समतेच्या तत्वावर आधारित न्याय्य समाजरचनेचं प्रतीक आहे. आम्ही प्रत्येक वर्गातील, जातीधर्मातील आणि प्रांतातील लोकांचे मुद्दे, सामाजिक बदल, आणि ऐतिहासिक सत्यता यांचा अभ्यासपूर्वक मागोवा घेतो.

आमचा प्रयत्न आहे की, “लोक मौर्य” हे व्यासपीठ सत्य, विवेक आणि संवेदनशीलतेने समृद्ध असावं. आम्ही कोणत्याही राजकीय पक्षाशी संलग्न नाही, पण जनतेच्या बाजूने ठामपणे उभं राहणं हीच आमची भूमिका आहे.

आम्ही विश्वास ठेवतो – लोकशाही टिकते ती सजग नागरिकांमुळे, आणि सजगता येते माहितीमुळे. “लोक मौर्य” हे त्या सजगतेचं माध्यम आहे.

 

मुख्य संपादक :- राम बनसोडे

संपर्क:- 8446439067

Edtior's Picks

Latest Articles

© 2025 Lok Maurya, All Rights Reserved | Website Developed & Maintained by Swara Infotech | 📞 9096040204
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00