Home पिंपरी चिंचवड प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी प्रसिद्धीस १५ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ…

प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी प्रसिद्धीस १५ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ…

by Lokmauryanews@gmail.com
0 comments
Spread the love

पिंपरी (दि. १० डिसेंबर २०२५) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नियोजित सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभागनिहाय विभाजित प्रारूप मतदार यादीवरील प्राप्त हरकती व सूचनांच्या परीक्षणाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने १५ डिसेंबर २०२५ पर्यंतची मुदतवाढ दिली आहे. याआधी महापालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्याची पूर्वनिर्धारित तारीख १० डिसेंबर २०२५ होती.

राज्य निवडणूक आयोगाने जारी केलेल्या सुधारित कार्यक्रमानुसार, प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी १५ डिसेंबर २०२५ रोजी प्रसिद्ध केल्यानंतर मतदान केंद्रांच्या ठिकाणांची यादी २० डिसेंबर २०२५ रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे, तर मतदान केंद्रनिहाय मतदार यादी ही २७ डिसेंबर २०२५ रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे. सुधारित कार्यक्रमानुसार संबंधित प्रशासकीय प्रक्रिया आणि निवडणूक तयारीची पुढील कार्यवाही नियुक्त कालमर्यादेत पूर्ण करण्यात येणार आहे.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अ, ब, क, ड, इ, फ, ग व ह क्षेत्रीय कार्यालयांमध्ये तसेच सावित्रीबाई फुले स्मारकातील कार्यान्वित कक्षामध्ये नागरिकांनी आपल्या हरकती व सूचना निर्धारित मुदतीत सादर केल्या आहेत. प्राप्त अर्जांचे परीक्षण प्रगतीपथावर असून वाढीव मुदतीमुळे प्राप्त प्रकरणांची तपशीलवार पडताळणी करणे आणि प्रभागनिहाय यादीची अचूकता सुनिश्चित करणे अधिक सुलभ होणार आहे.


Spread the love

You may also like

Leave a Comment

आमच्याबद्दल – लोक मौर्य

“लोक मौर्य” हे एक विश्वासार्ह, अभ्यासपूर्ण आणि जनतेच्या आवाजाला प्रतिष्ठा देणारे डिजिटल वेबपोर्टल आहे. आम्ही बातम्यांची केवळ नोंद घेत नाही, तर त्या बातम्या समाजावर काय परिणाम करतात याचाही सखोल विचार करतो.

“लोक मौर्य” हे नाव केवळ एका समुदायाचं प्रतिनिधित्व करत नाही, तर ते समतेच्या तत्वावर आधारित न्याय्य समाजरचनेचं प्रतीक आहे. आम्ही प्रत्येक वर्गातील, जातीधर्मातील आणि प्रांतातील लोकांचे मुद्दे, सामाजिक बदल, आणि ऐतिहासिक सत्यता यांचा अभ्यासपूर्वक मागोवा घेतो.

आमचा प्रयत्न आहे की, “लोक मौर्य” हे व्यासपीठ सत्य, विवेक आणि संवेदनशीलतेने समृद्ध असावं. आम्ही कोणत्याही राजकीय पक्षाशी संलग्न नाही, पण जनतेच्या बाजूने ठामपणे उभं राहणं हीच आमची भूमिका आहे.

आम्ही विश्वास ठेवतो – लोकशाही टिकते ती सजग नागरिकांमुळे, आणि सजगता येते माहितीमुळे. “लोक मौर्य” हे त्या सजगतेचं माध्यम आहे.

 

मुख्य संपादक :- राम बनसोडे

संपर्क:- 8446439067

Edtior's Picks

Latest Articles

© 2025 Lok Maurya, All Rights Reserved | Website Developed & Maintained by Swara Infotech | 📞 9096040204
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00