Home देहू देहू नगरपंचायतीसमोर कर वसुलीचे मोठे संकट…

देहू नगरपंचायतीसमोर कर वसुलीचे मोठे संकट…

by Lokmauryanews@gmail.com
0 comments
Spread the love

पिंपरी चिंचवड (दि. 14 फेब्रुवारी 2026) :- देहू नगरपंचायतीसमोर मालमत्ता व पाणी कर वसुलीचे मोठे आव्हान उभे ठाकले असून आर्थिक वर्ष संपण्यास कमी कालावधी शिल्लक असताना प्रशासनाला थकबाकी वसुलीसाठी धडपड करावी लागत आहे. विशेष मोहिम राबवूनही अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने प्रशासनाने थकबाकीदारांवर कठोर कारवाई सुरू केली आहे.

नगरपंचायतीने सुरू केलेल्या वसुली मोहिमेत तीन दिवसांत सुमारे १६ लाख रुपयांची वसुली करण्यात आली असली तरी एकूण १९ कोटी रुपयांच्या उद्दिष्टाच्या तुलनेत ही रक्कम अत्यंत कमी असल्याचे स्पष्ट होत आहे. थकबाकी भरण्यास टाळाटाळ करणाऱ्या ३० मिळकतधारकांचे पाणी नळजोड तोडण्याची कारवाई प्रशासनाने केली आहे.

चालू आर्थिक वर्षात मालमत्ता कराच्या माध्यमातून सुमारे १५ कोटी रुपये तर पाणी करातून ४ कोटी रुपये वसूल करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. मात्र वसुलीचा वेग मंद असल्याने वित्त आयोगाच्या अनुदानावरही परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. १०० टक्के मालमत्ता कर वसुलीची अट पूर्ण न झाल्यास नगरपंचायतीला आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागू शकते.

कर वसुलीसाठी प्रशासनाकडून विविध सवलती व योजना राबविण्यात आल्या होत्या. मुदतीपूर्वी कर भरणाऱ्यांना सवलत देण्यासह लकी ड्रॉच्या माध्यमातून गृहोपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले होते. तसेच अभय योजनेंतर्गत व्याजावर मोठी सूट देऊनही अनेक मिळकतधारकांनी प्रतिसाद दिला नसल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.

banner

थकबाकी वसुलीसाठी प्रशासनाकडून नागरिकांना फोन, संदेश व नोटिसांच्या माध्यमातून संपर्क साधला जात आहे. परिसरात रिक्षामधून दवंडी देऊन जनजागृती केली जात आहे. तरीही अनेक नागरिक कर भरण्याकडे दुर्लक्ष करत असल्याचे समोर येत आहे.

वसुली मोहिमेदरम्यान काही ठिकाणी अनधिकृत नळजोड व मोटरच्या सहाय्याने पाणी उपसा केल्याचे प्रकार उघड झाले आहेत. अशा बेकायदेशीर प्रकारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी संबंधितांवर २० हजार रुपयांपर्यंत दंड आकारण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे. थकबाकीदारांनी तातडीने कर भरला नाही तर पुढील काळात आणखी कठोर कारवाई केली जाणार असल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.


Spread the love

You may also like

Leave a Comment

आमच्याबद्दल – लोक मौर्य

“लोक मौर्य” हे एक विश्वासार्ह, अभ्यासपूर्ण आणि जनतेच्या आवाजाला प्रतिष्ठा देणारे डिजिटल वेबपोर्टल आहे. आम्ही बातम्यांची केवळ नोंद घेत नाही, तर त्या बातम्या समाजावर काय परिणाम करतात याचाही सखोल विचार करतो.

“लोक मौर्य” हे नाव केवळ एका समुदायाचं प्रतिनिधित्व करत नाही, तर ते समतेच्या तत्वावर आधारित न्याय्य समाजरचनेचं प्रतीक आहे. आम्ही प्रत्येक वर्गातील, जातीधर्मातील आणि प्रांतातील लोकांचे मुद्दे, सामाजिक बदल, आणि ऐतिहासिक सत्यता यांचा अभ्यासपूर्वक मागोवा घेतो.

आमचा प्रयत्न आहे की, “लोक मौर्य” हे व्यासपीठ सत्य, विवेक आणि संवेदनशीलतेने समृद्ध असावं. आम्ही कोणत्याही राजकीय पक्षाशी संलग्न नाही, पण जनतेच्या बाजूने ठामपणे उभं राहणं हीच आमची भूमिका आहे.

आम्ही विश्वास ठेवतो – लोकशाही टिकते ती सजग नागरिकांमुळे, आणि सजगता येते माहितीमुळे. “लोक मौर्य” हे त्या सजगतेचं माध्यम आहे.

 

मुख्य संपादक :- राम बनसोडे

संपर्क:- 8446439067

Edtior's Picks

Latest Articles

© 2025 Lok Maurya, All Rights Reserved | Website Developed & Maintained by Swara Infotech | 📞 9096040204
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00