Home पिंपरी चिंचवड प्रभाग क्रमांक २८; पिंपळे सौदागरमधून अनिताताई संदीप काटे भाजपकडून प्रबळ दावेदार..

प्रभाग क्रमांक २८; पिंपळे सौदागरमधून अनिताताई संदीप काटे भाजपकडून प्रबळ दावेदार..

by Lokmauryanews@gmail.com
0 comments
Spread the love

पिंपळे सौदागर (दि. १० डिसेंबर २०२५) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणूक २०२६ च्या तयारीला वेग आला असून प्रभाग क्रमांक २८ (पिंपळे सौदागर) मधून भाजपच्या इच्छुकांमध्ये अनिताताई संदीप काटे यांच्या उमेदवारीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. मंगळवारी (दि. ०९) रोजी त्यांनी पक्षाकडे सर्वसाधारण महिला गटातून अधिकृत मागणी उमेदवारी अर्ज भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न बापू काटे यांच्याकडे सुपूर्त केला.

अनिताताई काटे यांनी प्रभागात गेल्या काही वर्षांपासून सातत्याने सामाजिक काम करत ओळख निर्माण केली आहे. महिलांमधील सक्रीय सहभाग, सोसायटी पातळीवरील जनसंपर्क, तसेच विविध समस्यांवर त्यांनी घेतलेली पुढाकाराची भूमिका यामुळे कार्यकर्त्यांमध्ये त्यांच्याबाबत सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. अर्ज दाखल करण्याच्या वेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते व समर्थक उपस्थित राहिल्याने त्यांच्या संघटनात्मक शक्तीला बळ मिळाले आहे.

पक्षातील अनुकूल वातावरण, प्रभागातील त्यांचा मजबूत संपर्क आणि शहराध्यक्षांसह वरिष्ठ नेतृत्वाच्या पाठींब्यामुळे अनिताताई काटे यांना भाजपची अधिकृत उमेदवारी मिळण्याची शक्यता अत्यंत बलवत्तर मानली जात आहे. त्यामुळे प्रभाग २८ मध्ये भाजपकडून त्यांची उमेदवारी जवळजवळ निश्चित असल्याची राजकीय वर्तुळातील चर्चा अधिकच जोर धरताना दिसत आहे.


Spread the love

You may also like

Leave a Comment

आमच्याबद्दल – लोक मौर्य

“लोक मौर्य” हे एक विश्वासार्ह, अभ्यासपूर्ण आणि जनतेच्या आवाजाला प्रतिष्ठा देणारे डिजिटल वेबपोर्टल आहे. आम्ही बातम्यांची केवळ नोंद घेत नाही, तर त्या बातम्या समाजावर काय परिणाम करतात याचाही सखोल विचार करतो.

“लोक मौर्य” हे नाव केवळ एका समुदायाचं प्रतिनिधित्व करत नाही, तर ते समतेच्या तत्वावर आधारित न्याय्य समाजरचनेचं प्रतीक आहे. आम्ही प्रत्येक वर्गातील, जातीधर्मातील आणि प्रांतातील लोकांचे मुद्दे, सामाजिक बदल, आणि ऐतिहासिक सत्यता यांचा अभ्यासपूर्वक मागोवा घेतो.

आमचा प्रयत्न आहे की, “लोक मौर्य” हे व्यासपीठ सत्य, विवेक आणि संवेदनशीलतेने समृद्ध असावं. आम्ही कोणत्याही राजकीय पक्षाशी संलग्न नाही, पण जनतेच्या बाजूने ठामपणे उभं राहणं हीच आमची भूमिका आहे.

आम्ही विश्वास ठेवतो – लोकशाही टिकते ती सजग नागरिकांमुळे, आणि सजगता येते माहितीमुळे. “लोक मौर्य” हे त्या सजगतेचं माध्यम आहे.

 

मुख्य संपादक :- राम बनसोडे

संपर्क:- 8446439067

Edtior's Picks

Latest Articles

© 2025 Lok Maurya, All Rights Reserved | Website Developed & Maintained by Swara Infotech | 📞 9096040204
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00