Home पिंपरी चिंचवड प्रभाग क्रमांक १९ मधून माजी नगरसेवक शैलेश मोरे भाजपचे दावेदार..

प्रभाग क्रमांक १९ मधून माजी नगरसेवक शैलेश मोरे भाजपचे दावेदार..

by Lokmauryanews@gmail.com
0 comments
Spread the love

पिंपरी (दि. १० डिसेंबर २०२५) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करण्याची सुरू असलेली प्रक्रिया वेग घेत आहे. प्रभाग क्रमांक १९ (आनंदनगर–पिंपरी कॅम्प) मधून भाजपचे माजी नगरसेवक शैलेश उर्फ शैलेंद्र प्रकाश मोरे यांनी भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न बापू काटे यांच्याकडे अधिकृतरित्या इच्छुक उमेदवारी अर्ज सुपूर्त केला.

अर्ज दाखल करताना पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रभागातील विविध विकासकामे, स्थानिक प्रश्न आणि आगामी निवडणूक रणनीतीबाबत मोरे यांनी पक्ष नेतृत्वासमोर आपली भूमिका मांडली. प्रभाग १९ हा मतदारसंघ राजकीय दृष्ट्या महत्त्वाचा मानला जात असल्याने या उमेदवारीकडे विशेष लक्ष वेधले जात आहे.

प्रभाग १९ मध्ये शैलेश मोरे यांच्या कामाचा ठसा असून ते आधीच लोकप्रतिनिधी राहिलेले आहेत. अनुभवी उमेदवारांना पक्ष प्राधान्य देतो. सध्याच्या परिस्थितीत शैलेश मोरे यांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे. अनुभव, स्थानिक कामाचा आधार, कार्यकर्त्यांचा पाठिंबा आणि प्रभागाचे महत्त्व हे घटक त्यांच्या बाजूने आहेत.

banner

Spread the love

You may also like

Leave a Comment

आमच्याबद्दल – लोक मौर्य

“लोक मौर्य” हे एक विश्वासार्ह, अभ्यासपूर्ण आणि जनतेच्या आवाजाला प्रतिष्ठा देणारे डिजिटल वेबपोर्टल आहे. आम्ही बातम्यांची केवळ नोंद घेत नाही, तर त्या बातम्या समाजावर काय परिणाम करतात याचाही सखोल विचार करतो.

“लोक मौर्य” हे नाव केवळ एका समुदायाचं प्रतिनिधित्व करत नाही, तर ते समतेच्या तत्वावर आधारित न्याय्य समाजरचनेचं प्रतीक आहे. आम्ही प्रत्येक वर्गातील, जातीधर्मातील आणि प्रांतातील लोकांचे मुद्दे, सामाजिक बदल, आणि ऐतिहासिक सत्यता यांचा अभ्यासपूर्वक मागोवा घेतो.

आमचा प्रयत्न आहे की, “लोक मौर्य” हे व्यासपीठ सत्य, विवेक आणि संवेदनशीलतेने समृद्ध असावं. आम्ही कोणत्याही राजकीय पक्षाशी संलग्न नाही, पण जनतेच्या बाजूने ठामपणे उभं राहणं हीच आमची भूमिका आहे.

आम्ही विश्वास ठेवतो – लोकशाही टिकते ती सजग नागरिकांमुळे, आणि सजगता येते माहितीमुळे. “लोक मौर्य” हे त्या सजगतेचं माध्यम आहे.

 

मुख्य संपादक :- राम बनसोडे

संपर्क:- 8446439067

Edtior's Picks

Latest Articles

© 2025 Lok Maurya, All Rights Reserved | Website Developed & Maintained by Swara Infotech | 📞 9096040204
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00