Home पिंपरी चिंचवड रावसाहेब माणिक डोंगरे यांची वाकड प्रभाग क्र. 25 साठी उमेदवारी; शहराध्यक्षांकडे अर्ज दाखल, कार्यकर्त्यांमध्ये उत्साह

रावसाहेब माणिक डोंगरे यांची वाकड प्रभाग क्र. 25 साठी उमेदवारी; शहराध्यक्षांकडे अर्ज दाखल, कार्यकर्त्यांमध्ये उत्साह

by Lokmauryanews@gmail.com
0 comments
Spread the love

पिंपरी-चिंचवडः (दि. १० डिसेंबर २०२५) :-  पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने (भाजप) इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यास सुरुवात केली असून, याच प्रक्रियेअंतर्गत वाकड प्रभाग क्रमांक २५ मध्ये गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यात सक्रिय असलेले रावसाहेब माणिक डोंगरे यांनी आपला उमेदवारी अर्ज शहराध्यक्षांकडे दाखल केला आहे.

डोंगरे यांच्या या कृतीमुळे प्रभाग क्र. २५ मधील नागरिक आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये निवडणुकीची चर्चा आता अधिकच तीव्र झाली आहे. पक्षाने ९ आणि १० डिसेंबर रोजी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज जमा करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या दरम्यान, रावसाहेब डोंगरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांच्या आणि समर्थकांच्या उपस्थितीत पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयात आपला अर्ज सादर केला. लोकप्रियतेमुळे उमेदवारीची चर्चा जोरात रावसाहेब माणिक डोंगरे यांचे प्रभाग क्रमांक २५ मध्ये गेल्या अनेक वर्षांपासून उल्लेखनीय समाजकारण सुरू आहे. त्यांची जनसामान्यांमध्ये असलेली लोकप्रियता आणि लोकांचे प्रश्न सोडवण्यातील त्यांची तत्परता त्यांना विशेष ओळख मिळवून देते.

जनसंपर्क आणि प्रश्न सोडवणूकः पाणीपुरवठा, सांडपाणी व्यवस्थापन, खराब रस्ते, आणि विजेच्या समस्यांसारख्या भारतीय जनता पार्टी परी-ि शहर जिल्हा हार्यालय स्थानिक अडचणींसाठी नागरिक कोणत्याही संकोचाशिवाय सरळ डोंगरे यांच्या संपर्कात येतात. तेही हे प्रश्न मार्गी लावण्यासाठी त्वरित आणि प्रभावीपणे कार्य करतात.

नागरिकांचा विश्वासः प्रभागातील जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी ते नेहमीच पुढाकार घेत असल्यामुळे नागरिक त्यांच्यावर विशेष विश्वास ठेवतात. त्यांच्या या कार्यामुळे, पक्षाने त्यांना उमेदवारी दिल्यास ते मोठ्या फरकाने विजयी होतील, अशी चर्चा आता परिसरातील नागरिकांमध्ये जोर धरू लागली आहे. रावसाहेब डोंगरे यांच्या उमेदवारी अर्जामुळे प्रभाग क्र. २५ मधील राजकीय वातावरण तापले असून, भाजप पक्षाकडून अंतिम उमेदवारी कोणाला मिळते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

banner

Spread the love

You may also like

Leave a Comment

आमच्याबद्दल – लोक मौर्य

“लोक मौर्य” हे एक विश्वासार्ह, अभ्यासपूर्ण आणि जनतेच्या आवाजाला प्रतिष्ठा देणारे डिजिटल वेबपोर्टल आहे. आम्ही बातम्यांची केवळ नोंद घेत नाही, तर त्या बातम्या समाजावर काय परिणाम करतात याचाही सखोल विचार करतो.

“लोक मौर्य” हे नाव केवळ एका समुदायाचं प्रतिनिधित्व करत नाही, तर ते समतेच्या तत्वावर आधारित न्याय्य समाजरचनेचं प्रतीक आहे. आम्ही प्रत्येक वर्गातील, जातीधर्मातील आणि प्रांतातील लोकांचे मुद्दे, सामाजिक बदल, आणि ऐतिहासिक सत्यता यांचा अभ्यासपूर्वक मागोवा घेतो.

आमचा प्रयत्न आहे की, “लोक मौर्य” हे व्यासपीठ सत्य, विवेक आणि संवेदनशीलतेने समृद्ध असावं. आम्ही कोणत्याही राजकीय पक्षाशी संलग्न नाही, पण जनतेच्या बाजूने ठामपणे उभं राहणं हीच आमची भूमिका आहे.

आम्ही विश्वास ठेवतो – लोकशाही टिकते ती सजग नागरिकांमुळे, आणि सजगता येते माहितीमुळे. “लोक मौर्य” हे त्या सजगतेचं माध्यम आहे.

 

मुख्य संपादक :- राम बनसोडे

संपर्क:- 8446439067

Edtior's Picks

Latest Articles

© 2025 Lok Maurya, All Rights Reserved | Website Developed & Maintained by Swara Infotech | 📞 9096040204
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00