Home पिंपरी चिंचवड विकासाचा मुद्दा केंद्रस्थानी ठेवत नागरिकांशी संवाद – निशा यादव..

विकासाचा मुद्दा केंद्रस्थानी ठेवत नागरिकांशी संवाद – निशा यादव..

by Lokmauryanews@gmail.com
0 comments
Spread the love

पिंपरी (दि. १५ डिसेंबर २०२५):- चिखली कृष्णा नगर परिसरात सुरू असलेल्या प्रचारातून नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचण्यात भाजपच्या सक्रिय सदस्य आणि इंद्रायणी महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्ष निशा दिनेश यादव यांनी आघाडी घेतल्याचे चित्र दिसत आहे. सुरुवातीपासूनच विकासाचा मुद्दा केंद्रस्थानी ठेवत नागरिकांशी थेट संवाद साधला जात असल्याने प्रचाराला मोठा प्रतिसाद मिळत आहे.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तयारीला वेग आला असून, आमदार श्री. महेशदादा लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून नागरिकांच्या सेवेसाठी मैदानात उतरण्याचा दृढ संकल्प निशा दिनेश यादव यांनी व्यक्त केला आहे.

नागरिकांपर्यंत पोहोचण्यात मिळालेली आघाडी महत्त्वाची.

रविवारी सुट्टीचा मुहूर्त साधत प्रचाराच्या माध्यमातून प्रभागातील विविध ठिकाणी नागरिकांच्या गाठीभेटी घेण्यात आल्या. ठिकठिकाणी नागरिकांनी उत्स्फूर्त स्वागत केले. भाजपच्या विकासाच्या अजेंड्यावर विश्वास व्यक्त करत नागरिकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. प्रचाराच्या केवळ चौथ्या दिवसातच नागरिकांमध्ये पोहोचण्यात मिळालेली आघाडी ही आगामी काळासाठी महत्त्वाची मानली जात आहे.

banner

पती दिनेश यादव यांनी भाजपा युवा मोर्चाच्या माध्यमातून यापूर्वी केलेल्या विविध विकासकामांमुळे नागरिकांमध्ये विश्वास निर्माण झाला असून, त्याची पोचपावती या प्रचारादरम्यान मिळताना दिसत आहे. नागरिकांनी दाखवलेले प्रेम आणि दिलेले आशीर्वाद यामुळे मन भारावून गेले आहे. लवकरच घराघरांत जाऊन प्रत्येक कुटुंबाशी संवाद साधण्याचा मानस असून, विकासाचा अजेंडा घेऊनच नागरिकांसमोर जात राहणार आहे.
निशा दिनेश यादव – अध्यक्ष इंद्रायणी महिला प्रतिष्ठान.


Spread the love

You may also like

Leave a Comment

आमच्याबद्दल – लोक मौर्य

“लोक मौर्य” हे एक विश्वासार्ह, अभ्यासपूर्ण आणि जनतेच्या आवाजाला प्रतिष्ठा देणारे डिजिटल वेबपोर्टल आहे. आम्ही बातम्यांची केवळ नोंद घेत नाही, तर त्या बातम्या समाजावर काय परिणाम करतात याचाही सखोल विचार करतो.

“लोक मौर्य” हे नाव केवळ एका समुदायाचं प्रतिनिधित्व करत नाही, तर ते समतेच्या तत्वावर आधारित न्याय्य समाजरचनेचं प्रतीक आहे. आम्ही प्रत्येक वर्गातील, जातीधर्मातील आणि प्रांतातील लोकांचे मुद्दे, सामाजिक बदल, आणि ऐतिहासिक सत्यता यांचा अभ्यासपूर्वक मागोवा घेतो.

आमचा प्रयत्न आहे की, “लोक मौर्य” हे व्यासपीठ सत्य, विवेक आणि संवेदनशीलतेने समृद्ध असावं. आम्ही कोणत्याही राजकीय पक्षाशी संलग्न नाही, पण जनतेच्या बाजूने ठामपणे उभं राहणं हीच आमची भूमिका आहे.

आम्ही विश्वास ठेवतो – लोकशाही टिकते ती सजग नागरिकांमुळे, आणि सजगता येते माहितीमुळे. “लोक मौर्य” हे त्या सजगतेचं माध्यम आहे.

 

मुख्य संपादक :- राम बनसोडे

संपर्क:- 8446439067

Edtior's Picks

Latest Articles

© 2025 Lok Maurya, All Rights Reserved | Website Developed & Maintained by Swara Infotech | 📞 9096040204
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00