Home पिंपरी चिंचवड चिखली-मोरेवस्तीसह परिसरात रुपालीताई पांडाभाऊ साने यांचा प्रचार जोमात..

चिखली-मोरेवस्तीसह परिसरात रुपालीताई पांडाभाऊ साने यांचा प्रचार जोमात..

by Lokmauryanews@gmail.com
0 comments
Spread the love

चिखली (दि. १५ डिसेंबर २०२५):-  नियोजित पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १ टाळगाव–चिखली परिसरात राजकीय हालचालींना वेग आला असून सर्वसाधारण महिला गटातून भारतीय जनता पार्टीच्या इच्छुक उमेदवार रुपाली पांडाभाऊ साने यांचा प्रचार सध्या जोमात सुरू आहे. युवा नेते पांडाभाऊ साने यांच्या सक्रिय सहभागातून रुपालीताई पांडाभाऊ साने या प्रभागातील प्रत्येक घरापर्यंत पोहोचत आहेत.

म्हेत्रेवस्ती, ताम्हाणेवस्ती, मोरेवस्ती आदी भागांत प्रत्यक्ष गाठीभेटी, घराघरांत संवाद, नागरिकांच्या समस्या जाणून घेणे आणि त्यावर उपाययोजनांची दिशा मांडणे यावर त्यांच्या प्रचाराचा भर दिसून येत आहे. पाणीपुरवठा, रस्ते, ड्रेनेज, कचरा व्यवस्थापन, स्ट्रीटलाईट, महिला व युवकांचे प्रश्न याबाबत नागरिकांकडून मोकळेपणाने मते व्यक्त केली जात असून त्या समस्या महापालिकेत प्रभावीपणे मांडण्याचा निर्धार रुपालीताई साने यांनी व्यक्त केला आहे.

या प्रचारादरम्यान मतदारांमध्ये यंदा परिवर्तन करण्याची स्पष्ट भावना दिसून येत असून, “प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी सक्षम, अभ्यासू आणि सातत्याने संपर्कात राहणारे नेतृत्व हवे” अशी अपेक्षा अनेक नागरिक व्यक्त करत आहेत. विशेषतः महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद या गाठीभेटींना मिळत आहे.

युवा नेते पांडाभाऊ साने यांनीही प्रचारादरम्यान सांगितले की, टाळगाव–चिखली प्रभागाला विकासाच्या नव्या दिशेने नेण्यासाठी प्रामाणिक आणि लोकाभिमुख नेतृत्वाची गरज आहे. त्याच दृष्टीने रुपाली साने या सातत्याने काम करत असून आगामी महापालिका निवडणुकीत प्रभागात परिवर्तन घडवण्यासाठी नागरिकांनी एकत्र यावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

banner

Spread the love

You may also like

Leave a Comment

आमच्याबद्दल – लोक मौर्य

“लोक मौर्य” हे एक विश्वासार्ह, अभ्यासपूर्ण आणि जनतेच्या आवाजाला प्रतिष्ठा देणारे डिजिटल वेबपोर्टल आहे. आम्ही बातम्यांची केवळ नोंद घेत नाही, तर त्या बातम्या समाजावर काय परिणाम करतात याचाही सखोल विचार करतो.

“लोक मौर्य” हे नाव केवळ एका समुदायाचं प्रतिनिधित्व करत नाही, तर ते समतेच्या तत्वावर आधारित न्याय्य समाजरचनेचं प्रतीक आहे. आम्ही प्रत्येक वर्गातील, जातीधर्मातील आणि प्रांतातील लोकांचे मुद्दे, सामाजिक बदल, आणि ऐतिहासिक सत्यता यांचा अभ्यासपूर्वक मागोवा घेतो.

आमचा प्रयत्न आहे की, “लोक मौर्य” हे व्यासपीठ सत्य, विवेक आणि संवेदनशीलतेने समृद्ध असावं. आम्ही कोणत्याही राजकीय पक्षाशी संलग्न नाही, पण जनतेच्या बाजूने ठामपणे उभं राहणं हीच आमची भूमिका आहे.

आम्ही विश्वास ठेवतो – लोकशाही टिकते ती सजग नागरिकांमुळे, आणि सजगता येते माहितीमुळे. “लोक मौर्य” हे त्या सजगतेचं माध्यम आहे.

 

मुख्य संपादक :- राम बनसोडे

संपर्क:- 8446439067

Edtior's Picks

Latest Articles

© 2025 Lok Maurya, All Rights Reserved | Website Developed & Maintained by Swara Infotech | 📞 9096040204
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00