Home पिंपरी चिंचवड निवडणूक संपल्यानंतर पिंपरी चिंचवड पोलिसांच्या कारवाईला वेग?..

निवडणूक संपल्यानंतर पिंपरी चिंचवड पोलिसांच्या कारवाईला वेग?..

by Lokmauryanews@gmail.com
0 comments
Spread the love

पिंपरी-चिंचवड (दि. 8 फेब्रुवारी २०२६) :- पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयाने शहरातील वाढत्या गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी मोठी कारवाई करत १२ धोकादायक गुन्हेगारांवर एमपीडीए (महाराष्ट्र प्रतिबंधक गुन्हेगारी कायदा) अंतर्गत स्थानबद्धतेची कारवाई केली आहे. तसेच जानेवारी महिन्यात विविध परिमंडळांत एकूण ४६ सराईत गुन्हेगारांवर हद्दपारीचे आदेश लागू करण्यात आले आहेत.

 

पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली खून, खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, दरोडे, अपहरण, महिलांवरील अत्याचार आणि बेकायदेशीर शस्त्र बाळगणे अशा गंभीर गुन्ह्यांमध्ये सक्रिय असलेल्या गुन्हेगारांवर कारवाई करण्यात आली. चाकण उत्तर व उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यांच्या हद्दीत कार्यरत असलेल्या दोन कुख्यात गुन्हेगारांना एमपीडीए अंतर्गत ताब्यात घेण्यात आले असून त्यांना कारागृहात ठेवण्यात आले आहे.

 

banner

याशिवाय पोलिसांनी जानेवारी महिन्यात सराईत गुन्हेगारांविरोधात मोठी मोहीम राबवली. परिमंडळ एकमध्ये १०, परिमंडळ दोनमध्ये ९, परिमंडळ तीनमध्ये १७ आणि परिमंडळ चारमध्ये ११ अशा एकूण ४६ गुन्हेगारांना हद्दपार करण्यात आले. संबंधित गुन्हेगारांवर महाराष्ट्र पोलीस अधिनियमातील कलम ५५, ५६ व ५७ नुसार ही कारवाई करण्यात आली आहे.

 

पोलिसांनी हद्दपार केलेले अनेक गुन्हेगार हे २० ते ४० वयोगटातील असून त्यांच्या हालचालींवर विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे. हद्दपार कालावधीत संबंधित गुन्हेगार पुणे जिल्ह्यात आढळल्यास तातडीने नियंत्रण कक्ष किंवा जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी नागरिकांना केले आहे.

 

या कारवायांमुळे शहरातील गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यास मदत होणार असून भविष्यातही अशाच प्रतिबंधात्मक कारवाया सुरू ठेवण्यात येणार असल्याची माहिती पोलिस प्रशासनाने दिली आहे.


Spread the love

You may also like

Leave a Comment

आमच्याबद्दल – लोक मौर्य

“लोक मौर्य” हे एक विश्वासार्ह, अभ्यासपूर्ण आणि जनतेच्या आवाजाला प्रतिष्ठा देणारे डिजिटल वेबपोर्टल आहे. आम्ही बातम्यांची केवळ नोंद घेत नाही, तर त्या बातम्या समाजावर काय परिणाम करतात याचाही सखोल विचार करतो.

“लोक मौर्य” हे नाव केवळ एका समुदायाचं प्रतिनिधित्व करत नाही, तर ते समतेच्या तत्वावर आधारित न्याय्य समाजरचनेचं प्रतीक आहे. आम्ही प्रत्येक वर्गातील, जातीधर्मातील आणि प्रांतातील लोकांचे मुद्दे, सामाजिक बदल, आणि ऐतिहासिक सत्यता यांचा अभ्यासपूर्वक मागोवा घेतो.

आमचा प्रयत्न आहे की, “लोक मौर्य” हे व्यासपीठ सत्य, विवेक आणि संवेदनशीलतेने समृद्ध असावं. आम्ही कोणत्याही राजकीय पक्षाशी संलग्न नाही, पण जनतेच्या बाजूने ठामपणे उभं राहणं हीच आमची भूमिका आहे.

आम्ही विश्वास ठेवतो – लोकशाही टिकते ती सजग नागरिकांमुळे, आणि सजगता येते माहितीमुळे. “लोक मौर्य” हे त्या सजगतेचं माध्यम आहे.

 

मुख्य संपादक :- राम बनसोडे

संपर्क:- 8446439067

Edtior's Picks

Latest Articles

© 2025 Lok Maurya, All Rights Reserved | Website Developed & Maintained by Swara Infotech | 📞 9096040204
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00