Home पिंपरी चिंचवड ‘महापौर वैद्यकीय सहाय्यता निधी’ वाढीव निधीसह तातडीने सुरू करा..

‘महापौर वैद्यकीय सहाय्यता निधी’ वाढीव निधीसह तातडीने सुरू करा..

by Lokmauryanews@gmail.com
0 comments
Spread the love

पिंपरी चिंचवड (दि. 11 फेब्रुवारी २०२६) :- पिंपरी-चिंचवड शहरातील गरजू रुग्णांना आर्थिक मदत मिळावी यासाठी बंद असलेला महापौर वैद्यकीय सहाय्यता निधी तातडीने सुरू करण्यात यावा तसेच निधीची रक्कम वाढविण्यात यावी, अशी मागणी भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने दिनेश यादव यांच्याकडून करण्यात आली आहे.

याबाबत भारतीय जनता युवा मोर्चा, पिंपरी-चिंचवड शहराच्या पदाधिकाऱ्यांनी महापौर रवी भाऊ लांडगे यांना लेखी निवेदन दिले. सध्या हा निधी बंद असल्यामुळे शहरातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना उपचारासाठी आवश्यक मदत मिळत नसल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

शहरात विविध आजारांमुळे अनेक रुग्णांना मोठा वैद्यकीय खर्च परवडत नाही. अशा रुग्णांसाठी महापौर वैद्यकीय सहाय्यता निधी हा महत्त्वाचा आधार ठरू शकतो. त्यामुळे हा निधी त्वरित कार्यान्वित करून अधिकाधिक नागरिकांना त्याचा लाभ मिळावा, अशी मागणी युवा मोर्चाकडून करण्यात आली आहे.

तसेच वाढत्या वैद्यकीय खर्चाच्या पार्श्वभूमीवर निधीची रक्कम वाढवून अधिक रुग्णांना सहाय्य देण्याची आवश्यकता असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या मागणीवर महापालिका प्रशासन व महापौर काय निर्णय घेतात, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.

banner

Spread the love

You may also like

Leave a Comment

आमच्याबद्दल – लोक मौर्य

“लोक मौर्य” हे एक विश्वासार्ह, अभ्यासपूर्ण आणि जनतेच्या आवाजाला प्रतिष्ठा देणारे डिजिटल वेबपोर्टल आहे. आम्ही बातम्यांची केवळ नोंद घेत नाही, तर त्या बातम्या समाजावर काय परिणाम करतात याचाही सखोल विचार करतो.

“लोक मौर्य” हे नाव केवळ एका समुदायाचं प्रतिनिधित्व करत नाही, तर ते समतेच्या तत्वावर आधारित न्याय्य समाजरचनेचं प्रतीक आहे. आम्ही प्रत्येक वर्गातील, जातीधर्मातील आणि प्रांतातील लोकांचे मुद्दे, सामाजिक बदल, आणि ऐतिहासिक सत्यता यांचा अभ्यासपूर्वक मागोवा घेतो.

आमचा प्रयत्न आहे की, “लोक मौर्य” हे व्यासपीठ सत्य, विवेक आणि संवेदनशीलतेने समृद्ध असावं. आम्ही कोणत्याही राजकीय पक्षाशी संलग्न नाही, पण जनतेच्या बाजूने ठामपणे उभं राहणं हीच आमची भूमिका आहे.

आम्ही विश्वास ठेवतो – लोकशाही टिकते ती सजग नागरिकांमुळे, आणि सजगता येते माहितीमुळे. “लोक मौर्य” हे त्या सजगतेचं माध्यम आहे.

 

मुख्य संपादक :- राम बनसोडे

संपर्क:- 8446439067

Edtior's Picks

Latest Articles

© 2025 Lok Maurya, All Rights Reserved | Website Developed & Maintained by Swara Infotech | 📞 9096040204
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00