Home पिंपरी चिंचवड फुगेवाडी भूयारीमार्गाची दुरवस्था; दुर्गंधी व मद्यपींच्या अड्ड्यामुळे नागरिक त्रस्त..

फुगेवाडी भूयारीमार्गाची दुरवस्था; दुर्गंधी व मद्यपींच्या अड्ड्यामुळे नागरिक त्रस्त..

by Lokmauryanews@gmail.com
0 comments
Spread the love

पिंपरी चिंचवड (दि. 13 फेब्रुवारी 2026) :- फुगेवाडी येथील भूयारीमार्गाची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाली असून नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या भूयारीमार्गाची रंगरंगोटी न झाल्यामुळे भिंतींची अवस्था अत्यंत खराब झाली आहे. तसेच पावसाळी पाणी निचऱ्यासाठी दोन्ही बाजूंना करण्यात आलेल्या चरांमध्ये मोठ्या प्रमाणावर कचरा साचला असून त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत आहे.

या भूयारीमार्गाजवळ महानगरपालिकेची शाळा असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी या मार्गाचा वापर करतात. मात्र साचलेल्या घाण पाण्यामुळे विषाणूजन्य आजार पसरण्याची शक्यता निर्माण झाली असून पालकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.

याशिवाय संध्याकाळच्या वेळी या ठिकाणी मद्यपींचा अड्डा भरत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. त्यामुळे अनेक नागरिक व महिला संध्याकाळी या भूयारीमार्गातून प्रवास करण्यास टाळाटाळ करत आहेत. पोलिसांकडून अधूनमधून पेट्रोलिंग केले जात असले तरी त्याचा प्रभाव दिसून येत नसल्याची नाराजी नागरिकांनी व्यक्त केली आहे.

या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अर्बन सेल शहराध्यक्ष प्रदीप गायकवाड यांनी प्रशासनाने तात्काळ लक्ष देऊन भूयारीमार्गाची स्वच्छता, दुरुस्ती व सुरक्षेची उपाययोजना करावी, अशी मागणी केली आहे. अन्यथा नागरिकांच्या आरोग्य व सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनू शकतो, अशीही त्यांनी चिंता व्यक्त केली आहे.

banner

Spread the love

You may also like

Leave a Comment

आमच्याबद्दल – लोक मौर्य

“लोक मौर्य” हे एक विश्वासार्ह, अभ्यासपूर्ण आणि जनतेच्या आवाजाला प्रतिष्ठा देणारे डिजिटल वेबपोर्टल आहे. आम्ही बातम्यांची केवळ नोंद घेत नाही, तर त्या बातम्या समाजावर काय परिणाम करतात याचाही सखोल विचार करतो.

“लोक मौर्य” हे नाव केवळ एका समुदायाचं प्रतिनिधित्व करत नाही, तर ते समतेच्या तत्वावर आधारित न्याय्य समाजरचनेचं प्रतीक आहे. आम्ही प्रत्येक वर्गातील, जातीधर्मातील आणि प्रांतातील लोकांचे मुद्दे, सामाजिक बदल, आणि ऐतिहासिक सत्यता यांचा अभ्यासपूर्वक मागोवा घेतो.

आमचा प्रयत्न आहे की, “लोक मौर्य” हे व्यासपीठ सत्य, विवेक आणि संवेदनशीलतेने समृद्ध असावं. आम्ही कोणत्याही राजकीय पक्षाशी संलग्न नाही, पण जनतेच्या बाजूने ठामपणे उभं राहणं हीच आमची भूमिका आहे.

आम्ही विश्वास ठेवतो – लोकशाही टिकते ती सजग नागरिकांमुळे, आणि सजगता येते माहितीमुळे. “लोक मौर्य” हे त्या सजगतेचं माध्यम आहे.

 

मुख्य संपादक :- राम बनसोडे

संपर्क:- 8446439067

Edtior's Picks

Latest Articles

© 2025 Lok Maurya, All Rights Reserved | Website Developed & Maintained by Swara Infotech | 📞 9096040204
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00