Home पिंपरी चिंचवड जांबे येथील जमीन व्यवहारात वाकडच्या बिल्डरची कोटीची फसवणूक…

जांबे येथील जमीन व्यवहारात वाकडच्या बिल्डरची कोटीची फसवणूक…

by Lokmauryanews@gmail.com
0 comments
Spread the love

पिंपरी चिंचवड (दि. 14फेब्रुवारी 2026) :- जांबे (ता. मुळशी) येथील जमीन खरेदी करून देण्याचे आमिष दाखवत तब्बल १ कोटी १० लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी हिंजवडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार मे २०११ पासून सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

या प्रकरणी तुषार आत्माराम कलाटे (वय ४५, व्यवसाय बिल्डर, रा. वाकड) यांनी फिर्याद दिली आहे. आरोपी राजेंद्र कोंडीबा शितोळे (रा. जांबे, ता. मुळशी) आणि हिरामण ज्ञानोवा वाझे (रा. थेरगाव, पुणे) यांनी जांबे गावच्या हद्दीत जमीन खरेदी करून देण्याचे आश्वासन दिले होते, अशी तक्रार आहे.

फिर्यादी यांच्या म्हणण्यानुसार, आरोपींनी वेळोवेळी रोख रक्कम तसेच खात्यावरून पैसे घेतले. मात्र प्रत्यक्षात जमीन व्यवहार पूर्ण न करता संबंधित रक्कम परत केली नाही. एकूण १ कोटी १० लाख रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या प्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला असून आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक साळी करीत आहेत.

जमीन व्यवहार करताना आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करूनच आर्थिक व्यवहार करावेत, असे आवाहन पोलिसांनी नागरिकांना केले आहे.

banner

Spread the love

You may also like

Leave a Comment

आमच्याबद्दल – लोक मौर्य

“लोक मौर्य” हे एक विश्वासार्ह, अभ्यासपूर्ण आणि जनतेच्या आवाजाला प्रतिष्ठा देणारे डिजिटल वेबपोर्टल आहे. आम्ही बातम्यांची केवळ नोंद घेत नाही, तर त्या बातम्या समाजावर काय परिणाम करतात याचाही सखोल विचार करतो.

“लोक मौर्य” हे नाव केवळ एका समुदायाचं प्रतिनिधित्व करत नाही, तर ते समतेच्या तत्वावर आधारित न्याय्य समाजरचनेचं प्रतीक आहे. आम्ही प्रत्येक वर्गातील, जातीधर्मातील आणि प्रांतातील लोकांचे मुद्दे, सामाजिक बदल, आणि ऐतिहासिक सत्यता यांचा अभ्यासपूर्वक मागोवा घेतो.

आमचा प्रयत्न आहे की, “लोक मौर्य” हे व्यासपीठ सत्य, विवेक आणि संवेदनशीलतेने समृद्ध असावं. आम्ही कोणत्याही राजकीय पक्षाशी संलग्न नाही, पण जनतेच्या बाजूने ठामपणे उभं राहणं हीच आमची भूमिका आहे.

आम्ही विश्वास ठेवतो – लोकशाही टिकते ती सजग नागरिकांमुळे, आणि सजगता येते माहितीमुळे. “लोक मौर्य” हे त्या सजगतेचं माध्यम आहे.

 

मुख्य संपादक :- राम बनसोडे

संपर्क:- 8446439067

Edtior's Picks

Latest Articles

© 2025 Lok Maurya, All Rights Reserved | Website Developed & Maintained by Swara Infotech | 📞 9096040204
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00