Home पिंपरी चिंचवड आकुर्डीत व्हॅलेंटाईन डे दिवशी खळबळ…

आकुर्डीत व्हॅलेंटाईन डे दिवशी खळबळ…

by Lokmauryanews@gmail.com
0 comments
Spread the love

पिंपरी चिंचवड (दि. १४ फेब्रुवारी २०२६) :- सर्वत्र व्हॅलेंटाईन डेचे वातावरण असताना पिंपरी-चिंचवड शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे. आकुर्डीतील गुरुद्वारा चौकात एका २३ वर्षीय तरुणाने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना समोर आली असून त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. प्राथमिक तपासात प्रेमसंबंधातून हे टोकाचे पाऊल उचलल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चिंचवड पोलीस स्टेशन हद्दीतील गुरुद्वारा चौकाजवळील एका घरात समर्थ संजय माळी (वय २३) या तरुणाने दुपारच्या सुमारास गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली. समर्थ माळी हा मूळचा सोलापूर जिल्ह्यातील रहिवासी असून मागील काही दिवसांपासून तो आकुर्डी रेल्वे स्टेशनजवळील गुरुद्वारा कॉलनी परिसरात मित्रांसोबत राहत होता.

आज दुपारी त्याचे मित्र मेसमध्ये जेवणासाठी बाहेर गेले असताना समर्थ एकटाच खोलीत होता. त्याचवेळी त्याने गळफास घेत आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मित्र परत आल्यानंतर ही घटना उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच चिंचवड पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.

दरम्यान, आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. प्रेमसंबंधातून त्याने हे पाऊल उचलल्याची चर्चा असली तरी पोलिसांकडून याबाबत अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही. या प्रकरणी चिंचवड पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.

banner

Spread the love

You may also like

Leave a Comment

आमच्याबद्दल – लोक मौर्य

“लोक मौर्य” हे एक विश्वासार्ह, अभ्यासपूर्ण आणि जनतेच्या आवाजाला प्रतिष्ठा देणारे डिजिटल वेबपोर्टल आहे. आम्ही बातम्यांची केवळ नोंद घेत नाही, तर त्या बातम्या समाजावर काय परिणाम करतात याचाही सखोल विचार करतो.

“लोक मौर्य” हे नाव केवळ एका समुदायाचं प्रतिनिधित्व करत नाही, तर ते समतेच्या तत्वावर आधारित न्याय्य समाजरचनेचं प्रतीक आहे. आम्ही प्रत्येक वर्गातील, जातीधर्मातील आणि प्रांतातील लोकांचे मुद्दे, सामाजिक बदल, आणि ऐतिहासिक सत्यता यांचा अभ्यासपूर्वक मागोवा घेतो.

आमचा प्रयत्न आहे की, “लोक मौर्य” हे व्यासपीठ सत्य, विवेक आणि संवेदनशीलतेने समृद्ध असावं. आम्ही कोणत्याही राजकीय पक्षाशी संलग्न नाही, पण जनतेच्या बाजूने ठामपणे उभं राहणं हीच आमची भूमिका आहे.

आम्ही विश्वास ठेवतो – लोकशाही टिकते ती सजग नागरिकांमुळे, आणि सजगता येते माहितीमुळे. “लोक मौर्य” हे त्या सजगतेचं माध्यम आहे.

 

मुख्य संपादक :- राम बनसोडे

संपर्क:- 8446439067

Edtior's Picks

Latest Articles

© 2025 Lok Maurya, All Rights Reserved | Website Developed & Maintained by Swara Infotech | 📞 9096040204
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00