Home पिंपरी चिंचवड श्रीक्षेत्र भंडारा डोंगर हे वारकरी संप्रदायातील प्रेरणादायी शक्ती स्थळ..

श्रीक्षेत्र भंडारा डोंगर हे वारकरी संप्रदायातील प्रेरणादायी शक्ती स्थळ..

by Lokmauryanews@gmail.com
0 comments
Spread the love

देहूगाव प्रतिनिधी (दि. १६ फेब्रुवारी २०२६) :- श्रीक्षेत्र भंडारा डोंगर ही साधनेची भूमी, चिंतन भूमी, अद्यात्मिक भूमी असून अखिल विश्वाच्या कल्याणासाठी, भक्तीचा मार्ग दाखविणारी, पंचम वेद असणाऱ्या गाथेची निर्मिती विश्ववंदनीय, जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांनी याच पवित्र अशा भूमीमध्ये केली. हिंदवी स्वराजाचे संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी देखील तुकोबारायांच्या कार्यातून स्फूर्ती घेतली. श्रीक्षेत्र भंडारा डोंगर ही भूमी अतिशय समाधान व प्रसन्नता देणारी असून येथे येणाऱ्या प्रत्येक भाविकास आशीर्वाद देण्यासाठी तुकोबाराय आपल्या कार्याने, तत्परतेने उभे आहेत, असे आजही जाणवते. त्यामुळे आगामी काळात श्रीक्षेत्र भंडारा डोंगर वारकरी संप्रदायातील एक प्रेरणादायी शक्ती स्थळ म्हणून उदयास येईल, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहसरकार्यवाह अतुल लिमये यांनी श्रीक्षेत्र भंडारा डोंगर येथे केले.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहसरकार्यवाह अतुल लिमये यांनी श्रीक्षेत्र भंडारा डोंगराला भेट देऊन संत तुकोबारायांचे दर्शन घेऊन तुकोबारायांच्या भव्य-दिव्य मंदिर निर्माण कार्याची पाहणी केली. श्रीक्षेत्र भंडारा डोंगर ट्रस्टच्या वतीने लिमये यांचे श्रीक्षेत्र भंडारा डोंगरावर टाळ, मृदंगाच्या गजरात पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आले. लिमये यांच्या शुभहस्ते श्री विठ्ठल- रुखमाई, संत तुकाराम महाराज यांची आरती संपन्न झाल्यानंतर ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब काशिद यांच्या शुभहस्ते शाल, श्रीफळ, पगडी व वीणा प्रदान करून लिमये यांचा सत्कार करण्यात आला. अयोध्या नगरीत साकारण्यात आलेल्या प्रभू श्री रामांच्या मंदिराचे शिल्पकारच या मंदिर निर्माणाचे कार्य करीत असल्याबद्दल लिमये यांनी समाधान व्यक्त करीत उपस्थित भाविक व ट्रस्टच्या सदस्यांशी संवाद साधताना सांगितले की आजपर्यंत संतांनी, महापुरुषांनी केलेल्या साधनेला व पराक्रमाला प्रेरणा मानून समाजात अनेक दीपस्तंभ उभे राहिले आहेत. संत तुकाराम महाराजांच्या या पुण्यभूमी मध्ये पाचवा वेद निर्माण झाला आहे. देव, देश धर्म व मानवतेच्या कल्याणासाठी साधुसंतांनी आपले जीवन व्यतीत केले आहे. साधुसंतांच्या याच विचारांवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ गेली शंभर वर्षे समाजाचे संघटन व राष्ट्राचे पुनरुत्थान व मानवतेचे कल्याण या भूमिकेतून अविरत कार्यरत आहे.

याप्रसंगी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम महाराष्ट्र धर्माचार्य संपर्क प्रमुख व श्रीक्षेत्र पंढरपूर येथील विठ्ठल-रखुमाई देवस्थानचे विश्वस्त हभप शिवाजी महाराज मोरे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत कार्यकारणी सदस्य विनायकराव थोरात, पुणे विभाग सहकार्यवाह अविनाश भेगडे, पुणे विभाग प्रचारक मंगेश बडवे, पुणे जिल्हा कार्यवाह हेमंत दाभाडे, पिंपरी-चिंचवड जिल्हा कार्यवाह नरेंद्र पेंडसे, पिंपरी-चिंचवड जिल्हा संपर्कप्रमुख सोमनाथ बोडके, देहू गट कार्यवाह सचिन ढोबळे, श्रीक्षेत्र देहूतील शिळा मंदिरातील तुकोबारायांची सुंदर मूर्ती घडविणारे शिल्पकार चेतन हिंगे, शिवराज हगवणे तसेच श्रीक्षेत्र भंडारा डोंगर ट्रस्टचे सर्व विश्वस्त, पदाधिकारी, सदस्य व भाविक उपस्थित होते.

श्रीक्षेत्र भंडारा डोंगरावर होत असलेल्या मंदिर निर्माण कार्याची सविस्तर माहिती ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब काशिद यांनी प्रस्ताविकातून दिली व हभप रवींद्र महाराज ढोरे यांनी आभार व्यक्त केले.

banner

Spread the love

You may also like

Leave a Comment

आमच्याबद्दल – लोक मौर्य

“लोक मौर्य” हे एक विश्वासार्ह, अभ्यासपूर्ण आणि जनतेच्या आवाजाला प्रतिष्ठा देणारे डिजिटल वेबपोर्टल आहे. आम्ही बातम्यांची केवळ नोंद घेत नाही, तर त्या बातम्या समाजावर काय परिणाम करतात याचाही सखोल विचार करतो.

“लोक मौर्य” हे नाव केवळ एका समुदायाचं प्रतिनिधित्व करत नाही, तर ते समतेच्या तत्वावर आधारित न्याय्य समाजरचनेचं प्रतीक आहे. आम्ही प्रत्येक वर्गातील, जातीधर्मातील आणि प्रांतातील लोकांचे मुद्दे, सामाजिक बदल, आणि ऐतिहासिक सत्यता यांचा अभ्यासपूर्वक मागोवा घेतो.

आमचा प्रयत्न आहे की, “लोक मौर्य” हे व्यासपीठ सत्य, विवेक आणि संवेदनशीलतेने समृद्ध असावं. आम्ही कोणत्याही राजकीय पक्षाशी संलग्न नाही, पण जनतेच्या बाजूने ठामपणे उभं राहणं हीच आमची भूमिका आहे.

आम्ही विश्वास ठेवतो – लोकशाही टिकते ती सजग नागरिकांमुळे, आणि सजगता येते माहितीमुळे. “लोक मौर्य” हे त्या सजगतेचं माध्यम आहे.

 

मुख्य संपादक :- राम बनसोडे

संपर्क:- 8446439067

Edtior's Picks

Latest Articles

© 2025 Lok Maurya, All Rights Reserved | Website Developed & Maintained by Swara Infotech | 📞 9096040204
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00