Home पिंपरी चिंचवड महाराष्ट्र किकबॉक्सिंग असोसिएशनचे चेअरमन संतोष बारणे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा..

महाराष्ट्र किकबॉक्सिंग असोसिएशनचे चेअरमन संतोष बारणे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा..

by Lokmauryanews@gmail.com
0 comments
Spread the love

महाराष्ट्र किकबॉक्सिंग असोसिएशन आणि पिंपरी-चिंचवड किकबॉक्सिंग असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने उद्योजक तथा महाराष्ट्र किकबॉक्सिंग असोसिएशनचे चेअरमन संतोष बारणे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या किकबॉक्सिंग स्पर्धा २०२६ उत्साहात पार पडल्या. या स्पर्धेला आमदार महेशदादा लांडगे यांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहून खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.

यावेळी आमदार लांडगे यांनी क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी आणि खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी सातत्याने सकारात्मक भूमिका घेत असल्याचे अधोरेखित झाले. त्यांच्या उपस्थितीमुळे स्पर्धेतील खेळाडू, प्रशिक्षक आणि आयोजकांना मोठी प्रेरणा मिळाल्याची भावना व्यक्त करण्यात आली.

याप्रसंगी संतोष बारणे म्हणाले की, “आज महाराष्ट्रात सुमारे २५ ते ३० हजार खेळाडू किकबॉक्सिंग या खेळाशी जोडले गेले आहेत. या खेळाच्या विकासासाठी आमदार महेशदादा लांडगे यांनी नेहमीच सकारात्मक भूमिका घेतली असून, भविष्यातही त्यांच्या मार्गदर्शनातून आणि सहकार्याने किकबॉक्सिंगला अधिक बळ मिळेल, याची मला पूर्ण खात्री आहे. राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर या खेळाला अधिक मोठी ओळख मिळवून देण्यासाठी त्यांचे मोलाचे योगदान राहील, असा मला विश्वास आहे.

तसेच महाराष्ट्र किकबॉक्सिंग परिवारावर दाखवलेल्या प्रेम, आपुलकी आणि विश्वासाबद्दल बारणे यांनी आमदार लांडगे यांचे मनःपूर्वक आभार मानले. “चेअरमन म्हणून क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी त्यांच्यासोबत कार्य करण्याची संधी मिळत असल्याचा मला अभिमान आहे,” अशा भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्या.

banner

स्पर्धेत राज्यातील विविध भागांतील खेळाडूंनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आपल्या कौशल्याचे प्रदर्शन केले. क्रीडाप्रेमी वातावरणात पार पडलेल्या या स्पर्धेमुळे किकबॉक्सिंगच्या प्रसाराला आणि नवोदित खेळाडूंना प्रोत्साहन मिळणार असल्याचा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.


Spread the love

You may also like

Leave a Comment

आमच्याबद्दल – लोक मौर्य

“लोक मौर्य” हे एक विश्वासार्ह, अभ्यासपूर्ण आणि जनतेच्या आवाजाला प्रतिष्ठा देणारे डिजिटल वेबपोर्टल आहे. आम्ही बातम्यांची केवळ नोंद घेत नाही, तर त्या बातम्या समाजावर काय परिणाम करतात याचाही सखोल विचार करतो.

“लोक मौर्य” हे नाव केवळ एका समुदायाचं प्रतिनिधित्व करत नाही, तर ते समतेच्या तत्वावर आधारित न्याय्य समाजरचनेचं प्रतीक आहे. आम्ही प्रत्येक वर्गातील, जातीधर्मातील आणि प्रांतातील लोकांचे मुद्दे, सामाजिक बदल, आणि ऐतिहासिक सत्यता यांचा अभ्यासपूर्वक मागोवा घेतो.

आमचा प्रयत्न आहे की, “लोक मौर्य” हे व्यासपीठ सत्य, विवेक आणि संवेदनशीलतेने समृद्ध असावं. आम्ही कोणत्याही राजकीय पक्षाशी संलग्न नाही, पण जनतेच्या बाजूने ठामपणे उभं राहणं हीच आमची भूमिका आहे.

आम्ही विश्वास ठेवतो – लोकशाही टिकते ती सजग नागरिकांमुळे, आणि सजगता येते माहितीमुळे. “लोक मौर्य” हे त्या सजगतेचं माध्यम आहे.

 

मुख्य संपादक :- राम बनसोडे

संपर्क:- 8446439067

Edtior's Picks

Latest Articles

© 2025 Lok Maurya, All Rights Reserved | Website Developed & Maintained by Swara Infotech | 📞 9096040204
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00