Home पिंपरी चिंचवड तुकाराम मुंडे यांच्या आदेशाला पिंपरी-चिंचवडमधील अवैध पान टपरीचालकांकडून केराची टोपली..

तुकाराम मुंडे यांच्या आदेशाला पिंपरी-चिंचवडमधील अवैध पान टपरीचालकांकडून केराची टोपली..

by Lokmauryanews@gmail.com
0 comments
Spread the love

पिंपरी चिंचवड : – FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांनी मोठा निर्णय घेतला आहे. राज्यात गुटखा, तंबाखू किंवा निकोटीनयुक्त पानमसाल्याचा व्यापार, साठवणूक आढळल्यास संबंधितांवर थेट मकोका अंतर्गत कारवाई करण्याचे आदेश तुकाराम मुंढे यांनी दिले आहेत.

गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीविरोधात कठोर कारवाई करण्याचे आवाहन प्रशासनाकडून वारंवार करण्यात येत असतानाही पिंपरी-चिंचवड शहरातील अनेक भागांत खुलेआम गुटख्याची विक्री सुरू असल्याचे चित्र दिसत आहे.

विशेष म्हणजे नेहमीपेक्षा जास्त किमतीमध्ये विक्री केली जात आहे त्यामुळे बंदी असलेल्या पदार्थांची विक्री रोखण्यात संबंधित यंत्रणांना कितपत यश आले आहे, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

शहरातील काही पानटपऱ्या, किराणा दुकाने आणि इतर व्यावसायिक आस्थापनांमधून गुटखा सहज उपलब्ध होत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. विशेषतः युवक आणि अल्पवयीन मुलांपर्यंतही हे पदार्थ पोहोचत असल्याने पालक आणि सामाजिक संघटनांनी चिंता व्यक्त केली आहे.

banner

गुटखा विक्रीवर राज्यात बंदी असतानाही काही विक्रेते नियम धाब्यावर बसवून व्यवसाय करत असल्याचा आरोप होत आहे. यामुळे प्रशासनाने विशेष पथके तयार करून नियमित तपासण्या कराव्यात, दोषींवर कठोर कारवाई करावी आणि अशा अवैध व्यवसायांना आळा घालावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.


Spread the love

You may also like

Leave a Comment

आमच्याबद्दल – लोक मौर्य

“लोक मौर्य” हे एक विश्वासार्ह, अभ्यासपूर्ण आणि जनतेच्या आवाजाला प्रतिष्ठा देणारे डिजिटल वेबपोर्टल आहे. आम्ही बातम्यांची केवळ नोंद घेत नाही, तर त्या बातम्या समाजावर काय परिणाम करतात याचाही सखोल विचार करतो.

“लोक मौर्य” हे नाव केवळ एका समुदायाचं प्रतिनिधित्व करत नाही, तर ते समतेच्या तत्वावर आधारित न्याय्य समाजरचनेचं प्रतीक आहे. आम्ही प्रत्येक वर्गातील, जातीधर्मातील आणि प्रांतातील लोकांचे मुद्दे, सामाजिक बदल, आणि ऐतिहासिक सत्यता यांचा अभ्यासपूर्वक मागोवा घेतो.

आमचा प्रयत्न आहे की, “लोक मौर्य” हे व्यासपीठ सत्य, विवेक आणि संवेदनशीलतेने समृद्ध असावं. आम्ही कोणत्याही राजकीय पक्षाशी संलग्न नाही, पण जनतेच्या बाजूने ठामपणे उभं राहणं हीच आमची भूमिका आहे.

आम्ही विश्वास ठेवतो – लोकशाही टिकते ती सजग नागरिकांमुळे, आणि सजगता येते माहितीमुळे. “लोक मौर्य” हे त्या सजगतेचं माध्यम आहे.

 

मुख्य संपादक :- राम बनसोडे

संपर्क:- 8446439067

Edtior's Picks

Latest Articles

© 2025 Lok Maurya, All Rights Reserved | Website Developed & Maintained by Swara Infotech | 📞 9096040204
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00