Home पिंपरी चिंचवड महापालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्राचं खाजगीकरण?..

महापालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्राचं खाजगीकरण?..

कोटींचा प्रस्ताव स्थायीसमोर.. निविदा प्रक्रियेत केवळ तीनच निविदा प्राप्त झाल्याने संशयाला वाव?…

by Lokmauryanews@gmail.com
0 comments
Spread the love

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीसमोर सेक्टर 23 येथील जलशुद्धीकरण केंद्राच्या टप्पा 1 ते 4 च्या अंतर्गत कामांसाठी सुमारे 6.01 कोटी रुपयांचा खाजगीकरणाचा प्रस्ताव येत्या बुधवारी होणाऱ्या (दि. १७) स्थायी समितीच्या मंजुरीसाठी आहे.

या निविदा प्रक्रियेत केवळ तीन निविदा प्राप्त झाल्याने आणि त्यापैकी एका कंपनीला काम देण्याचा प्रस्ताव असल्याने पारदर्शकतेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. तसेच महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागात स्वतंत्र मनुष्यबळ आणि सक्षम यंत्रणा उपलब्ध नाही का? असेल तर, जलशुद्धीकरण केंद्राचे संचालन खासगी कंपनीकडे देण्याची गरज काय?

महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने जलशुद्धीकरण केंद्र चालविण्याचे काम खाजगी संस्थेकडे सोपविण्यासाठी निविदा मागवल्या होत्या. प्राप्त निविदांमध्ये विनय इंजिनिअरिंग सर्व्हिसेस प्रा. लि. या कंपनीची निविदा स्वीकारण्याचा प्रस्ताव प्रशासनाने ठेवला आहे. या कामासाठी तब्बल 6 कोटी रुपयांहून अधिक खर्च अपेक्षित आहे.

तसेच निविदेत 1 टक्का सेवा शुल्क, भाववाढ, किमान वेतनवाढीचा अतिरिक्त भार आणि जीएसटी यामुळे अंतिम खर्च आणखी वाढू शकतो, अशी शक्यता तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. त्यामुळे सुरुवातीला 6.01 कोटी रुपयांचा असलेला खर्च प्रत्यक्षात वाढू देखील शकतो. या प्रस्तावाला स्थायी समितीची मंजुरी मिळाल्यानंतरच पुढील प्रक्रिया सुरू होणार असली तरी, जलशुद्धीकरणासारखी अत्यावश्यक सेवा टप्प्याटप्प्याने खासगी ठेकेदारांकडे दिली जात असल्याने सुज्ञ नागरिकांमधून नाराजीचा सूर पुढे येऊ लागला आहे.

banner

Spread the love

You may also like

Leave a Comment

आमच्याबद्दल – लोक मौर्य

“लोक मौर्य” हे एक विश्वासार्ह, अभ्यासपूर्ण आणि जनतेच्या आवाजाला प्रतिष्ठा देणारे डिजिटल वेबपोर्टल आहे. आम्ही बातम्यांची केवळ नोंद घेत नाही, तर त्या बातम्या समाजावर काय परिणाम करतात याचाही सखोल विचार करतो.

“लोक मौर्य” हे नाव केवळ एका समुदायाचं प्रतिनिधित्व करत नाही, तर ते समतेच्या तत्वावर आधारित न्याय्य समाजरचनेचं प्रतीक आहे. आम्ही प्रत्येक वर्गातील, जातीधर्मातील आणि प्रांतातील लोकांचे मुद्दे, सामाजिक बदल, आणि ऐतिहासिक सत्यता यांचा अभ्यासपूर्वक मागोवा घेतो.

आमचा प्रयत्न आहे की, “लोक मौर्य” हे व्यासपीठ सत्य, विवेक आणि संवेदनशीलतेने समृद्ध असावं. आम्ही कोणत्याही राजकीय पक्षाशी संलग्न नाही, पण जनतेच्या बाजूने ठामपणे उभं राहणं हीच आमची भूमिका आहे.

आम्ही विश्वास ठेवतो – लोकशाही टिकते ती सजग नागरिकांमुळे, आणि सजगता येते माहितीमुळे. “लोक मौर्य” हे त्या सजगतेचं माध्यम आहे.

 

मुख्य संपादक :- राम बनसोडे

संपर्क:- 8446439067

Edtior's Picks

Latest Articles

© 2025 Lok Maurya, All Rights Reserved | Website Developed & Maintained by Swara Infotech | 📞 9096040204
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00