Home पिंपरी चिंचवड पुनावळे येथील शाळा आरक्षणाची जागा भाडेपट्ट्याने देण्यास सभेत मंजुरी…

पुनावळे येथील शाळा आरक्षणाची जागा भाडेपट्ट्याने देण्यास सभेत मंजुरी…

by Lokmauryanews@gmail.com
0 comments
Spread the love

 पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या (PCMC) मालकीची पुनावळे येथील सुमारे ९१ गुंठे (अंदाजे २.२५ एकर) जागा माध्यमिक शाळेसाठी आरक्षित आहे. ही जागा ३० वर्षांसाठी खासगी संस्थेला भाडेतत्त्वावर देण्याच्या प्रस्तावास स्थायी समितीने मंजुरी दिली होती, त्या प्रस्तावाला महापौर रवी लांडगे यांनी आज सोमवारी (दि. १५) सर्वसाधरण सभेत उपसूचनांसह मंजुरी दिली.

महापालिका मुख्यालयात झालेल्या सभेत या विषयावर सविस्तर चर्चा झाली. प्रस्तावास मंजुरी मिळाली असली तरी त्यावर नगरसदस्यांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया उमटल्याचे पाहायला मिळाले. सभेदरम्यान काही सदस्यांनी शैक्षणिक सुविधांच्या दृष्टीने आरक्षित जागांचा योग्य वापर होणे आवश्यक असल्याचे मत मांडले, तर काहींनी भाडेपट्टा धोरणाबाबत अधिक स्पष्टता आणि पारदर्शकतेची गरज व्यक्त केली. भविष्यात शैक्षणिक गरजा लक्षात घेऊन संबंधित जागेचा उपयोग होईल याची खात्री करण्याची मागणीही सदस्यांनी केली.

या विषयावरील चर्चेत नगरसेवक निलेश बारणे, कुणाल वाव्हळकर, राहुल कलाटे, नितीन काळजे, प्रमोद कुटे, अनंत कोऱ्हाळे, संदीप वाघेरे, प्रशांत शितोळे तसेच नगरसेविका डॉ. वैशाली घोडेकर आणि स्नेहा कलाटे यांनी सहभाग घेत विविध मुद्दे उपस्थित केले.

महापौर रवी लांडगे यांनी सदस्यांच्या सूचनांचा विचार करून उपसूचनांसह प्रस्ताव मंजूर केल्याचे जाहीर केले. या निर्णयामुळे पुनावळे परिसरातील शैक्षणिक पायाभूत सुविधांच्या नियोजनाबाबत नव्याने चर्चा सुरू झाली आहे.

banner

Spread the love

You may also like

Leave a Comment

आमच्याबद्दल – लोक मौर्य

“लोक मौर्य” हे एक विश्वासार्ह, अभ्यासपूर्ण आणि जनतेच्या आवाजाला प्रतिष्ठा देणारे डिजिटल वेबपोर्टल आहे. आम्ही बातम्यांची केवळ नोंद घेत नाही, तर त्या बातम्या समाजावर काय परिणाम करतात याचाही सखोल विचार करतो.

“लोक मौर्य” हे नाव केवळ एका समुदायाचं प्रतिनिधित्व करत नाही, तर ते समतेच्या तत्वावर आधारित न्याय्य समाजरचनेचं प्रतीक आहे. आम्ही प्रत्येक वर्गातील, जातीधर्मातील आणि प्रांतातील लोकांचे मुद्दे, सामाजिक बदल, आणि ऐतिहासिक सत्यता यांचा अभ्यासपूर्वक मागोवा घेतो.

आमचा प्रयत्न आहे की, “लोक मौर्य” हे व्यासपीठ सत्य, विवेक आणि संवेदनशीलतेने समृद्ध असावं. आम्ही कोणत्याही राजकीय पक्षाशी संलग्न नाही, पण जनतेच्या बाजूने ठामपणे उभं राहणं हीच आमची भूमिका आहे.

आम्ही विश्वास ठेवतो – लोकशाही टिकते ती सजग नागरिकांमुळे, आणि सजगता येते माहितीमुळे. “लोक मौर्य” हे त्या सजगतेचं माध्यम आहे.

 

मुख्य संपादक :- राम बनसोडे

संपर्क:- 8446439067

Edtior's Picks

Latest Articles

© 2025 Lok Maurya, All Rights Reserved | Website Developed & Maintained by Swara Infotech | 📞 9096040204
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00