25
पिंपरी :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने प्रारूप विकास आराखडा (डिपी) जाहीर केला असून यामध्ये विविध रस्ते व विविध आरक्षणाबाबत नागरी वस्तीतील अनेक घरे, दुकाने भविष्यात बाधित होणार आहेत. या विकास आराखड्याबाबत सूचना व हरकती घेण्याची मुदत ६० दिवसाची असून ती १८ जुलै २०२५ पर्यंत आहे. तरी मोहननगर, रामनगर, काळभोरनगर मधील रस्ता बाधित नागरिकांनी जास्तीत जास्त सूचना व हरकती नोंदवाव्यात असे आवाहन सर्वपक्षीय नेत्यांनी केले आहे.
विकास आरत्या बाबत सूचना व हरकती घेण्यासाठी मोहननगर, रामनगर, काळभोरनगर, महात्मा फुलेनगर, दत्तनगर, विद्यानगर, परशुरामनगर या भागात मसुदा फार्म वाटप करण्यात आला होता. तो नीट वाचून त्यात काही बदल करायचा असेल तर तो करून प्रत्येक कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीने व्यक्तिगत या हरकतीवर स्वाक्षरी करून आप आपली हरकत नोंदवावी अशी विनंती स्थानिक सर्वपक्षीय नेत्यांनी केली होती.
दरम्यान दोन बैठकांमध्ये झालेल्या निर्णयाप्रमाणे आज सोमवार दि.२३ रोजी पिंपरी चिंचवड महापालिका मुख्यालयात मोहननगर, रामनगर, दत्तनगर, कळभोरनगरच्या नागरिकांनी एकत्रित येत मोठ्या संख्येने व्यक्तिगत सूचना व हरकती नोंदवल्या आहेत. यावेळी माजी नगरसेवक मारुती भापकर, राजू दुर्गे, प्रसाद शेट्टी, महादेव नेरलेकर, दत्ता देवतरासे, सोमनाथ अलंकार, बापूसाहेब हाके, प्रसाद दौंडकर, राजू पाटील, सलीम शेख, रोप शेख, श्रीजीत पिल्ले हभप डोके महाराज, वलवणकर काका, सावंत मामा, लोणकर वहिनी, आदि प्रमुख कार्यकर्ते व नागरिक महापालिका मुख्यालयात उपस्थित होते.