पिंपरी चिंचवड :- मा. पोलीस आयुक्त श्री विनयकुमार चौबे यांनी पिंपरी चिंचवड शहरामध्ये अंमली पदार्थांचे समुळ उच्चाटन करणेबाबत आदेशीत केले आहे. त्याप्रमाणे विशेष मोहिमेअंतर्गत पिंपरी चिंचवड आयुक्तालयातील पोलीस स्टेशन मार्फत व गुन्हे शाखेमार्फत अंमली पदार्थाची विक्री, वितरण, आणि गैरवापर करणा-या इसमांविरुध्द जास्तीत जास्त कारवाई करण्यात आल्या असुन अंमली पदार्थ विरोधी मोहिमेमध्ये जनसहभागातुन माहिती प्राप्त करुन कारवाई करण्याकरीता केंद्र शासनाने मानस हेल्प लाईन नंबर १९३३ उपलब्ध करुन दिली आहे. आज २६ जुन रोजी जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनाचे औचित्य साधुन पिंपरी चिंचवड आयुक्तालय हद्दीमध्ये अंगली पदार्थ म्हणजे काय याबाबत माहिती देवुन त्यांचे सेवनामुळे शरीरावर, मनावर, कुटुंबियांवर होणारे दुष्परिणाम याबाबत मार्गदर्शन करुन अंमली पदार्थांचे समुळ उच्चाटन करणेकरीता विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अंमली पदार्थ विरोधी पथक यांचे वतीने NALSA DAWN-Drug Awareness and Wellness Navigation for a Drug-free India Scheme-2025 या मोहिमेअंतर्गत डॉ. हेडगेवार मैदान, मासुळकर कॉलनी, पिंपरी पुणे येथे जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सदर कार्यक्रमास २५०-३०० नागरिक हजर होते. डॉ. जयश्री सारस्वत, जिल्हा सल्लागार, औध हॉस्पिटल, पुणे यांनी व्यसनांचे होणारे दुष्परिणाम व व्यसनमुक्ती करीता शासनाच्या विवीध योजना याबाबत मार्गदर्शन केले. श्री हर्षल पंडीत, संचालक, स्माईल व्यसनमुक्ती केंद्र, उरों, ता मावळ जि पुणे यांनी वाढती व्यसनाधीनता व त्याचे युवकांवर होत असलेले दुष्परिणाम व उपचार याबाबत मार्गदर्शन केले. श्री विल्यम साळवी, व्यवस्थापक, विमल फाऊंडेशन, पिंपरी पुणे व्यसनांचे दुष्परिणाम व त्यांचे पुनर्वसन यावर मार्गदर्शन केले. वरीष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पाटील व सहा. पोलीस निरीक्षक सचिन कदम यांनी अंमली पदार्थ विरोधी कायदयाबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमानंतर स्माईल व्यसनमुक्ती केंद्र, उर्स, ता मावळ जि पुणे यांचे व्यसनांचे दुष्परिणाम व डिवाईन फाऊंडेश यांचे माझी वसुर्धरा अभियान हि ०२ पथनाट्वे सादर करण्यात आली. सदर कार्यक्रमानंतर नेहरुनगर पिंपरी परीसरातील मासुळकर कॉलनी, पिंपरी पुणे-रसरंग स्विटस चौक-एच.ए.ग्राऊंड झिरो बॉईज चौक-फुलेनगर झोपडपट्टी-अंमली पदार्थ विरोधी पथक, गुन्हे शाखा, पिंपरी चिंचवड कार्यालय अशी पायी रैली काढण्यात आली तसेच फुलेनगर पिंपरी झोपडपटटीमध्ये पथनाटयदवारे अंमली पदार्थाचे दुष्परीणाम यावर माहिती देण्यात आली. तसेच पिंपरी पोलीस आयुक्तालयातील राजश्री शाहु महाराज विद्यालय, चिखली, डी. वाय. पाटील कॉलेज, शाहूनगर, भोरारी छत्रपती शिवाजी महाराज विद्यालय, देहुरोड नरसिंह हायस्कुल, सांगवी व भारतीय विद्यानिकेत विद्यालय, सांगवी (प्रभात फेरीराह) डी. वाय. पाटील कॉलेज, रावेत, गणेश इग्लिश मिडीयम स्कुल, दापोडी, प्रियदर्शनी इंग्लिश मिडीयम स्कुल, गोसरी व गैरवनाथ महाविद्यालय, भोसरी, हाय व्हिजन कॉलेज व इंद्रायणी कॉलेज तळेगाव दाभाडे, ज्ञानेश्वर विद्यालय आळंदी, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, धामने, शिरगाव, पं. दिनदयाळ माध्यमिक विद्यालय व एच.ए. हाय स्कुल, संत संत तुकाराम नगर, सुर्यदत्ता कॉलेज व रामचंद्र इन्स्टिट्युट ऑफ मॅनेजमेंट बावधन एन.एन.बी.पी. स्कुल, काळेवाडी, मालचंद्र हाय स्कुल, भैरवनाथ विद्यालय व लर्निंग ट्री स्कुल म्हाळुंगे, डी. वाय. पाटील कॉलेज, माता रमाबाई आंबेडकर शाळा निगडी, हद्दीमध्ये जयहिंद विद्यालय, पिंपरी व भैरवनाथ विद्या मंदिर, तळेगाव एम.आय.डी.सी. या शाळा कॉलेजमध्ये विदयार्थ्यांना अंमली पदार्थाचे/व्यसनांचे होणारे दुष्परीणाम याबाबत माहिती देण्यात आली असुन त्यांचे प्रबोधन करण्यात आले आहे.
22