Home पिंपरी चिंचवड पीएमपीएमएल बसवर झाड कोसळल्याची घटना : अग्निशमन विभागाची तातडीची कारवाई

पीएमपीएमएल बसवर झाड कोसळल्याची घटना : अग्निशमन विभागाची तातडीची कारवाई

चिंचवड-आकुर्डी रस्त्यावरील घटना; काही मिनिटांत बचावकार्य करून वाहतूक सुरळीत, एका प्रवाशाला किरकोळ दुखापत

by Lokmauryanews@gmail.com
0 comments
Spread the love

 पिंपरी,  : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या नियंत्रण कक्षाला जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांनी आज सकाळी १० वाजताच्या सुमारास चिंचवड-आकुर्डी रस्त्यावर पीएमपीएमएल बसवर मोठे झाड कोसळल्याची माहिती दिली. त्यानंतर तातडीने कार्यवाहीस सुरूवात झाली,सदर घटनेमुळे रस्त्यावरील वाहतूक पूर्णतः ठप्पच झाली होती आणि प्रवाशांमध्ये घबराट निर्माण झाली होती. माहिती मिळताच मुख्य अग्निशमन केंद्र आणि प्राधिकरण येथून दोन अग्निशमन गाड्या घटनास्थळी रवाना करण्यात आल्या. अग्निशमन जवानांनी काही मिनिटांतच घटनास्थळी दाखल होत त्वरित बचावकार्य सुरू केले. अत्यंत दक्षतेने आणि नियोजनबद्ध पद्धतीने झाड कापून बाजूला करण्यात आले आणि वाहतूक सुरळीत करण्यात आली. या घटनेत एक व्यक्ती किरकोळ जखमी झाला असून त्याला घटनास्थळी प्राथमिक उपचार देण्यात आले आहेत. सुदैवाने कोणतीही मोठी जिवीतहानी झाली नाही. अग्निशमन विभागाने वेळेवर दाखवलेली तत्परता आणि सज्जता यामुळे संभाव्य मोठा अपघात टळला आहे.

नागरिकांच्या सुरक्षेसाठी पिंपरी चिंचवड महापालिकेचा अग्निशमन विभाग २४ तास कार्यरत असून कोणताही आपत्कालीन प्रसंग आढळल्यास नागरिकांनी ७०३०९०८९९१ या आपत्कालीन क्रमांकावर संपर्क साधावा. घटनास्थळी पोहोचताच आम्ही सर्वप्रथम बसमधील प्रवाशांची सुरक्षितता तपासली. तात्काळ झाड हटवण्याचे काम सुरू केले आणि काही वेळातच रस्ता वाहतुकीसाठी मोकळा केला. वेळेवर प्रतिसाद दिल्यामुळे मोठा अनर्थ टळला. अशा आपत्कालीन प्रसंगात नागरिकांनी घाबरून न जाता तात्काळ ७७५७९६६०४९ या क्रमांकावर संपर्क साधावा. आम्ही सतत दक्ष आहोत आणि नागरिकांच्या सेवेसाठी तत्पर आहोत – गौतम इंगवले, उपअधिकारी, अग्निशमन विभाग


Spread the love

You may also like

Leave a Comment

आमच्याबद्दल – लोक मौर्य

“लोक मौर्य” हे एक विश्वासार्ह, अभ्यासपूर्ण आणि जनतेच्या आवाजाला प्रतिष्ठा देणारे डिजिटल वेबपोर्टल आहे. आम्ही बातम्यांची केवळ नोंद घेत नाही, तर त्या बातम्या समाजावर काय परिणाम करतात याचाही सखोल विचार करतो.

“लोक मौर्य” हे नाव केवळ एका समुदायाचं प्रतिनिधित्व करत नाही, तर ते समतेच्या तत्वावर आधारित न्याय्य समाजरचनेचं प्रतीक आहे. आम्ही प्रत्येक वर्गातील, जातीधर्मातील आणि प्रांतातील लोकांचे मुद्दे, सामाजिक बदल, आणि ऐतिहासिक सत्यता यांचा अभ्यासपूर्वक मागोवा घेतो.

आमचा प्रयत्न आहे की, “लोक मौर्य” हे व्यासपीठ सत्य, विवेक आणि संवेदनशीलतेने समृद्ध असावं. आम्ही कोणत्याही राजकीय पक्षाशी संलग्न नाही, पण जनतेच्या बाजूने ठामपणे उभं राहणं हीच आमची भूमिका आहे.

आम्ही विश्वास ठेवतो – लोकशाही टिकते ती सजग नागरिकांमुळे, आणि सजगता येते माहितीमुळे. “लोक मौर्य” हे त्या सजगतेचं माध्यम आहे.

 

मुख्य संपादक :- राम बनसोडे

संपर्क:- 8446439067

Edtior's Picks

Latest Articles

© 2025 Lok Maurya, All Rights Reserved | Website Developed & Maintained by Swara Infotech | 📞 9096040204
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00