Home पिंपरी चिंचवड श्रीमन्नृप शिवछत्रपती पालखीचे चिंचवडगाव येथे जल्लोषात स्वागत….

श्रीमन्नृप शिवछत्रपती पालखीचे चिंचवडगाव येथे जल्लोषात स्वागत….

by Lokmauryanews@gmail.com
0 comments
Spread the love

             श्रीमन्नृप शिवछत्रपती पालखीची परंपरा पूर्वापर चालत आलेली आहे. आषाढी वारीत पायी चालण्याची परंपरा कोरोना काळातही अखंडितपणे जपलेला जगातील एकमेव ऐतिहासिक सोहळा आहे. श्रीशिवजन्मभूमी श्रीशिवनेरी ते शक्तीपंढरी दुर्गदुर्गेश्वर श्रीरायगड ते भक्तीपंढरी भूवैकुंठ

श्रीपंढरपूर ते श्रीपावनखिंड ते श्रीशिवाई मंदिर श्रीशिवनेरी धारकरी – वारकरी पायी पालखी सोहळा श्रीराजाभिषेक शक 352 चे आगमन श्री महिंद गुरुजी यांचे मार्गदर्शनाखाली शुक्रवार दि 18/07/2025 रोजी सकाळी 11 वाजता नगरसेविका अश्विनी गजानन चिंचवडे – पाटील यांनी जनसंपर्क कार्यालय श्री मोरया गोसावी समाधी मंदिर रोड येथे उत्साहात पालखीचे स्वागत झाले. या प्रसंगी नगरसेवक श्री सुरेश भोईर, चिंचवड काळेवाडी मंडलाध्यक्ष श्री हर्षल नढे, प्रदेश सचिव युवा मोर्चा अजित कुलथे, वि.हि.प जिल्हा मंत्री पिंपरी – चिंचवड श्री धनंजय गावडे , श्री रवींद्र प्रभुणे, श्री प्रदीप सायकर, श्री केशव नेर्लेकर, सौ दिपाली कलापुरे, सौ अंतरा देशपांडे, सुनीता शहाणे, भाग्यश्री देशमुख, भाग्यश्री पास्ते, चाचरताई, पाटीलताई सानेताई व चिंचवडगावातील शिव-शंभूभक्त बहुसंख्येने यावेळी उपस्थित होते.


Spread the love

You may also like

Leave a Comment

आमच्याबद्दल – लोक मौर्य

“लोक मौर्य” हे एक विश्वासार्ह, अभ्यासपूर्ण आणि जनतेच्या आवाजाला प्रतिष्ठा देणारे डिजिटल वेबपोर्टल आहे. आम्ही बातम्यांची केवळ नोंद घेत नाही, तर त्या बातम्या समाजावर काय परिणाम करतात याचाही सखोल विचार करतो.

“लोक मौर्य” हे नाव केवळ एका समुदायाचं प्रतिनिधित्व करत नाही, तर ते समतेच्या तत्वावर आधारित न्याय्य समाजरचनेचं प्रतीक आहे. आम्ही प्रत्येक वर्गातील, जातीधर्मातील आणि प्रांतातील लोकांचे मुद्दे, सामाजिक बदल, आणि ऐतिहासिक सत्यता यांचा अभ्यासपूर्वक मागोवा घेतो.

आमचा प्रयत्न आहे की, “लोक मौर्य” हे व्यासपीठ सत्य, विवेक आणि संवेदनशीलतेने समृद्ध असावं. आम्ही कोणत्याही राजकीय पक्षाशी संलग्न नाही, पण जनतेच्या बाजूने ठामपणे उभं राहणं हीच आमची भूमिका आहे.

आम्ही विश्वास ठेवतो – लोकशाही टिकते ती सजग नागरिकांमुळे, आणि सजगता येते माहितीमुळे. “लोक मौर्य” हे त्या सजगतेचं माध्यम आहे.

 

मुख्य संपादक :- राम बनसोडे

संपर्क:- 8446439067

Edtior's Picks

Latest Articles

© 2025 Lok Maurya, All Rights Reserved | Website Developed & Maintained by Swara Infotech | 📞 9096040204
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00