Home पिंपरी चिंचवड आ. सुनील शेळके यांची सुदुंबरे, सुदवडी, जांबवडे व इंदोरी गावांना भेट..

आ. सुनील शेळके यांची सुदुंबरे, सुदवडी, जांबवडे व इंदोरी गावांना भेट..

by Lokmauryanews@gmail.com
0 comments
Spread the love

मावळ,  :- आमदार सुनील शंकरराव शेळके यांच्या पुढाकाराने सुरू असलेल्या जनसंवाद अभियानाचा पुढील टप्पा सुदुंबरे, सुदवडी, जांबवडे व इंदोरी या गावांत पार पडला. या वेळी आमदारांनी ग्रामस्थांशी थेट संवाद साधत त्यांच्या समस्या, तक्रारी आणि विकासाशी निगडित अपेक्षा जाणून घेतल्या.

ग्रामस्थांनी मांडलेल्या मागण्यांमध्ये शेतकऱ्यांचे पाणंद रस्ते खुले करणे, घनकचरा व्यवस्थापनासाठी जागा उपलब्ध करून घंटागाडीची सोय, इंदोरी–जांबवडे रस्त्यावर स्पीड ब्रेकर बसविणे, प्रधानमंत्री आवास योजनेतील प्रलंबित लाभार्थ्यांना तातडीने लाभ, जलजीवन मिशन योजनांतील अडथळे दूर करणे, रेशनिंगमधील अडचणी, जातीचे दाखले आणि इतर शासकीय दाखले मिळविण्याच्या समस्या आदींचा समावेश होता.

नागरिकांनी या समस्या तोंडी तसेच लेखी स्वरूपात सादर केल्या. सर्व अर्जांची दखल घेऊन तातडीने कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन आमदार शेळके यांनी दिले. गावोगाव संवाद साधून समस्या मार्गी लावणे हीच आपली बांधिलकी असल्याचे त्यांनी नमूद केले.

या उपक्रमात जांबवडे गावातील ठाकर बांधवांना जातीची २० प्रमाणपत्रे वाटप करण्यात आली. ग्रामस्थांनी या अभियानाचे स्वागत करत, “आमदार सुनील शेळके हे समस्या गांभीर्याने घेऊन तत्परतेने उपाययोजना करणारे लोकप्रतिनिधी आहेत”, असा विश्वास व्यक्त केला.

banner

Spread the love

You may also like

Leave a Comment

आमच्याबद्दल – लोक मौर्य

“लोक मौर्य” हे एक विश्वासार्ह, अभ्यासपूर्ण आणि जनतेच्या आवाजाला प्रतिष्ठा देणारे डिजिटल वेबपोर्टल आहे. आम्ही बातम्यांची केवळ नोंद घेत नाही, तर त्या बातम्या समाजावर काय परिणाम करतात याचाही सखोल विचार करतो.

“लोक मौर्य” हे नाव केवळ एका समुदायाचं प्रतिनिधित्व करत नाही, तर ते समतेच्या तत्वावर आधारित न्याय्य समाजरचनेचं प्रतीक आहे. आम्ही प्रत्येक वर्गातील, जातीधर्मातील आणि प्रांतातील लोकांचे मुद्दे, सामाजिक बदल, आणि ऐतिहासिक सत्यता यांचा अभ्यासपूर्वक मागोवा घेतो.

आमचा प्रयत्न आहे की, “लोक मौर्य” हे व्यासपीठ सत्य, विवेक आणि संवेदनशीलतेने समृद्ध असावं. आम्ही कोणत्याही राजकीय पक्षाशी संलग्न नाही, पण जनतेच्या बाजूने ठामपणे उभं राहणं हीच आमची भूमिका आहे.

आम्ही विश्वास ठेवतो – लोकशाही टिकते ती सजग नागरिकांमुळे, आणि सजगता येते माहितीमुळे. “लोक मौर्य” हे त्या सजगतेचं माध्यम आहे.

 

मुख्य संपादक :- राम बनसोडे

संपर्क:- 8446439067

Edtior's Picks

Latest Articles

© 2025 Lok Maurya, All Rights Reserved | Website Developed & Maintained by Swara Infotech | 📞 9096040204
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00