Home पिंपरी चिंचवड वीजपुरवठा खंडित होऊ देऊ नका, प्रलंबित कामांना गती द्या – खा. श्रीरंग बारणे..

वीजपुरवठा खंडित होऊ देऊ नका, प्रलंबित कामांना गती द्या – खा. श्रीरंग बारणे..

by Lokmauryanews@gmail.com
0 comments
Spread the love

पिंपरी  :- पिंपरी-चिंचवड शहरातील आकुर्डी, काळभोरनगर, मोहननगर, दत्तवाडी परिसरात वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्याबाबत खासदार श्रीरंग बारणे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. नवरात्र सुरू असून दसरा, दिवाळी सण समीप आले आहेत. अशा काळात नागरिकांना वीजपुरवठ्याचा त्रास होणार नाही, याची खबरदारी घ्यावी. तसेच महावितरणची सुरू असलेली आणि प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे आदेश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.

बुधवारी खासदार बारणे यांनी पिंपरी-चिंचवडमधील वीज प्रश्नांचा आढावा घेतला. यावेळी पुणे परिमंडळाचे मुख्य अभियंता सुनील काकडे, अधीक्षक अभियंता शहाजी गायकवाड, कार्यकारी अभियंता सोमनाथ मुंडे, अतुल देवकर, शिवसेनेचे महानगरप्रमुख राजेश वाबळे, शहरप्रमुख निलेश तरस, संतोष सौंदणकर आदी उपस्थित होते.

खासदार बारणे यांनी स्पष्ट केले की, “नागरिकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांना समज द्या. नागरिकांचे फोन उचलून तक्रारी तातडीने सोडवा. भूमिगत केबल, नवीन उपकेंद्र, ब्रेकर बदल, रोहित्र बसविणे व त्यांची क्षमता वाढविणे, संरक्षक कुंपण बसविणे यांसारखी कामे गतीमान करा.”

ताथवडे विभागातील मंजूर फिडरच्या कामांना महापारेषणकडून मान्यता घेऊन तत्काळ सुरुवात करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

banner

दरम्यान, एसआयडीबीआय योजनेअंतर्गत वाल्हेकरवाडी आणि पिंपरी शाखेत नवीन रोहित्र बसवले जाणार आहेत. त्यामुळे पिंपरी मार्केट, विजयनगर, कोकणेनगर, तापकीरमळा, नढेनगर, राजेवाडेनगर व काळेवाडी परिसरातील वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण कमी होईल. तसेच ताथवडेतील प्रिशटाईन प्रोलाइफ उपकेंद्रासाठी ३.५ किमी केबल व ७ रिंग मेन युनिटचे दोन कोटी २७ लाख रुपयांचे काम मंजूर झाले आहे. या कामामुळे वाकड परिसरातील वीजपुरवठा सुरळीत होईल, अशी माहिती खासदार बारणे यांनी दिली.


Spread the love

You may also like

Leave a Comment

आमच्याबद्दल – लोक मौर्य

“लोक मौर्य” हे एक विश्वासार्ह, अभ्यासपूर्ण आणि जनतेच्या आवाजाला प्रतिष्ठा देणारे डिजिटल वेबपोर्टल आहे. आम्ही बातम्यांची केवळ नोंद घेत नाही, तर त्या बातम्या समाजावर काय परिणाम करतात याचाही सखोल विचार करतो.

“लोक मौर्य” हे नाव केवळ एका समुदायाचं प्रतिनिधित्व करत नाही, तर ते समतेच्या तत्वावर आधारित न्याय्य समाजरचनेचं प्रतीक आहे. आम्ही प्रत्येक वर्गातील, जातीधर्मातील आणि प्रांतातील लोकांचे मुद्दे, सामाजिक बदल, आणि ऐतिहासिक सत्यता यांचा अभ्यासपूर्वक मागोवा घेतो.

आमचा प्रयत्न आहे की, “लोक मौर्य” हे व्यासपीठ सत्य, विवेक आणि संवेदनशीलतेने समृद्ध असावं. आम्ही कोणत्याही राजकीय पक्षाशी संलग्न नाही, पण जनतेच्या बाजूने ठामपणे उभं राहणं हीच आमची भूमिका आहे.

आम्ही विश्वास ठेवतो – लोकशाही टिकते ती सजग नागरिकांमुळे, आणि सजगता येते माहितीमुळे. “लोक मौर्य” हे त्या सजगतेचं माध्यम आहे.

 

मुख्य संपादक :- राम बनसोडे

संपर्क:- 8446439067

Edtior's Picks

Latest Articles

© 2025 Lok Maurya, All Rights Reserved | Website Developed & Maintained by Swara Infotech | 📞 9096040204
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00