Home पिंपरी चिंचवड ‘उठा उठा चाकणकरांनो निवडणूक आली; राजकारण्यांना धडा शिकविण्याची वेळ झाली’..

‘उठा उठा चाकणकरांनो निवडणूक आली; राजकारण्यांना धडा शिकविण्याची वेळ झाली’..

by Lokmauryanews@gmail.com
0 comments
Spread the love

चाकण, (दि. ८ नोव्हेंबर २०२५) :- तालुक्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपरिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर चाकण येथे शिवसेनेचा पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाषण करताना चाकणमधील वाढत्या वाहतूक कोंडीवर तोडगा निघणार असल्याची ग्वाही दिली.

शिंदे म्हणाले, “तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्गाला शासनाने मान्यता दिली आहे. या मार्गाच्या कामाचे टेंडर प्रक्रिया सुरू असून सुमारे पाच हजार कोटी रुपयांचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प लवकरच सुरू होणार आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर चाकणसह संपूर्ण औद्योगिक पट्ट्यातील वाहतुकीवरील ताण मोठ्या प्रमाणात कमी होईल.”

चाकण औद्योगिक क्षेत्र हे देशातील एक प्रमुख वाहन उद्योग केंद्र आहे. येथे दररोज हजारो वाहने, ट्रक, कंटेनर, मालवाहतूक गाड्या आणि कर्मचारी प्रवास करतात. त्यामुळे महामार्गावरील वाहतूक कोंडी हा नागरिक आणि कामगारांसाठी डोकेदुखीचा विषय ठरला आहे.

मात्र नागरिकांचा आरोप आहे की, “राजकीय नेते प्रत्येक निवडणुकीत चाकण रस्त्यांचे आणि वाहतूक समस्यांचे मुद्दे उचलतात, पण प्रत्यक्षात कोणतीही कामे होत नाहीत.” पीएमआरडीएविरोधात झालेल्या मोर्चातही या प्रश्नावर तीव्र संताप व्यक्त करण्यात आला होता.

banner

स्थानिक नागरिकांनी सांगितले की, “आता केवळ घोषणा आणि आश्वासने पुरेशी नाहीत. प्रत्यक्ष काम दिसले पाहिजे. खेड-चाकणकरांनी आता सर्व राजकीय पक्षांना खरा धडा शिकवण्याची वेळ आली आहे.”

या पार्श्वभूमीवर येत्या स्थानिक स्वराज्य निवडणुका चाकण आणि खेड तालुक्यातील मतदारांच्या भावना आणि विकासाच्या अपेक्षांवर मोठा परिणाम घडवू शकतात.


Spread the love

You may also like

Leave a Comment

आमच्याबद्दल – लोक मौर्य

“लोक मौर्य” हे एक विश्वासार्ह, अभ्यासपूर्ण आणि जनतेच्या आवाजाला प्रतिष्ठा देणारे डिजिटल वेबपोर्टल आहे. आम्ही बातम्यांची केवळ नोंद घेत नाही, तर त्या बातम्या समाजावर काय परिणाम करतात याचाही सखोल विचार करतो.

“लोक मौर्य” हे नाव केवळ एका समुदायाचं प्रतिनिधित्व करत नाही, तर ते समतेच्या तत्वावर आधारित न्याय्य समाजरचनेचं प्रतीक आहे. आम्ही प्रत्येक वर्गातील, जातीधर्मातील आणि प्रांतातील लोकांचे मुद्दे, सामाजिक बदल, आणि ऐतिहासिक सत्यता यांचा अभ्यासपूर्वक मागोवा घेतो.

आमचा प्रयत्न आहे की, “लोक मौर्य” हे व्यासपीठ सत्य, विवेक आणि संवेदनशीलतेने समृद्ध असावं. आम्ही कोणत्याही राजकीय पक्षाशी संलग्न नाही, पण जनतेच्या बाजूने ठामपणे उभं राहणं हीच आमची भूमिका आहे.

आम्ही विश्वास ठेवतो – लोकशाही टिकते ती सजग नागरिकांमुळे, आणि सजगता येते माहितीमुळे. “लोक मौर्य” हे त्या सजगतेचं माध्यम आहे.

 

मुख्य संपादक :- राम बनसोडे

संपर्क:- 8446439067

Edtior's Picks

Latest Articles

© 2025 Lok Maurya, All Rights Reserved | Website Developed & Maintained by Swara Infotech | 📞 9096040204
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00